Thursday, December 31, 2020

शासना कडून पालघर नगर परिषदेला क्रीडांगण व पाण्याच्या टाकी साठी जागा मिळाली.आरोग्य सभापती अमोल पाटील यांच्या प्रयत्नाला यश.

शासना कडून पालघर नगर परिषदेला क्रीडांगण व पाण्याच्या टाकी साठी जागा मिळाली.आरोग्य सभापती अमोल पाटील यांच्या प्रयत्नाला यश.
पालघर (प्रतिनिधी) पालघर नगरपरिषदे तील शिवसेना पक्षाचे आरोग्य सभापती सन्मानीय श्री अमोल पाटील साहेब ह्यांनी सतत केलेल्या पाठपुराव्या मुळे आणी सर्व सन्मानीय सदस्याच्या सहकार्या मुळे आज दि.३१/१२/२०२० रोजी.                                                                                                                  *शासना कडून पालघर नगरपरिषदेला क्रिडांगण व पाण्याच्या टाकी साठी जागा दिली* 
सदर कामासाठी २०/०७/२०२० पासुन नगरपरिषद तर्फे  पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू होता.
पालघर नगरपरिषदेचेच्या हद्दीतील  मौजे - अल्याळी ,येथील स . न . ६५/अ पै . व गट नंबर १९८/१/अ एकूण क्षेत्र ३० २५ .५४  हे आर पैकी क्रिडांगणाकरीता १.७०.७  हे . आर व पाण्याची टाकी (ESR)  करीता .२०.०  हे . आर  असे एकूण १. ९० .०  हे . आर जमीन देण्यात आली .तसे पत्र मा जिल्हाधिकारी डॉ श्री माणिक गुरसळ साहेब ह्यानी नगराध्यक्ष  डॉ सौ उज्ज्वला काळे ,शिवसेना गटनेते श्री कैलास म्हात्रे साहेब,सर्व नगरसेवक व नगरसेविका ह्यांच्या उपस्थितीत   दिले .
एक चांगले क्रिडांगण आल्याळी येथेपालघर  नगरपरिषद तर्फे करणार   आहेत.
⛳️⛳️⛳️⛳️⛳️

Wednesday, December 30, 2020

दिग्गज वार्ताहर सकाळच्या बातम्या* दिनांक :- ३१.डिसेंबर २०२०वार :- गुरुवार

*दिग्गज वार्ताहर सकाळच्या बातम्या* 
दिनांक :- ३१.डिसेंबर २०२०
वार     :- गुरुवार

१) वादग्रस्त कृषी कायद्याचा तिढा कायम! केंद्र सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने शेतकरी संघटनांशी झालेली सहावी बैठक फोल

२) पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत कोणताही एकतर्फी बदल अस्वीकारार्ह; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडून स्पष्ट

३) राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सुरु केला 'ट्विटर पोल'; कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

४) भारतीयांना लशीसाठी प्रतीक्षाच! 'सीरम', 'भारत बायोटेक' च्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीची उद्या 1 जानेवारीला पुन्हा बैठक

५) उत्तर भारतात थंडीची लाट; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजधानी दिल्ली आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्येही तापमान घटले

६) हरयाणात शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा धक्का; दोन महानगरपालिका, तीन नगरपरिषदा गमावल्या

७) कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला अर्जेटिनामध्ये मंजुरी; अर्जेंटिनामधील महिलांच्या 20 वर्षांपासूनच्या चळवळीला अखेर यश

८) अमेरिकेतील एका प्रसिद्ध फॅन निर्मिती कंपनीने फॅनची पाती गळून पडू लागल्याने परत मागवले 1 लाख 90 हजार सिलिंग फॅन्स

९)भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: रोहित साठी मयांक किंवा विहारीला डच्चू; तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच

१०) प्रदर्शनापूर्वीच सलमान खानच्या चित्रपटाचा विक्रम; चित्रपट 'राधे' तब्बल 230 कोटींमध्ये 'झी स्टुडिओ'ने विकत घेतल्याची माहिती

नायगाव येथील खचलेल्या पुलाची तात्काळ पाहणी करताना(प्रतिनिधी)

नायगाव येथील खचलेल्या पुलाची तात्काळ पाहणी करताना
(प्रतिनिधी)आज दि. ३० जानेवारी रोजी *खासदार राजेंद्र गावित* यांनी *नायगाव(पूर्व) ता. वसई, जि. पालघर* येथील खचलेल्या पुलाची तात्काळ दखल घेऊन पाहणी करून संबंधितांना त्या बाबत कार्यवाही चे आदेश दिले. 
ह्या वेळी *खासदार राजेंद्र गावित साहेब* सोबत श्री. ठाकरे (अभियंता सा.बां. विभाग वसई) स. सुप्रीडेंट श्री. शेखर वर्मा  तसेच श्री. जगन्नाथ तांडेलजी व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

Tuesday, December 29, 2020

आलेवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रम सर्व्हे 173/1कडक कारवाई करून अतिक्रमणे दूर केली.

_ *🙏आलेवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रम सर्व्हे 173/1कडक कारवाई  करून अतिक्रमणे दूर केली. पालघर (प्रतिनिधी) दि.18/12/2020रोजी ग्रूप ग्रामपंचायत आलेवाडी गुंदवली च्या हद्दीतील सर्व्हे क्रं.173/1ह्या शासकीय जमिनीवर नव्याने केलेले अतिक्रमण गावच्या मा सरपंच सौ.अर्चना नाईक,मा उपसरपंच  श्री जगदिश ठाकूर, माजी सभापती सौ.मनीषा पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य सौ.संस्कृती पंडित,श्रीमती निरुपमा पिंपळे,श्री सचिन लोखंडे, दोन्ही गावचे पोलीस पाटील श्री महेंद्र ठाकूर व सौ मानसी जाधव, गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती श्री भरत पिंपळे,श्री राजू वाडीकर,माजी सरपंच सौ वैशाली राऊत मॅडम,माजी उप सरपंच श्री सुनील पंडित,श्री रुपेश गावड,श्री सतीश ठाकूर,श्री सागर वाडीकर,श्री कपिल पागधारे,श्री सुजित पंडित ,श्री संदीप नाईक व ग्रामस्थ श्री वासुदेव राऊत,श्री अनिल ठाकूर,सौ छाया सुर्वे,श्रीमती वासंती आरेकर,सौ निधी पाटील,सौ साधना ठाकूर,कु भावना ठाकूर,श्री रुपेश लोखंडे,श्री महेश जाधव,श्री अजय लोखंडे, श्री स्वप्नील पिंपळे तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थ काही नावे माहिती नसल्याने फक्त ग्रामस्थ असा उल्लेख केला आहे तरी समजून घ्यावे यांच्या सहकार्याने पोलीस संरक्षणात धडक कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात आले. त्यासाठी गेल्या 3ते4 महिन्या पासून .सरपंच सौ अर्चना नाईक व उपसरपंच श्री जगदीश ठाकूर  व सर्व ग्रा.पंचायत सदस्य यांनी शासनाच्या सर्व कायदेशीर परवानगी घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी सर्व प्रकारची माहिती घेऊन अतिक्रमण निष्काशीत (हटवण्याची)करण्याची तारीख ठरवून गेल्या  कित्येक वर्षांपासून चे अतिक्रमण हटविण्यात आले त्यासाठी सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे यांनी  सर्व ग्रामस्थांचे खरोखर मनापासून विशेष आभार मानले आणि तुमच्या हातून अशीच अजून चांगली कामे व्हावी अशी भावना ग्रामस्थ मंडळी करीत होती. तरी ह्या कामी वेळात वेळ काढून जे काही सहकार्य  ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी केले आहे त्या बद्दल ग्रुप ग्रामपंचायत आलेवाडी गुंदवली तर्फे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो श्री जगधिश ठाकूर उपसरपंच यांनी मानले  .
🙏 *_या पुढे 173/1 या जागेचा सर्वे करून त्या जागेवर असलेले सर्व अतिक्रमण हटवू अशी ग्वाही सरपंच,उपसरपंच व सदस्य यांनी सर्वांसमक्ष दिली_*.

दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या* दिनांक :- ३०.डिसेंबर २०२०वार। :- बुधवार

दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या* 
दिनांक :- ३०.डिसेंबर २०२०
वार।     :- बुधवार

१) प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील परेडला कोरोनाचा फटका, परेडची लांबी पाच किलोमीटरने घटवली

२) गुजरातमध्ये भाजपला गळती, खासदार मनसुख वसवा यांचा पक्षाला रामराम

३) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन् गावासाठी 30 लाखांचा विकासनिधी मिळवा; आमदार रोहित पवारांची घोषणा

४) अमेरिकेत सत्ता हस्तांतरणाचे नवे नाट्य; बायडेन यांचे ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप.

 ५)  ईडीचा वापर करुन राज्यातील  सरकार पाडता येणार नाही,                    अंधश्रद्धेतून बाहेर पडा : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

६) खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर; 5 जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स

७) नवी मुंबईत भाजपला खिंडार, दोन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

८) कार कंपनी 'जीप इंडिया' भारतात आपली नवीन दमदार एसयूव्ही जीप कंपासला नवीन फेसलिफ्ट मॉडलमध्ये लाँच करणार

९) वेस्ट इंडिज क्रिकेटच्या निवड समितीने बांग्लादेश दौऱ्यासाठीच्या वेस्ट इंडिजच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली

१०) झी मराठी वाहिनीची नवी मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

तंबाखू मुक्त शाळा कशी करावी या बाबत मार्गदर्शन. पालघर(प्रतिनिधी)

.तंबाखू मुक्त शाळा कशी करावी या बाबत मार्गदर्शन. पालघर
(प्रतिनिधी)

आज दिनांक 29.12.2020 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय पालघर अंतर्गत आर्यन हायस्कूल एज्युकेशन सोसायटी पालघर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात  व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते त्यात शिक्षक व शिक्षिका यांना तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम, कारणे, लक्षणे, तंबाखू मुक्त शाळा कशी करावी याबाबत 9 निकष पूर्ण कसे करावे व कोटपा कायदा तसेच एलो लाईन कॅपिंग विषयी सौ. अंजुबाई चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. विवेक किणी यांनी मानसिक आरोग्य विषयी माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमाला डी.एम.एच.पी. व एन.टी.सी.पी. टीम उपस्थित होते.त्यानंतर तंबाखू विषयी 
शपथ  घेण्यात आली  शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गावित यांनी सर्वांचे आभार मानले.

