*जागतिक मृदा दिन' निमित्त शेतकरी बांधवांना प्रशिक्षण*
ठाणे दि.1 (जगधिश घरत): 5 डिसेंबर २०२० रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मुदा आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमामध्ये निवडलेल्या प्रत्येक गावांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून कृषि विद्यापिठाच्या तज्ञांकडून जमिनीच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.
माती हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून पिकांच्या अन्नद्रव्यांचा प्रमुख स्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांनी लक्ष वेधून तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबात जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
शेतमशागतीच्या चुकीच्या पध्दती, बेसुमार जंगलतोड, अनिबंध चराई, वारा जोरात पाऊस इत्यादी कारणांमुळे जमिनीची धुप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यंल्प कालावधीही पुरेसा ठरतो. जमिनीच्या धूपेमुळे सुपिक माती वाहून जाते. सूपिक जमिनी बरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळु, खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात व सुपिक भागात पसरतात. यामुळे सूपिक जमिन नापिक होण्याची शक्यता असते.
देशाची लोकसंख्या झपाटयाने वाढतआहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, धरण, रस्ते इत्यादी विविध कारणांमुळे सुपिक जमिन कमी होत असल्याने लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे. एवढ्या मोठया लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी आन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.सधन कृषि पध्दतीने रासायनिक खंताच्या अनिर्बंधित वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघत चालले आहे.त्यांचा पिक उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.
मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारीत खंताच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अन्नसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.त्यासाठी राज्य य केंद्र शासनामाफर्त राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातर्गत मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम सन 2015-16 पासून संपूर्ण देशात राबविण्यात येते आहे.
या अभियानाच्या माध्यमतून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक 2 वर्षांतुन एकदा त्याच्या शेतीची मृदा आरोग्य पत्रिका करुन देण्यात आली आहे. सन २०२०-२१ मध्य प्रत्येक तालुक्यातून या योजनेत १० गावांची निवड केलेली आहे. माती परिक्षणावरुन जमिनीचा कस व जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते.रासायनिक खंतांच्या वाढत्या किमती लक्षात घेता माती परिक्षणानुसार पिकांना खतांच्या मात्रा दिल्यास खर्चात बचत होते.खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते.
00000000
No comments:
Post a Comment