पालघर जिल्हातील 16 अनाथ बालकांना अनाथप्रमाणपत्र वाटपपालघर(प्रतिनिधी)

पालघर जिल्हातील 16 अनाथ बालकांना अनाथप्रमाणपत्र वाटप
पालघर(प्रतिनिधी) दि. 29 :- अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष पंधरवडयाचे आयोजन 14 ते 30 नोव्हेबर 2020 दरम्यान पालघर जिल्हातील 16 अनाथ बालकांना मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी ,पालघर यांच्या हस्ते अनाथप्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय/स्वंयसेवी बालगृहात दाखल होणा-या अनाथ मुलांना संस्थेतुन बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्या कारणाने, त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महिला व बाल विकास विभाग निर्णय दि.06 जुन 2016 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाअंतर्गत मान्यता प्राप्त संस्थामध्ये दाखल असलेल्या बालकांना व समाजातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देणेबाबत सुचना दिलेले आहे त्या नुसार जिल्हातील  पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ  प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरीता जिल्हा स्तरावर दि.14 ते 30 नोव्हेबर 2020 या कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात आला होता. सदरचा पंधरवडा दरम्यान पालघर जिल्हातील नारायण चंद्र ट्रस्ट नालासोपारा येथील बालगृहातील एकुण 16 अनाथ बालकांना मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी, पालघर यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी दिली.
*******

वसई येथिल विश्वराजा या मच्छिमार बोटीवर खोल समुद्रात मासेमारी करताना अज्ञात पर्ससीन बोटीकडून जिवघेणा हल्ला

वसई येथिल विश्वराजा या मच्छिमार बोटीवर खोल समुद्रात मासेमारी करताना अज्ञात पर्ससीन बोटीकडून जिवघेणा हल्ला
-------
मच्छिमारांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी व आपापसात सलोख्याने मासेमारी व्यवसाय करावा
--जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

पालघर (प्रतिनिधी). 29 :-  दि.28 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास दमण (गुजरात) समारीन 85 सागरी मैल अंतरावर वसई, जि.पालघर येथील 'विश्वराजा' क्र.IND-MH-6-MM-168 या नौकेच्या खलाशावर जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती वसई मच्दिमार सर्वोदय सहकारी संस्था मर्या., वसई या संस्थेचे अध्यक्ष यांनी दिली आहे.
दि.25/12/2020 रोजी वसई येथील विश्वराजा हि नौका मासेमारीसाठी गेली होती. सदरची नौका वसई पासून 85 सागरी मैल अंतरावर आपली मासेमारीची जाळी पाण्यात सोडत असताना दमण येथिल DD/०3/MM/०338 या पर्ससीन मासेमारी नौकेवरील खलाशी यांचेशी मासेमारीच्या जागेबाबत मज्जाव केल्याने इतर 7 ते 8 दमण येथील पर्ससीन नौकाधारक यांचे सोबत भांडण झाले व दमण येथील या मासेमारी नौकेवरील खलाशांनी वसई येथील विश्वराजा या नौकेस चारी बाजूने घेरुन सदरच्या नौकेस ठोकर मारुन बुडवण्याचा प्रयत्न केला व त्याचेवर जिवे मारण्याचा हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकारामुळे नौकेचे 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले असुन बोटीवरील खलाशी श्री मोजेस संज्याव अलिबाग (वय वर्ष 49) हे जखमी झाले आल्याचे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळविले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून नौकेची पहाणी करण्यात आली असून बोटीच्या नालेचा व गनवेलच्या भागाचे धडक बसल्याने नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. झालेल्या प्रकाराबाबत नौका मालक श्री.नितिन नाझरेथ बुदुल रा.पाचुबंदर, ता.वसई, जि.पालघर यानी वसई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी एलोगेट पोलिस ठाणे, मुंबई येथे वर्ग करण्यात आला आहे.
समुद्रात घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी घेतली असून मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे व आपापसात तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास सागरी कार्यद्यांतर्गत तसेच फौजदारी कायद्यान्वये संबंधीतावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या आहेत.
याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय. ठाणे (पालघर) श्री. आनंद पालव यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरीष्ठ कार्यालयास योग्य ती माहीती अवगत करुन दिली असून जिल्हाधिकारी, पालघर यांच्या सूचने प्रमाणे जिल्हातील सर्व सागरी मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी व आपापसातील सलोख्याने मासेमारी व्यवसाय करावा असे आवाहन केले आहे.
**********

Sunday, December 27, 2020

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्या* दिनांक :- २८.डिसेंबर २०२०वार। :- सोमवार

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्या* 
दिनांक :- २८.डिसेंबर २०२०
वार।    :- सोमवार

१) देशभरात प्रदूषणामुळे 17 लाख जणांचा मृत्यू; अनलॉकनंतर पुन्हा झाली प्रदूषणात वाढ

२) कश्मीरात दोन एके 47 रायफल्ससह बेपत्ता झालेल्या विशेष पोलीस अधिकार्याला अटक, जैशच्या तीन दहशतवाद्यांसह घेतले ताब्यात

३) कोरोनाची भीती दूर सारत पर्यटकांनी लुटला आनंद; कोकणातील समुद्रकिनारे गजबजले

४) महाराष्ट्रात लवकरच 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

५) 'यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये' काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले

६) पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स

७) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, तामिळनाडुसह अनेक राज्यांनी नवीन वर्ष साजरा करण्यावर घातली बंदी

८) सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या माध्यमातून भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पुनरागमन करण्यास सज्ज

९) रॉयल एनफील्ड कंपनी भारतात तीन नव्या बाईक आणि एक RE Himalayan ची अपडेट वर्जन लॉन्च करणार

१०) 'मुन्ना भाई ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अर्शद वारसीने दिली गुड न्यूज

सिन्नर येथील सरोजनी काळमेख यांनी आपल्या पतीचे सर्व अवयव दान करून निर्माण केला सामाजिक आदर्श. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

सिन्नर येथील सरोजनी काळमेख  यांनी आपल्या पतीचे सर्व अवयव दान करून निर्माण केला सामाजिक आदर्श. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 24 डिसेंबर रोजी. सिन्नर येथील साईबाबा पतसंस्थेचे  व्यवस्थापक विनायक सुधाकर काळमेख (वय 61) यांचा शिंदे गावाजवळ दारणा नदीच्या पुलावर गंभीर स्वरूपाचा अपघात झाला व त्यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. अपघात स्थळावरून त्यांना डॉक्टर संदीप खिवंसरा रा. पुणे यांनी काळमेख यांना सिन्नर फाटा, नाशिक रोड येथील साई केअर हॉस्पिटल येथे दाखल केले, साई केअर हॉस्पिटल येथून तपासणी करून त्यांना त्वरित गंगा ऋषिकेश हॉस्पिटल नाशिक येथे हलविण्यात आले येथे त्यांची तपासणी करण्यात आली व त्यांचा मेंदू मृत घोषित करण्यात आला याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना रुग्णाचे अवयव दान करण्याचे आवाहन केले व सांगितले आपल्या निर्णयाने  गरजूंना जीवदान मिळेल तरी आपण अवयवदानासाठी संमती द्यावी. रुग्णाच्या पत्नी सरोजनी काळमेख, मुलगा शंतनु, भाऊ चंद्रशेखर, पुतण्या अनय काळमेख,बहिण वैशाली जथे व माधुरी मंद्रे या सर्वांनी अवयव दानाची परवानगी दिली. डॉक्टरांनी त्यांच्या या अलौकिक निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले व काळमेख परिवाराला धन्यवाद दिले व शासकीय नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या व काळमेख परिवाराला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या परिवाराच्या संमतीने यकृत, फुफ्फुस, दोन मूत्रपिंड, दोन डोळे व त्वचा दान करण्यात आली. यकृत आणि फुफ्फुसे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, येथे ग्रीन कॉरिडॉर सुविधेसह संपूर्ण पोलीस सुरेक्षेमध्ये पुण्याला पाठविण्यात आली व त्यांची त्वचा नाशिक येथील त्वचा बँकेस तर डोळे डॉक्टर शरद पाटील यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले व त्यांचे दोन मूत्रपिंड यांचे गंगा ऋषिकेश हॉस्पिटल येथे तुषार तांदळे व शिल्पा जाधव यांना प्रत्येकी 1 मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टर विपुल गट्टाणी, डॉक्टर संजय रकिबे, डॉक्टर शेटे, डॉक्टर निकम, डॉक्टर चिमोटे, डॉक्टर देवरे, डॉक्टर नीनाद  देशमुख व भाऊसाहेब मोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.नाशिक येथे सर्व बाजूला काळमेख परिवाराच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

Saturday, December 26, 2020

दिग्गज वार्ताहर *दिनांक :- २७.डिसेंबर २०२०वार :- रविवार

*सकाळच्या बातम्या* 
दिग्गज वार्ताहर *दिनांक :- २७.डिसेंबर २०२०
वार      :- रविवार

१) 26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

२) प्रजासत्ताक दिन आणि आर्मी डे परेडसाठी दिल्लीत आलेले 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह; जवानांना दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये दाखल करण्यात आले

३) विद्युतीकरणामुळे रेल्वेची वार्षिक 14,500 कोटींची इंधन बचत, नोव्हेंबरपर्यंत 66 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

४) कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य नाही; दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांचे वक्तव्य

५) कोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष गाडी आजपासून धावणार; कणकवली, सावंतवाडीला थांबा

६) कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस 15 मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार

७) पश्चिम रेल्वेचा मराठी भाषेला दुजाभाव, मराठी भाषा विभागाने पत्र लिहून खडसावले

८) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघ जाहीर, अर्जुन तेंडुलकरला डच्चू तर 'सूर्यकुमार यादव' कडे कर्णधारपद सोपविले

९) फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात, iPhone 11 Pro ते Moto G5G स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार सूट

१०) सोनी लिवची ओरिजिनल सिरीज 'सँडविच फॉरेिव्हर' मध्ये अभिनेते अतुल कुलकर्णीची हटके भूमिका दिसणार

Friday, December 25, 2020

पालघर पोलीस स्टेशन मध्ये जुबेर धनानी ह्यांच्या वर गुन्हा दाखलपालघर (प्रतिनिधी)

पालघर पोलीस स्टेशन मध्ये  जुबेर धनानी ह्यांच्या वर गुन्हा दाखल
पालघर (प्रतिनिधी) पालघर मधील मोठे व्यापारी आणि मोठे प्रस्थ जे पालघर लायन्स क्लब  सारख्या तसेच मेमन कमिटीती च्या मेमन हॉस्पिटल पालघर सारख्या ट्रस्ट वर असलेला व्यक्ती इकबाल धनानी आणि त्याची दोन्ही मुलं हि पालघर मधील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून फरार झाले आहेत. त्या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पालघर येथील एका महिलेला इकबाल धनानी यांचे पुत्र आणि धनानी मोटर्स तसेच एल जी शोरूम चे मालक  झुबेर धनानी यांनी महिलेला फसवून लग्नाचा वायदा करून वारंवार शरीर संबंध ठेऊन, त्या महिलेला त्याच्या पासून दिवस गेले, आणि त्या साठी बोईसर सरावली येथील  साई साक्षी हॉस्पिटल मध्ये त्या महिलेचा तिच्या मना विरुद्ध गर्भ पात घडवून आणला, त्या नंतर त्या महिलेला लग्नाला नकार देऊन नंतर दि. 22 डिसेंबर रोजी परत त्या महिलेला आपल्या गाडीत भरून जबरदस्तीने त्या महिलेच्या मनाविरुद्ध परत जबरदस्तीने संबंध बनवून तिच्या वर धनानी पिता पुत्रांनी धमकावले आणि कुणाला सांगितल्यास मारून टाकू असे सांगितले सदर गुन्हा दि. 23 डिसेंबर रोजी पालघर पोलीस स्टेशन ला  दाखल झाल्या नंतर पासून धनानी पिता पुत्र फरार आहेत.  त्यांचा शोध पालघर पोलीस घेत आहेत. त्या संबधी तपास हा धीम्या गतीने होत असल्याचा महिलेचा आरोप आहे. ह्या संबधी धनानी परिवार महिलेवर तक्रार मागे घेण्या साठी दबाव बनवत आहेत. तसेच धनानी हे  पालघर मधील मोठे प्रस्थ असल्यामुळे हि या साठी महिले वर मोठ्या लोकांन कडून तक्रार मागे घेण्या साठी दबाव सुरु आहे.

Thursday, December 24, 2020

*आज २४ डिसेंबर**आज राष्ट्रीय ग्राहक दिन.*मोठ्या उत्सवात बोईसर मध्ये संपन्नबोईसर (प्रतिनिधी)


*आज २४ डिसेंबर*
*आज राष्ट्रीय ग्राहक दिन.*मोठ्या उत्सवात बोईसर मध्ये संपन्न
बोईसर (प्रतिनिधी)भारतात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खासगी, सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे. 
आपल्याकडून विकण्यात येत असलेल्या वस्तू किंवा सेवेतून ग्राहकाची लुबाडणूक होणार नाही याची काळजी घेणे कोणत्याही विक्रेत्याची नैतिक जबाबदारी असते. उत्पादनाची मूळ किंमत आणि अंतिम ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत यांच्यात मोठी तफावत असल्यामुळे मध्यस्थांची (एजंट) संख्या कमी करणे शक्य आहे. 
ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात किंवा योजना असू नये.
वस्तूमध्ये भेसळ असता कामा नये. ग्राहकांकडून घेण्यात आलेल्या मोबदल्याच्या बदल्यात त्या दर्जाची वस्तू किंवा सेवा पुरवली गेली पाहिजे.
ग्राहकांचे भौतिक संरक्षण करणे.
वस्तूची किंमत कमी करणे शक्य असल्यास ती कमी करून ग्राहकांना त्याचा फायदा मिळवून देणे. 
ग्राहकांच्या तक्रारीचे योग्य पद्धतीने निरसन करणे.
ग्राहकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे. 
ग्राहकांना खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे.
ग्राहकांना उत्पादन आणि बदलत्या बाजारपेठेबद्दल माहिती देऊन साक्षर करणे.राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून बोईसर येथे कार्यक्रम संपन्न.
 करोनाच्या पार्श्व भूमीवर पाहता सर्व प्रकाची सुरक्षा करून व सुरक्षित अंतर मास्क चा वापर करून  बोईसर मधील ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहकदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून बोईसर तारापूर मधील कुढण येथील सॉलिसिटर हॉटेलच्या हॉल मध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला .खरे तर हा कार्यक्रम सरकारी असल्यामुळे.कलेक्टर च्या अधिपत्याखाली करण्यात आला पाहिजे. 
पण सरकारी अधिकारी वर्गाची  उदासीनता पाहता हा कार्यक्रम हा  ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या  संवस्थेच्या माध्यमातून  बोईसर मध्ये मागील ३ वर्षा पासून साजरा करीत आहे.ह्याला फ्रुडअँड ड्रग व वजन माप यांचे देखील अधिकारी  यांनी देखील या कार्यक्रमाला .हजेरी लावायची उदासीनता दाखवत असते.  म्हणून बोईसर मधील ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या संवस्थेनी ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचा त्रासा पासून  व बऱ्याच ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीपासून न्याय मिळून दिला आहे.या संवस्थे कडे बऱ्याच तक्रारी येत असतात.तसेच ग्राहकांना   आत्ता बऱ्याच  वेळी  मद्दत करून त्यांना न्याय मिळून दिला जातो.तसेच आपल्या क्षेत्रातील खेळाडू,नामवंत उद्योजग,समाज सेवक, व यांचा देखील ह्या संवस्थें तर्फे मानपत्र,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत असतो.ह्या  कार्यक्रमाला सरकारी अधिकारी  येणे गरजेचे असताना देखील हे सरकारी अधिकारी ह्यांना ह्या कार्य क्रमात उपस्थिती देण्यास वेळ देत नाहीत ही उदासीनता दिसून येते.अशी ही खेदाची बाब आहे. आज ह्या कार्य क्रमाच्या उद्घाटक मा.सौ भारती ताई कामडी यांनी(जिल्हा परिषद अध्यक्ष व राज्य मंत्री दर्जा )  यांनी श्री गणेशमूर्ती च्या  प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.तसेच ग्राहकांचे होणारे फसवणुकी संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती दिली व या संवस्थेला कोणतीही मदत लागली तर आम्ही आपणास सहकार्य करू असे सांगितले .  विधानसभा बोईसर चे आमदार मा.श्री राजेश पाटील यांनी देखील ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत .यांच्या देखील तक्रारी आमच्या पर्यंत येत असतात .आम्हाला आपल्या ग्राहक संवस्थे कडे मार्गदर्शन साठी पाठाऊ.श्री मिलींद चूरी ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे  चे जिल्हा अध्यक्ष. व   श्री. विनोद गायकवाड .महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  यांनी देखील संवस्थें संदर्भात थोडक्यात माहिती दिली.या संवस्थेचे सल्लागार  विकल श्री दीपक सावले यांनी देखील थोक्यात माहिती दिली. संवस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री डी व्हीं.पाटील यांनी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन च्या संवस्थे सदर्भात पूर्ण माहिती देऊन मार्ग दर्शन केले.या नंतर श्री गजानन पाटील (प्रोजेक्ट ऑफिसर)यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूक चे  प्रात्यकशिक रित्या  फसवणूक कशी होते ते दाखाऊन सभासदांची मने जिंकून घेतली .नवीन सदस्यांना ह्याची माहिती व मार्ग दर्शन मिळाल्या मुळे पुढील वाटचाल आम्ही जोमाने करणार असे सदस्य बोलत होते.या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री संतोष राणे .राष्ट्रीय उपाध्यक्ष , ,रियाज मुल्ला, सौ.दर्शना डी पाटील,प्रवीण पाटील,रुचिता पाटील,विजय शेट्टी,निलेश नगरकर,मंगेश नगरकर,प्रीती सामंत,चारुशीला प्रभू, रवि राठोड,प्रिया,दीप्ती महाडिक,गिरीश देव,महेश संखे,मंगेश राऊत,
या कार्य क्रमाचे सूत्र संचालन निलेश भोईर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री विनोद गायकवाड यांनी केले.

कोरोना योद्धांच्या यादीत खासदार हेमंत गोडसे देशात सहावे तर राज्यात पहिल्या स्थानावर.नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

कोरोना योद्धांच्या यादीत खासदार हेमंत गोडसे देशात सहावे तर राज्यात पहिल्या स्थानावर.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
‘गव्हर्न आय’ संस्थेच्या सर्वेक्षणातील तपशील; नागरिकांनी दिली गोडसेंनी सर्वाधिक गुणांकन;
नाशिकचा नावलौकीक देशात पोहचविला

 नाशिक : कोरोना या महामारीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी तसेच उपचाराविषयीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी विशेष उपाययोजना करणाऱ्या खासदारांच्या कामाचा गुणात्मक अहवाल दिल्ली येथील ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) या संस्थेने आज जाहिर केला आहे. या संस्थेच्या खास आणि विश्वसनीय सर्वेक्षणातून खासदार हेमंत गोडसे यांचा देशात सहावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे. खासदार गोडसे यांच्या उत्तम कामगिरीचा लौकीक या निमित्ताने अवघ्या देशभरात पोहचला आहे. कोरोना काळात खा. गोडसे यांनी दिलेल्या उत्तम सेवेची नोंद देशपातळीवर घेतल्याने जिल्हावासियांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोनाने देशभरात थैमान घातल्याने २४ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या आठ महिन्यांपासून आपण सर्वजण कोविड-१९ संकटाशी झुंज देत आहोत. मात्र या काळात लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी केलेली समाजपयोगी कामे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली आहे. याबाबत ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) संस्थेच्या प्रशासनाने दिलेली अधिक माहिती अशी की, या संस्थेतर्फे २४ मार्च २०२० ते ३० ऑक्टोबर २०२० या काळात देशभरातील खासदारांनी केलेल्या कामाचा सर्वे करण्यात आला. या कामासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर विशेष नामांकन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून प्रथम आलेल्या ५० खासदारांची निवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या विशेष पथकांनी गोपनिय पद्धतीने ५०  खासदारांच्या मतदारसंघात जावून प्रत्यक्ष कोविड-१९ झुंज देण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांची तसेच कामांची पाहणी करण्यात आली. या ५० खासदारांमधून प्रथम पहिले २५ खासदारांची खास निवड करण्यात आली. त्यानंतर पथकांनी त्या-त्या मतदारसंघातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, संस्था, सामाजिक संस्था, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून संवाद साधला. त्यानंतर ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) या संस्थेने देशभरातील ‘टॉप १०’ ची घोषणा आज केली आहे. यात खासदार हेमंत गोडसे देशात सहाव्या क्रमांकावर तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा खासदारांच्या यादीत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा देखील समावेश आहे. या सर्वेक्षणात खासदार गोडसे यांना ६६ पॉइर्ट गुणांकन तर २३ हजार ८५३ गुणांची विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात कोविड-१९ काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात विशेष परिश्रम घेतले असल्याने नाशिकचा नावलौकीक देशात पोहचविला आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून बोईसर येथे कार्यक्रम संप्पन.

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून बोईसर येथे कार्यक्रम संप्पन.
बोईसर (प्रतिनिधी) करोनाच्या पार्श्व भूमीवर पाहता सर्व प्रकाची सुरक्षा करून व सुरक्षित अंतर मास्क चा वापर करून  बोईसर मधील ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहकदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून बोईसर तारापूर मधील कुढण येथील सॉलिसिटर हॉटेलच्या हॉल मध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला .खरे तर हा कार्यक्रम सरकारी असल्यामुळे.कलेक्टर च्या अधिपत्याखाली करण्यात आला पाहिजे. पण सरकारी अधिकारी वर्गाची  उदासीनता पाहता हा कार्यक्रम हा  ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या  संवस्थेच्या माध्यमातून  बोईसर मध्ये मागील ३ वर्षा पासून साजरा करीत आहेत.ह्याला फ्रुडअँड ड्रग व वजन माप यांचे देखील अधिकारी  यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावायची उदासीनता दाखवत आहेत.  म्हणून बोईसर मधील ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या संस्थेनी ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचा त्रासा पासून  व बऱ्याच ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीपासून न्याय मिळून दिला आहे.या संस्थे कडे बऱ्याच तक्रारी येत असतात.तसेच ग्राहकांना   आत्ता बऱ्याच  वेळी  मद्दत करून त्यांना न्याय मिळून दिला जातो.तसेच आपल्या क्षेत्रातील खेळाडू,नामवंत उद्योजग,समाज सेवक, व ईतर  यांचा देखील ह्या संस्थें तर्फे मानपत्र,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत असतो.ह्या  कार्यक्रमाला सरकारी अधिकारी  येणे गरजेचे असताना देखील हे सरकारी अधिकारी ह्यांना ह्या कार्यक्रमात उपस्थिती देण्यास वेळ देत नाहीत ही उदासीनता दिसून येते.अशी ही खेदाची बाब आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटक मा.सौ भारतीताई कामडी यांनी(जिल्हा परिषद अध्यक्ष व राज्य मंत्री दर्जा )  यांनी श्री गणेशमूर्ती च्या  प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.तसेच ग्राहकांचे होणारे फसवणुकी संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती दिली व या संस्थेला कोणतीही मदत लागली तर आम्ही आपणास सहकार्य करू असे सांगितले .  विधानसभा बोईसर चे आमदार मा.श्री राजेश पाटील यांनी देखील ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत .यांच्या देखील तक्रारी आमच्या पर्यंत येत असतात .आम्हाला आपल्या ग्राहक संस्थे कडे मार्गदर्शनासाठी पाठाऊ.श्री मिलींद चूरी ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे  चे जिल्हा अध्यक्ष. व   श्री. विनोद गायकवाड .महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  यांनी देखील संस्थें संदर्भात थोडक्यात माहिती दिली.या संस्थेचे सल्लागार  विकील श्री दीपक सावले यांनी देखील थोक्यात माहिती दिली. संस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री डी व्हीं.पाटील यांनी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन च्या संस्थे सदर्भात पूर्ण माहिती देऊन मार्ग दर्शन केले.या नंतर श्री गजानन पाटील (प्रोजेक्ट ऑफिसर)यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूक चे  प्रात्यकशिक रित्या  फसवणूक कशी होते ते दाखाऊन सभासदांची मने जिंकून घेतली .नवीन सदस्यांना ह्याची माहिती व मार्ग दर्शन मिळाल्या मुळे पुढील वाटचाल आम्ही जोमाने करणार असे सदस्य बोलत होते.या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पदाधिकारी  श्री संतोष राणे .राष्ट्रीय उपाध्यक्ष , श्री,रियाज मुल्ला, सौ.दर्शना डी पाटील,श्री.प्रवीण पाटील,सौ.रुचिता पाटील,श्री.विजय शेट्टी,श्री.निलेश नगरकर,श्री.मंगेश नगरकर,सौ.प्रीती सामंत,सौ.चारुशीला प्रभू, श्री.रवि राठोड,सौ.प्रिया,श्रीमती.दीप्ती महाडिक,श्री.गिरीश देव,श्री.महेश संखे,श्री.मंगेश राऊत,
या कार्य क्रमाचे सूत्र संचालन श्री. निलेश भोईर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री विनोद गायकवाड यांनी केले.

25,26,व 27 डिसेंबर 2020 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय पालघर नियमितपणे सुरू राहिल

25,26,व 27 डिसेंबर 2020 रोजी 
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय पालघर नियमितपणे सुरू राहिल
पालघर(प्रतिनिधी) दि. 24 :- ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याचे पोहोच पावती जोडणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून दिनांक 25,26,व 27 डिसेंबर 2020 ह्या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर हे कार्यालय नियमितपणे सुरू ठेवण्यात आले आहे. असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांनी कळविले आहे.
*******

शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत राहण्यासाठी28 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत मनाई आदेश लागु

शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत राहण्यासाठी
28 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत मनाई आदेश लागु
पालघर(प्रतिनिधी) दि 24 :- मराठा समाजास शिक्षण व नोकरीत देण्यात आलेल्या आरक्षणास मा.सर्वाच्च न्यायालय यांनी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मराठा आरक्षण कृती समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पक्ष यांचेकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात येत आहेत.
सदर मराठा समाजास लागू करण्यात आलेले आरक्षण तात्काळ मिळावे या मागणीकरीता राज्यभरात विविध मराठा संघटनांकडून ठिकठिकाणी बैठका आयोजित केल्या जात असून मराठा समाजात लवकरात लवकर आरक्षण मिळावे, या करीता जिल्हयातील खासदार, आमदार, मंत्री यांचे निवासस्थान /कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन अशा विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. भविष्यात सदर बाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर वरील संघटनांकडून अचानकपणे रास्ता रोको करणे, धरणे धरणे, मंत्री महोदय यांचे दौरा दरम्यान निवेदने देणे, घेराव घालणे, घोषणाबाजी करणे अशा प्रकारची आंदोलने करण्याची भविष्यात शक्यता नाकारता येत नाही व त्यावरुन आंदोलने होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाने संसदेत 1) कृषी उत्पन्न, व्यापार आणि वाणिज्य 2) कृषी मुल्य आश्वासन, 3) कृषी सेवा करार अशी 03 विधेयके मंजूर केलेली आहेत. सदर विधेयकास देशभरातील तसेच राज्यातील शेतकरी शेतकरी संघटना/ राजकीय पक्ष यांचेकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. विधेयके मंजूर झाल्याने विविध स्वरुपाची उग्र आंदोलने होऊन भारत बंद सुध्दा पुकारण्यात आलेला होता. वरील तिन्ही विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे भविष्यात वरील 03 ही विधेयके रद्द व्हावीत या मागणी करीता शेतकरी व शेतकऱ्यांना पाठींबा देणाऱ्या विविध संघटना व राजकीय पक्षाकडून आंदोलने चालू आहेत.
वाढवण, ता.डहाणू येथील नियोजित "वाढवण बंदर" या प्रकल्पास वाढवण परीसरातील ग्रामस्थ, वाढवण विरोधी संघर्ष समिती, विविध राजकीय पक्ष व स्थानिक पातळीवरील विविध संघटनांनी रॅली काढून व निदर्शने करुन नियोजित वाढवण बंदर प्रकल्प रद्द करावा या मागणीकरीता मोठया प्रमाणात विरोध दर्शविलेला आहे. तसेच भविष्यात वाढवण बंदर अनुषंगाने कोणतेही काम करावयाचे ठरविल्यास (सर्व्हे, जमीन मोजणी, माहिती गोळा करणे) ग्रामस्थांकडून, संघटनांकडून व राजकीय पक्षांकडून मोठया प्रमाणात विरोध करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जावू शकतो.
तसेच रिलायन्स कंपनी कडून पालघर जिल्हयात गॅस वाहून नेण्याकरीता पाईप लाईनचे काम करण्यात आलेले आहे. सदर कंपनीकडून अद्यापही काही प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांवर अन्याय झाला असलेबाबत वेळोवेळी बैलगाडी, मोर्चा, उपोषण, धरणे, आंदोलने इत्यादी आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतू आपणास अद्यापही रिलायन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
कोविड-19 च्या लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचेकडून वितरीत झालेली विज बिले ही वाढीव असल्याच्या कारणावरुन विविध संघटनांनी व राजकीय पक्षाने मोठया प्रमाणात विज बिले कमी करावीत या मागणीसाठी मोठया प्रमाणात आंदोलने केलेली असून भविष्यात ती विज बिले कमी न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
कार्यकारी अभियंता एम.एम.आर.डी.ए. यांचे मार्फत सुर्या प्रादेशिक पाणी पुरवटा योजने अंतर्गत मौजे वैती, ता.डहाणू येथे प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्राचे कामकाज करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वेती गावातील नियोजित प्रकल्पाचे ठिकाणी असणाऱ्या जागेवरील वृक्ष तोड, कम्पाउंड घालणे व इतर कामे विविध विभागामार्फत दि.21/12/2020 रोजी पासून पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आलेली आहेत. सदर प्रकल्पास स्थानिक लोकांचा अजूनही विरोध असल्याने वृक्ष तोडणी व कम्पाऊंड घालणे या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
कोविड-19 च्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये घडलेल्या घटनांबाबत काही संस्था, काही राजकीय गट, काही राजकीय व्यक्ती यांच्याकडून राज्य सरकारने केलेल्या कामाचे कौतूक तसेच राज्य सरकारने कोविड-19 बाबत राबविलेल्या योजनांवरुन समज व गैरसमज पसरवून त्यातून वाद-विवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी नाताळ सण, दत्त जयंती तसेच 31 डिसेंबर वर्ष अखेर व नुतन वर्षाअभिनंदनचे अनुषंगाने नागरीक मोठया प्रमाणात एकत्र येऊन सदरचे सण उत्सव साजरे करीत असतात. पालघर जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशिल आहे. या उत्सवा दरम्यान क्षुल्लक कारणावरुन विघातक कृत्य करणारे समाज कंटक, जातीय गुंड याचा फायदा घेवून समाजात तेढ निर्माण करुन अशांतता निर्माण करणे अशी कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य जनजीवन सुरळीत व शांततामय स्वरुपात राहावे, सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घड़ू नये त्याच प्रमाणे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास या कलमान्वये आदेशात नमुद असावे. याकरीता वरील घटनांच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यात (वसई तालुका वगळून) हद्दीत दि. 28/12/2020 रोजीचे 00.01 वा. पासून ते दि.10/01/2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) व कलम 37 चे पोट कलम (3) चे स्वतंत्र आदेश लागू करणेस विनंती आहे. असे कळविले आहे.
उपरोक्त नमुद परिस्थितीनुसार पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी पालघर  डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पालघर जिल्हयातील पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 28/12/2020 रोजीचे 00.01 पासून ते दिनांक 10/01/2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत या कालावधीमध्ये खालील बाबीसाठी मनाई आदेश लागू करीत आहे.

१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, 6. अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
२) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
३) दगड किंवा क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे. किंवा तयार करणे.
4) त्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.
वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.
त्याच प्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक पालघर यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यांस किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न कार्यासाठी जमलेले लोक प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणूका यांना लागू असणार नाही.
**********

पीसीपीएनडीटी" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल थोरातपालघर(प्रतिनिधी)

"पीसीपीएनडीटी" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल थोरात
पालघर(प्रतिनिधी) 
दि. 24 :- जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी "पीसीपीएनडीटी" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल थोरात यांनी संबंधित यंत्रणेला बुधवारी 23 डिसेंबर रोजी केली. पंचायत समिती हॉल पालघर येथे 23 डिसेंबर रोजी पीसीपीएनडीटी व एमटीपी कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनिल थोरात व डॉ.राजेंद्र केळकर होते त्यावेळी सल्लागार समितीचे सदस्य डॉ.पोसम, डॉ. नारायणकर, श्रीम.वैराळे, तसेच वैद्यकिय अधिक्षक डॉ.मराड, डॉ हेंगणे, डॉ.शंतनु, डॉ.वाणी, डॉ.विश्वकर्मा आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्हा कायदा सल्लागार अॅड.सीमा साठे यांनी कायद्या संदर्भातील नियम सोनोग्राफी व एमटीपी कशाप्रकारे तपासावे. रेकॉर्ड कसे जतन करावे याबदद्ल मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित असलेले अधिकारी यांनीही गर्भलिंग निदान व गर्भपात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल थोरात यांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत रिपोर्टींग करणे. तसेच सर्व रेकॉर्ड कायदेशीर सांभाळून ठेवणे. प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा असुन असे कृत्य होताना आढळल्यास आपण 1800-233-4475 या हेल्पलाईन क्रमांकावर तथा www.amchimulgi.com या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याच्या संदर्भात माहिती देण्यात शासनास याबाबत माहिती देणाऱ्यास बक्षिस योजने अंतर्गत रु.1,00,000/- पर्यंत बक्षीस देण्यात येईल असे स्टिकर प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी लावण्याबाबत सुचना करण्यात आल्या. तसेच अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर यांनी जिल्ह्यातील भ्रुणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी व मुलींचे प्रमाण जास्त असावे याकडे सर्वानी लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच काळाची गरज असून पीसीपीएनडीटी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या. अशाप्रकारे कार्यशाळा संपन्न झाली .
*******

Wednesday, December 23, 2020

* दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या* दिनांक :- २४.डिसेंबर २०२०वार :- गुरुवार

* दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या* 
दिनांक :- २४.डिसेंबर २०२०
वार      :- गुरुवार

१) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला, तीन जवान जखमी

२) - येत्या २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार, कृषी कायद्यांबाबत मार्गदर्शन करणार

३) आम्हाला सुधारणा नकोय, कृषी कायदेच रद्द करा - दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट

४) - ब्रिटनमध्ये कोरोनाचा विषाणूचा आणखी एक प्रकार आढळला - आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांची माहिती

५) ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजाला EWS चा लाभ मिळणार, शिक्षण-नोकरीत होणार फायदा

६) । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 6 हजार 371 वर; तर पर्यंत 48 हजार 969 जणांचा मृत्यू

७) - परभणीमधील गंगाखेडच्या जीएसईएल कंपनीवर कृषी कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीची टाच; 255 कोटींच्या मालमत्तेवर जप्ती

८) । अॅमेझॉन कंपनीला अंतराळ व्यवसायात रस, नव्या अंतराळ नियामकाकडे अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने केला अर्ज

९) भारत-ऑस्ट्रेलिया अखेरचे कसोटी सामने सिडनीतच खेळवण्यास आम्ही सज्ज - सिडनी क्रिकेट समितीचे टॉनी शेफर्ड यांची माहिती

१०) - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा '12ओ क्लॉक: अंदर का भूत' हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

*नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य बिरासा मुंडा यांचे स्मारकात्म्क पुतळे उभारावेत - खासदार राजेंद्रजी गावित साहेब*

*नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य बिरासा मुंडा यांचे स्मारकात्म्क पुतळे उभारावेत - खासदार राजेंद्रजी गावित साहेब*
 पालघर (हिरालाल लोखंडे)  १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा  घोषित करण्यात आला. सर्व जिल्हा मुख्य कार्यालये एकाच संकुलात उभी रहावीत ह्या करिता पालघर कोळगाव डेअरी येथील शासकीय जमीन देण्यात आली. तेव्हा पासून जिल्हा कार्यालयाचे काम प्रगती पथावर सुरू झाले. 
प्रचंड मोठ्या परिसरात पसरलेल्या ह्या जिल्हा कार्यालयाला तसेच नागरिकांच्या सुलभ सोयी करिता एक लॅंडमार्क म्हणून खालील सूचित भव्य स्मारकात्म्क पुतळे(Statue) उभारण्यात  यावेत  अशी मागणी माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब ह्यानी जिल्हाधिकारी पालघर ह्याच्या कडे केली ,त्या वेळेस पालघर नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला काळे व शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे उपस्थित होते .
१) छत्रपती शिवाजी महाराज:- महाराष्ट्राचे आरध्य दौवत, प्रशासनात शिस्तबद्धता, न्यायदानात निस्पृहता अशी ख्याति असलेल्या रयतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या थोर महाराजांचे भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा. 
२) डॉ. बाबसाहेब आंबेडकर:- सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याचे तसेच स्वातंत्र, समता आणि बंधुताची शिकवण देणारे  भारतीय संविधनाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा. 
३) क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा:-  आदिवासीचे हक्क, स्त्रीयांचे स्वातंत्र्य यांच्या साठी लढा देणारे आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिसूर्य वीर बिरासा मुंडा यांचा भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा.  
जिल्हाधिकारी  मा श्री माणिक गुडसर साहेब ह्यानी त्यास सकारात्मक   प्रतिसाद दिला व मा खासदारान सोबत चर्चा केली .

Tuesday, December 22, 2020

कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपल बोर यांना सबसिडी द्यावी : खासदार हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपल बोर यांना सबसिडी द्यावी : खासदार हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन.
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

        नाशिक : कृषि उत्पादनात देशात नाशिक अग्रेसर असून येथील शेतमालाला देशभरातील बाजारपेठत सहज पोहचविता यावे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली ते दानापूर हि विशेष कृषि रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील कृषि उत्पादनांना अवघ्या काही तासात कुठल्याही बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य झाले आहे. द्राक्ष उत्पादनात नाशिक देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला पन्नास टक्के सबसिडीतून वगळण्यात आलेले असून या पिकांचा रेल्वे वाहतुकीच्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये तातडीने समावेश करावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषी तथा अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

महावितरणची वीज चोराविरोधात धडक कारवाई सफाळे-- ( हिरालाल लोखंडे) )

महावितरणची वीज चोराविरोधात धडक कारवाई 
सफाळे-- ( हिरालाल लोखंडे) ) वीज -चोरी हा आजचा विषय नाही,यामुळे त्यावर कारवाई होऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, काही ठिकाणी खुल्ले आमपणे संध्याकाळ नंतर वीजमंडळच्या विद्युत भारीत वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी होते तर काही ठिकाणी मीटरच्या मागे छुप्या वायरी टाकून. 
वीज चोरीला आळा ( बंदी) ) घालण्यासाठी सफाळे उपविभागातील सोनाव -- मुस्लीम पाडा, टेंभिखोडावे, केळवा, जलसार, विराथन ख्रु. विराथन ब्रु.  मांडे माकणे, वेढी, व इतर गावामधून अचानक धाडसत्र टाकून एकूण ६२ ग्राहकांनी केलेली ६६८०४ युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. त्या वीजचोरा विरुध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ च्या अनुसार कारवाई करुन वीजचोरीपोटी देयक ( बिल ) रूपये ८७१८७५ /- ( अक्षरी आठ लाख एकात्तर हजार आठशे पंच्याहत्तर रूपये ) चे वीजचोरीपोटी देयक ((बिल ) व तडजोड रक्कम रूपये २,०९००० /- ( अक्षरी दोन लाख नऊ हजार )वसूल होणार आहे ,अजुनही १५ विजग्राहक यांना अनाधिकृत पणे विजेचा वापर  करताना पकडण्यात आले असून रूपये ६,०६९०१ /- ( अक्षरी सहा लाख  सहा हजार नऊशे एक रूपये ) रूपये यांची देयक ( बिल ) देण्यात आली असून यापुढेही विजचोरा विरूध्द अशीच कारवाई सुरू राहणार आहे 
      श्री, दिनेश अग्रवाल -मुख्य अभियंता महावितरण कल्याण परिमंडळ, सौ, किरण नागावकर -- अधिक्षक अभियंता पालघर मंडळ, श्री, प्रताप मचिये - कार्यकारी अभियंता पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री, मुकुंद देशमुख - उपकार्यकारी अभियंता सफाळे विभाग यांच्या नेतृत्वाखाली श्री विक्रम ईदाते श्री तात्यासो जगताप श्री वेंकटेसन श्री राहुल शिलावंत सर्व सहाय्यक अभियंता सफाळे विभाग तसेच महावितरणांचे कर्मचारी यांनी विजचोरा विरूध्द मोहिम राबवून महावितरणास लाखो रूपयांचा फायदा करून दिल्याने वरिष्ठ पातळीवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तर विजचोर धास्तावले आहेत

*तुम्ही सर्वानी एकी ठेवा मी तुमच्या सोबत आहे - खासदार गावित साहेब*

*तुम्ही सर्वानी एकी ठेवा मी तुमच्या सोबत आहे  -  खासदार  गावित साहेब* 
बोईसर (प्रतिनिधी)रेल्वेचा दुपदरी पुल काटकरपाडा (बोईसर ता व जि  पालघर ) येथून जाणार आहे ह्या बाबत काटकरपाड्यातील अनेक वर्षे राहणाऱ्या नागरीकांचा विरोध आहे .तशा नोटीसा वृत्तपत्रात  प्रसिद्ध झाल्या आहेत .
म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्याना काटकरपाड्यातील रहीवाशानी बोलाविले व आपले गाऱ्हाणे खासदार गावित साहेबान समोर मांडले  तेव्हा खासदार गावित साहेब म्हणाले तुम्ही सर्वानी एकी ठेवा मी तुमच्या सोबत आहे .
बोईसर ग्रामपंचायती मध्ये असलेला काटकर पाड्यात शंभर ते दीडशे वर्षे आदिवासी समाज रहातो व शेती व कामधंदा करतो .
पेसा कायद्या अंतर्गत येणाऱ्या काटकर पाडा ,रेल्वेच्या दुपदरी पुला मुळे  पुर्ण पणे उध्वस्त होणार आहे .  तसेच शेतीची सुपीक जमीन ही ह्या पुलामुळे जाणार आहे .
मा खासदार श्री गावित साहेबानी रहीवाश्याना एक जुटीने राहण्याचे आवाहन केले व ह्या समंधी  रेल्वे आधीकारी व भूसंपादन आधीकार्याशी बैठक घेउन  न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे सांगीतले.

इ.1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम

इ.1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम 
31 मार्च 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे पालकांना आवाहन.
पालघर(प्रतिनिधी) दि. 22 :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-2018/प्र.क्र.244/भाग-2/एस.डी.1 दि.29/09/2020. नुसार पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक अंतर्गत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.1ली ते 12 वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणे व अद्यावतीकरणाचे काम पूर्ण करून संबधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम करण्यासाठी प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन याप्रमाणे एकूण 16 आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे कामकाज करण्यासाठी आधार ऑपेरेटरची सेवा शासन स्तरावरून त्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध करून घेण्यात आली आहे त्यानुसार प्रायोगिक तत्वावर पालघर आणि वसई तालुक्यांची निवड केलेली आहे व या तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे चार आधार ऑपेरेटर देण्यात आलेले आहेत. संबधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी हे नोडल ऑफिसर असल्याने आपल्या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.1ली ते 12 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणेचे काम 100% पूर्णपणे विनामुल्य करावयाचे आहे. तसेच उर्वरित गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बाबतचे पूर्व तयारी व नियोजन करावे.
जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ पालघर जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन करतात कि, इ.1ली ते इ. 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या बालकांचे आधारकार्ड काढलेले नाहीत किंवा आधारकार्डमध्ये चुका किंवा बदल (नाव, जन्मतारीख, लिंग) असल्यास दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार संपर्क साधून करावे.
***********

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी 24 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत.

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी 
24 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत.

पालघर(प्रतिनिधी) दि. 22 :- राष्टीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासनमार्फत  जिल्हा/विभागीय/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2020-21 या वर्षात पालघर जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवा महोत्साव या योजनेअंतर्गंत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन/व्हर्च्युअल आयोजन करण्यात येत आहे. सदर युवा महोत्सावामध्ये सहभागी युवकांचे वय 15 ते 29  वर्षाच्या आतील असावे. युवा महोत्सवामध्ये खालील कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
1) सांघिक बाबी   :- लोकनृत्य,लोकगीत
(2) वैयक्तिक बाबी :- एकांकिका (इंग्रजी व हिंदी)
(३) शास्त्रीय गायन :- हिंदुस्तानी, कर्नाटकी
(4)वकृत्व :- ऐनवळी देण्यात येणारा विषय
(5 )शास्रीय नृत्य:-,मणिपुरी,भरतनाट्यम,कुची पुडी , कथक, ओडिसा
(6)शास्त्रीय वादन :- सितार,बासरी, तबला,विणा,मृदंग,हार्मोनियम,गिटार अशा स्पर्धात्मक बाबीमध्ये युवकांना सहभागी होता येईल.
तरी जिल्हास्तरीय युवा महोत्सावामध्ये सहभागी होण्याकरिता आपले प्रवेश अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर येथे प्रवेशिका अर्ज सादर कराव्यात. ज्या युवक-युवतीचे व संस्था यांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील त्यांना ऑनलाईन लिंक  व जिल्हास्तरीय स्पर्धाची तारिख कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी श्रीमती विद्या भदाणे 9561392699,  9321413340 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे शरद कलावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांनी आवाहान केले आहे.
टिप :- देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन कोणत्याही प्रकाराचे  एकत्रीकरणास मनाई आहे.
*******

वाशिंद येथील दहागांव देसलेपाडा रस्त्याचे काम निकृष्ट,दोन ते तीन दिवसात रस्त्याला पडल्या भेगा.वाशिंद दहागाव येथील ग्रामस्थांनी केली गुणनियंत्रण पथकाद्वारे रस्त्याच्या चाचणीची मागणी .

वाशिंद येथील दहागांव देसलेपाडा  रस्त्याचे काम निकृष्ट,दोन ते तीन दिवसात रस्त्याला पडल्या भेगा.
वाशिंद दहागाव येथील ग्रामस्थांनी                        केली गुणनियंत्रण पथकाद्वारे  रस्त्याच्या चाचणीची मागणी .
शहापूर (हिरारालाल लोखंडे)शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी लहान मोठे रस्ते तयार होत असतात.चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत म्हणून येथील जनतेकडून सरकारकडे वारंवार मागणी होत असते. त्यानुसार सरकारही दरवर्षी विविध रस्त्यावर कोट्यावढी रुपये खर्च करते. परंतु याकामी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांमुळे तयार झालेले रस्ते वर्ष - दोनवर्षे ही टिकत नसल्याची अनेक उधाहरणे आहेत.
शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील दहागांव - देसले पाडा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दहागांव येथील ग्रामस्थांच्या सांगण्या प्रमाणे वाशिंद ते कांबारा   रस्त्याचे काम सुरु करण्यात आले  आहे. या मध्ये दहागांव देसले पाडा ते हनुमान मंदिर येथे सुरु असलेले काँकरीट  रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दि  4 डिसेंबर 2020 रोजी केली. तक्रारीत त्यांच्या म्हण्याप्रमाणे दहागांव देसले निवांस ते हनुमान मंदिर पर्यंत  काँकरीट रस्त्याचे काम सुरु आहे. पण  या रस्त्याच्या बांधकामाला  अवघ्या 2 ते 3 दिवसातच तडे व भेगा पडल्या आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमत रस्ता दुभंगुन फाटला आहे. रस्त्याच्या या बांधकामाला बांधकाम विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असून कंत्राटदार एजन्सीशी आर्थिक सगनमत करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे  सुरु आलेल्या  काँकरीट रस्त्याचे काम तातडीने थांबवून  गुण नियंत्रण पथकाद्वारे चाचणी करावी अशी मागणी सुद्धा या तक्रारीत केली आहे.

Monday, December 21, 2020

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे
पालघर(प्रतिनिधी) दि. 21 :- महाराष्ट्र शासनाने अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना कळविण्यात येते की, उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावे.
उज्वला योजनेकरीता अटी व शर्ती :
1. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
2. संस्थेमध्ये किमान 50 महिलांकरीता सुविधा उपलब्ध असावी.
3. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा.
4. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान 20 लाख रूपये असावा.
5. संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.
6. योजना राबविण्याकरीता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. सदर संस्थेचे कायमस्वरूपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.
7. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
8. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष दिनांक 27/03/2018 मधील शासननिर्णयानुसार असावेत.
9. फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्थांना योजने अंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही.
10. उज्वला योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र ब) आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधुन कागदपत्रांसाठीची प्रपत्र ब ची यादी प्राप्त करुन घ्यावी व परिपुर्ण प्रस्ताव सात दिवसांच्या आत जिल्हा कार्यालयास सादर करावा.
***********

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 21 :- महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुर्नवसनासाठी केंद्र पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना कळविण्यात येते की, स्वाधार योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावे.
स्वाधार योजनेकरीता अटी व शर्ती :
1. संस्था संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
2. संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा.
3. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी.
4. संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.
5. योजना राबविण्याकरीता इच्छुक संस्था त्याच जिल्हयातील असावी.
6. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
7. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा.
8. योजना राबविण्याचे निकष दिनांक 23.3.2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत.
9. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वाधारगृहाची क्षमता 30 लाभार्थ्यांकरीता राहील परंतु मोठया शहरामध्ये ती 50 किंवा 100 पर्यंत वाढविता येईल. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील.
10. स्वाधार योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र अ) आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधुन कागदपत्रांसाठीची प्रपत्र अ ची यादी प्राप्त करुन घ्यावी व परिपुर्ण प्रस्ताव सात दिवसांच्या आत जिल्हा कार्यालयास सादर करावा.
***********

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पालघर(प्रतिनिधी) दि.२१ :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या पालघर जिल्ह्यातील १७७३ अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६१७ हप्ते जमा झाल्याने रक्कम रुपये ९२३४०००/-( अक्षरी ब्याण्णव लाख चौतीस हजार रुपये मात्र) शासनास परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार २३९ शेतकऱ्यांनी ११३१ हप्त्यापोटी रक्कम रुपये २२६६०००/-(अक्षरी बावीस लाख सहासष्ट हजार रुपये मात्र) शासनास परत केलेले आहेत.

तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या पालघर जिल्ह्यातील १४६३ आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९२६ हप्ते जमा झाल्याने रक्कम रुपये १३८५२०००/- ( अक्षरी एक कोटी अडोतीस लाख बावन्न हजार रुपये मात्र) शासनास परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार १८७ शेतकऱ्यांनी ९०४ हप्त्यापोटी रक्कम रुपये १७९६०००/-(अक्षरी सतरा लाख शहाण्णव हजार रुपये मात्र) शासनास परत केलेले आहेत.

त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ५५०१ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification) करण्याचे निर्देश शासनाने दिल्याने २०४९ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification) पूर्ण झालेली असून उर्वरीत ३४५२ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification ) तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसिलदार गटविकास अधिकारी/तालुका कृषि अधिकारी यांना जिल्हाधिकारी पालघर यांनी दिले आहेत.
**********

Sunday, December 20, 2020

हरवलेल्या मुलीच्या शोध कामी (मिसिंग)

हरवलेल्या मुलीच्या शोध कामी (मिसिंग)
पोलिस स्टेशन सफाळे पो, उंबरपाडा ता,जि पालघर या हद्दीतील नंदाडे येथील राहणारी सौ, सुरेखा सुरेश वाघरी वय ४५ यांनी दिनांक ३० /११/ २०२० रोजी सफाळे पोलिस स्टेशन ता,जि, पालघर यांना खबर दिली की त्यांची मुलगी कु, सोनिया सुरेश वाघरी वय १९ ,हि दिनांक २८/११/२०२० रोजी राहत्या घरातून कोणासही न सांगता बाहेर गेली आज पर्यंत परत आली नाही म्हणून पोलिस स्टेशनला मिसींग केस दाखल 
     सदर फोटोत दिसत आसलेली व वर्णन केलेली मुलगी एकच आहे  सोनिया सुरेश वाघरी वय १९ वर्ष रा, नंदाडे मुलीचे वर्णन रंग गोरा उंची ५ फुट अंगावर आँरेंज रंगाचा टाँप व सफेद रंगाची लेगिज पँन्ट, गळ्यात हि-याचे व सोन्याचे लाँकेट, डाव्या हातात चांदीची अंगठी पायात चप्पल, केस काळे 
  फोटोत असलेली व वर्णन केलेली मुलगी कोणास आढळल्यास किंवा दिसून आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा 
तपासी अंमलदार ९९८७३३४८२२
पोलिस स्टेशन ८६६९६०४०३७

Saturday, December 19, 2020

मुंबईत पार पडणार ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मुंबई(प्रतिनिधी)

मुंबईत पार पडणार ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

 

मुंबई(प्रतिनिधी)

वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडणार आहे. दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२०

 

दरम्यान पार पडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन  मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला  उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री मा. उदय सामंत, आणि माजी राज्यपाल मा. डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत. तर दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडेल. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा. रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री मा. दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील.

 

२१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. श्री अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधीदरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील.

*दुचाकी वाहन नोंदणीसाठी नवीन मालिका लवकरच सुरु*

*दुचाकी वाहन नोंदणीसाठी नवीन मालिका लवकरच सुरु*

पालघर(प्रतिनिधी) दि १९: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई मु. पो. चंदनसार - भाटपाडा, विरार (पूर्व ) ता. वसई, जि. पालघर  येथे परीवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहन नोंदणीसाठी सध्या BY हि मालिका सुरु आहे.सदर मालिका दि. २१/१२/२०२० पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने परीवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहन नोंदणीसाठी BZ ही मालिका सुरु करण्यात येणार आहे.

सदर नवीन मालिकेतील आकर्षक किंवा पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि. २२/१२/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितानी अर्ज सादर करावेत. आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहित शुल्क आकारून नोंदणी चिन्ह आरक्षित कारण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरूपातील धनाकार्ष या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी 4 वाजता त्यांचे समोर सादर केलेले लिफाफे उघडले जातील. ज्याचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिंन्ह देण्याची कारवाई करण्यात येईल.

*हद्दपार नोटीस पारित* पालघर(प्रतिनिधी)

*हद्दपार नोटीस  पारित*                             पालघर(प्रतिनिधी) दि १८ :      सहाय्यक जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१)(अ) अन्वये नियोजित हद्दपार इसम  रुडाभाई नानजीभाई रबारी रा. खत्तलवाड, मांडा लायब्री, सरीगाम संजाण राज्य गुजरात, सध्याचा पत्ता झाई, बोरीगांव ता. तलासरी जि. पालघर यांना (४) चार महिन्याच्या मुदतीकरीता दि. १६/१२/२०२० अध्यादेशाच्या तारखेपासुन हद्दपार करण्यात आले आहे.                                          सदर इसमाने पालघर जिल्ह्याचे क्षेत्रात उपविभागीय दंडाधिकारी डहाणू किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगी शिवाय प्रवेश करू नये किंवा परत येऊ नये, असा आदेश सहाय्यक जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल,  यांनी दि. १६/१२/२०२० रोजीच्या पत्र जा. क्र. डिपी/एम. ए. जी/ नि.ह/ एस.आर-२०६ अन्वये निर्देशीत केला आहे.

आदेशाची प्रत  जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक , उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु, कार्यकारी अधिकारी तलासरी, पोलीस निरीक्षक तलासरी व संबंधितास देण्यात आली आहे..

*२८ डिसेम्बर रोजी रस्ते सुरक्षा समितीची बैठक*


*२८ डिसेम्बर रोजी रस्ते सुरक्षा समितीची बैठक*

 पालघर (प्रतिनिधी)दि १८ :  गृह विभाग महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. ११/१०/२०११ आणि गृह( परिवहन) विभाग महाराष्ट्र अधिसूचना दि.१३/०५/२०१५  नुसार जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीचा आढावा घेणे कामी .जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ते सुरक्षा समिती पालघर यांचे अध्यक्षतेखाली दि.२८/१२/२०२० रोजी दुपारी  १.००  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकी साठी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सर्व सदस्य , तसेच प्रकल्प संचालक , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत हे उपस्थित राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली आहे. 
    तरी जिल्ह्यातील नागरिकांच्या  या संदर्भात काही सूचना असल्यास  homebranchpalghar@gmail.com या मेल आय डी  वर दि. २५/१२/२०२० पर्यंत मेल  करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी  कार्यालयातून करण्यात आले आहे.
*******

Thursday, December 17, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा वनहक्क समिती कक्षाला मा.खासदार राजेंद्रजी गावित यांनी घेतली भेट.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा वनहक्क समिती कक्षाला मा.खासदार राजेंद्रजी गावित यांनी घेतली भेट.
 पालघर (प्रतिनिधी)दिनांक  १७/१२/२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील 
जिल्हा वनहक्क समिती कक्षाला 
मा खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यानी भेट दिली 
तेव्हा पालघरचे जिल्हाधिकारी मा डॉ  श्री माणिक गुडसर  साहेब  व  उपजिल्हाधिकारी मा श्री सुरेंद्र नवले साहेब उपस्थित होते .
जिल्हाधिकारी कार्यालयात मा जिल्हाधिकारी ह्याच्या नेतृत्वाखाली 2500 वनहक्क पट्ट्यांचे  काम पुर्ण झाले आहे ,ह्या महीना अखेर पर्यंत अजुन ३००० दाव्यांचे काम पुर्ण होणार आहे ,डहाणु व जव्हार चे डि एफ ओ  व उपजिल्हाधिकारी ह्यांचेही सहकार्य ह्या कामात आहे , लवकरच ह्याचे प्रमाण पत्र व अधिकृत डॉक्युमेंट  ल्यामिनेशन करुन लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे 
मा खासदार ह्यानी कामाबद्दल समाधान व्यक्त केले

*अनुकंपातत्वावरील सामायिक प्रतिक्षासूची संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे निर्देश* पालघर(प्रतिनिधी)

*अनुकंपातत्वावरील सामायिक प्रतिक्षासूची   संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणून  देण्याबाबत जिल्हाधिकारी  यांचे निर्देश*                                                  पालघर(प्रतिनिधी) दि :  17 :   नियुक्ती प्राधिकारी , विभाग प्रमुख ,कार्यालय प्रमुख यांनी  अनुकंपा तत्वावरील याद्या आपल्या विभाग / कार्यालयातील अभिलेखावरुन पडताळणी करुन  सर्व संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी सर्व विभाग/कार्यालय प्रमुख यांना दिले.  तसेच या याद्या पालघर जिल्हयाच्या संकेतस्थळावरती (वेबसाईट) प्रसिध्द करण्यात येणार आहेत.                                     शासन निर्णय दिनांक २२.०८.२००५ मधील तरतूदीनुसार जिल्हाधिकारी हे  प्रत्येक सहा महिन्यामध्ये जानेवारी व जुलै  मध्ये त्यांचेकडील अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतच्या सामायिक प्रतिक्षासूचीचा आढावा घेऊन दरम्यानच्या कालावधीतील नियुक्ती मिळालेल्या उमदेवारांची नावे वगळून त्यांच्याकडील सामायिक प्रतिक्षासूची अद्ययावत करतील यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयातील प्रतिक्षासूचीचा आढावा घेऊन समन्वयाचे काम करतील अशी तरतूद आहे.

        पालघर जिल्हयातील विविध शासकीय विभाग/कार्यालयातील गट-क व गट-ड संवर्गातील दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा उमेदवारांची सामायिक प्रतिक्षासूची सर्व नियुक्ती प्राधिकारी/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी सदर प्रतिक्षा याद्या आपल्या विभाग / कार्यालयातील अभिलेखावरुन पडताळणी करणेबाबत तसेच सर्व संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणून देणेबाबत निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी सर्व विभाग/कार्यालय प्रमुख यांना दिले आहेत.

*जल जिवन मिशन योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने गावाचा जल आराखडा तयार करा* – जि.प. अध्यक्षा भारती कामडी

*जल जिवन मिशन योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने  गावाचा जल आराखडा तयार करा* – 
  जि.प. अध्यक्षा भारती कामडी  
पालघर (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी , खासदार, राजेद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  उपायुक्त विकास, गिरीश भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या संकूल सभागृह येथे  खाते प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या आढावा  बैठकीत केंद्र पुरस्कृत योजना जलजीवन मिशन अभियानाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व)  तुषार माळी यांनी सादर केला. 
            ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या उपक्रमात गाव स्तरावरील पदाधिकारी व ग्रामस्थांरनी सहभागी होऊन गावाचा जल आराखडा तयार करा, असे आवाहन जिल्हां परिषदेच्या अध्यक्षा  भारती कामडी यांनी केले आहे.
            राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी  जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या योजना या गावातील पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे नियोजन करीत असताना नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा तसेच पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच आराखडे तयार करण्यात यावेत अश्या सुचना राज्याला दिल्या आहेत. 
           या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले.
            जल जीवन मिशनच्या कार्यरत मार्गदर्शन सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे ५५ LPCD  प्रमाणे गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याप्रमाणे सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना वैयक्तिक नळ जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हायात ४  लाख १० हजार ७३३  ग्रामीण कुटूंब संख्याळ आहे. चालू वर्षातील  १ लाख ५६ नळजोडणीच्याे उद्दिष्टापैंकी ४५ हजार नोंदी जलजीवन मिशनच्या संकेत स्थळावर करण्याण आलेल्या आहेत. तसेच  उर्वरीत उदिष्ट पूर्ण करण्या साठी नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी जिल्हार परिषदेच्या वतीने उद्दीष्ट्पूर्तीसाठी कालबध्द  कार्यक्रम निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमात केवळ ग्रामीण भागातील कुटूंबांना पाणी उपलब्ध करुन देण्या्पूरता मर्यादित न ठेवता जिल्हयातील अंगणवाडया, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्र इत्या‍दी घटकांना पाणी पुरवठा करण्यातचा १०० दिवसाचे विशेष अभियान राबविण्यात सुरू असल्यािचे उपमुख्य् कार्यकारी अधिकारी तुषार माळी  यांनी सांगीतले. यावेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे,प्रकल्प संचालक माणिक दिवे, सर्व खाते प्रमुख  व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
******

Wednesday, December 16, 2020

*विक्रमगड तालूक्यातील शिंपीपाडा ,सुकसाळ भागातील बीजकेंद्रावर मत्स्यविभागाची कारवाई*

*विक्रमगड तालूक्यातील शिंपीपाडा ,सुकसाळ भागातील बीजकेंद्रावर मत्स्यविभागाची कारवाई*
पालघर दि.16:   सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर कार्यालयातील तपासणी  अधिकारी पथकाने स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीने विक्रमगड तालूक्यातील धडक कारवाई केली.    विक्रमगड तालूक्यातील  शिंपीपाडा , सुकसाळ भागातील  कुलदिप पाटील रा. शिंपीपाडा- सुकसाळ, ता. विक्रमगड ,  आजिम खान सईद अख्तर रा. माहीम , मुंबई व  गुलाम शेख, रा. जोगेश्वरी यांच्या मदतीने गेल्या काही दिवसांपासून चालू असलेले प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन केंद्र व मागूर मत्स्यसाठा नष्ट केला व प्रतिबंधीत मागूर प्रजनन करणा-या  संबधीत  कुलदीप पाटील ,आजिम खान सईद अख्तर यांच्यावर भारतीय दंड विधान 188 व 34 अंतर्गत पोलीस कारवाई दाखल करण्यात आली आहे.
आजिम खान सईद अख्तर, राहाणार माहीम , मुंबई  व  गुलाम शेख रा. जोगेश्वरी , मुंबई हे दोघे स्थानिक  कुलदीप पाटील , रा. शिंपीपाडा- सुकसाळ , ता. विक्रमगड यांच्या रहात्या घराशेजारील जागेत पॉल्ट्री शेडच्या बाजूला प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन व संवर्धन करत असल्याबाबतची गुप्त तक्रार दिनांक 13/12/2020 रोजी रात्रौ 11.00 वाजता प्राप्त झाल्यानुसार  सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर यांनी तात्काळ  प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील  मत्स्यव्यवसाय अधिका-यांचे एक पथक स्थापन करून विक्रमगड येथील पोलीस विभागाचे सहकार्य घेवून धडक कारवाई करून शिंपीपाडा- सुकसाळ येथिल प्रतिबंधीत मागूर माशांचे बीज केंद्रातील 100 कि.ग्रॅ मागूर मासळी प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची प्रजनन केलेली अंडी नष्ट करण्यात आली व मागूर माशांचे केंद्र बंद पाडण्यात आले. तसेच  कुलदीप पाटील, आजिम खान सईद अख्तर व गुलाम शेख यांच्यावर भा.द.वि. 188 व 34 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष कारवाईत , आनंद दत्तात्रय पालव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय , ठाणे-पालघर,  दिनेश हंसराज पाटील मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ठाणे-पालघर,  सुरेंद्र  गावडे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, संदीप  जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ,पोलीस हवालदार  एस व्हि मोरे ,    महावीर जगताप  वाहन चालक , श्महाले शिपाई. हे उपस्थित होते.
प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन ही जिल्ह्याकरीता अत्यंत डोकेदुखीची समस्या असून Exotic Magur (Clarius gariepinus) या माशांचे मत्स्यसंवर्धन करतांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला  खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळी/मेंढी, गाई , म्हैशी यांचे मांस खादय म्हणून वापरले जाते.व यामुळे पर्यावरणाचा –हास होत असल्याचे आढळून येते. तसेच हा मासा अतिशय मांसभक्षक असल्यामुळे इतर माशांचे मत्स्यपालन करण्यात क्रियाशिल व अधिकृत मासेमारी व्यवसाय करणा-या मत्स्यकास्तकारांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच संवर्धन करण्यात येणा-या माशांना हे मासे मोठया प्रमाणात भक्षण करत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात तलाव /जलाशयातील पारंपारीक मासे जसे  कटला, रोहू ,मृगल व सायप्रिनस इत्यादींच्या संख्येत मोठया प्रमाणात परीणाम होत असल्याचे दिसत आहे. भारतीय प्रजातींना या माशांमुळे धोका निर्माण होत असून सदर जातीच्या माशांचे प्रजनन,संवर्धन ,विक्रि व वहातुकीवर बंदी घातली.   आहे.
  Original Application No.381 of 2018 याचिकेच्या दिनांक 22/01/2019 रोजीच्या पारीत केलेल्या आदेशानुसार . राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी मागूर माशांच्या Exotic Magur (Clarius gariepinus) प्रजनन व मत्स्यपालन करण्यावर बंदी घातली असून या प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन व  अस्तीत्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यांसमावेत पथक तयार करून मागूर माशांचे संवर्धन होत असलेल्या मत्स्यतळी /तळयांची पहाणी करून व अशा प्रतिबंधीत माशांचे संवर्धन होत असल्यास सदर मत्स्यसाठा नष्ट करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने सदरची धडक मोहीम राबवून सदरचे मागूर मत्स्यबीज केंद्र नष्ट केले आहे. तसेच यापुर्वी दिनांक 10/12/2020 रोजी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मौजे कुंभारशिव ता. भिवंडी येथील वन विभागाच्या वनक्षेत्रात, वनपट्टयातील जागेत प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन करणा-या अनधिकृत संवर्धकांना नोटीस बजावणी करण्यात आली असून मागूर संवर्धन करणा-या व्यक्तींवर भा.द.वि. 188 व 34 अंतर्गत कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.तसेच विहीत पद्धतीने मागूर मत्स्यसाठे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे इतरत्र आढळून येणा-या प्रतिबंधीत मागूर मासळीच्या मत्स्यसंवर्धन व साठे तसेच बीज केंद्रावर ही याचप्रमाणे धडक कार्यवाही राबवण्यात येणार आहे.

Tuesday, December 15, 2020

नाशिक त्रिमूर्ती चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक नियोजित होणाऱ्या उड्डाणपुलास व्यापारी वर्ग व रहिवासी यांचा तीव्र विरोध. *नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.*

नाशिक त्रिमूर्ती चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक नियोजित होणाऱ्या उड्डाणपुलास व्यापारी वर्ग व रहिवासी यांचा तीव्र विरोध.
 *नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.*
 
संभाजी चौकातील सर्व लहान मोठे व्यापारी यांनी रिपाई ज्येष्ठ नेते मा. किशोर घाटे यांना लेखी स्वरुपात निवेदन दिलेले असल्याने त्या प्रसंगी किशोर घाटे यांनी नाशिक त्रिमूर्ती चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक नियोजित होणाऱ्या उड्डाणपुलास तीव्र विरोध दर्शविला आहे व सर्व व्यापारी व रहिवासी वर्ग यांनी सुद्धा एक मुखाने तीव्र विरोध दर्शविला आहे.
रिपाई नेते किशोर घाटे व सर्व व्यापारी वर्ग त्या प्रसंगी नाशिक मनपा व ठेकेदार यांना सूचना देताना म्हणाले, जर यदाकदाचित मनपा ठेकेदार यांनी सदर जागेतून उड्डानपुल उभा करण्यचा प्रयत्न जर केला तर तो हाणून पाडण्याचा प्रयत्न पूर्ण बळानिशी केला जाईल व त्याची सर्वस्व जबाबदारी ठेकेदारावर
राहणार. या प्रसंगी अशोक शेठ,
आशिष शुक्ल, पितांबर पवार, हिरामण बोडके ,ज्ञानेश्वर जाधव, समाधान जाधव, नानासाहेब ठाकरे,बापु नागपुरे, ज्ञानेश्वर खरगडे, भाऊसाहेब लगरे, तेजस दुसाणे, विनायक वाघमारे, सुमित पत्की आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या युवतीच्या कुणीच पोलिसांनी लावला छडा : नातलगाने खून केल्याचे पोलीस तपासात उघड. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या युवतीच्या कुणीच पोलिसांनी लावला छडा : नातलगाने खून केल्याचे पोलीस तपासात उघड. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

 नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तपोवन टाकळी परिसरात झालेल्या युवतीच्या खुनाच्या तपासात पोलिसांना यश आले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 12 डिसेंबर रोजी तपोवन परिसरात सापडलेल्या युवतीचा मृतदेह ओळख पटलेली नव्हती परंतु पोलिसांनी जवळील परिसरात कसून शोध घेतला असता त्यांना दवाखान्याची फाईल सापडली. फाईल व शवविच्छेदन अहवाल सारखा असल्याने युवतिची ओळख पटली युतीचे नाव झैनब जाकीर कुरेशी असे असून ती 3 महिन्यांची गर्भवती होती. याबाबत उपायुक्त अमोल तांबे व त्यांचे सहकारी यांनी माहिती देताना सांगितले की युवतीची ओळख पटताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व भ्रमणध्वनी संभाषण आधारे तिचा नातेवाईक दानित जावेद कुरेशी वय वर्षे 20 रा. देवळाली गाव यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सांगितले की मयत युवती ही माझा पती बनुन मला दवाखान्यात घेऊन माझा गर्भपात करून दे असा वारंवार तगादा लावत होती असे न केल्यास मी तुझे नाव घेईल अशी धमकी देत होती म्हणून तिचा काटा काढण्याचे ठरविले. दिनांक 5 डिसेंबर रोजी तुला वैद्याकडे नेऊन औषध घेऊन गर्भपात करून देतो असे सांगून पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर तिला घेऊन गेला व तपोवन परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली त्याने दिली असे उपायुक्त तांबे यांनी सांगितले. खूप कमी कालावधीत गुन्ह्याची उकल केल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हा परिषदे मार्फत सत्कार*

*उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हा परिषदे मार्फत सत्कार*
    पालघर (प्रतिनिधी) सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेत नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणारया शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिक्षणाधिकारी (प्रा.) लता सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करून प्रशस्ती पत्रक देण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण विभाग जि.प.पालघर जिल्हा जिल्हा शिक्षण विभाग व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
      शिक्षणात   तंत्रज्ञानाचा वापर, कला,  कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, मराठी,  सामाजिक शास्त्र याबाबत कृतीशील उपक्रम, मुलींचे शिक्षण ,शाळाबाह्य मुलांच्या समस्या, ज्ञानरचनावाद, कृतीतून शिक्षण, कोरोना काळात ऑफलाईन तसेच ऑनलाईन शिक्षणाची सेवा देणे व इतर अनेक विविध उपक्रम राबवण्यात आलेल्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
   यावेळी अध्यक्षा भारती कामडी यांनी जिल्हा परिषदेने असे उपक्रमशील शिक्षक निवडल्या बद्दल त्यांच कौतुक वाटते असे सांगून या शिक्षकांमधूनच पालघर जिल्ह्याचे नाव उंचावतील अशी  अपेक्षा व्यक्त केली. 
 असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक या जिल्ह्यात आहेत हे पाहून  आनंद वाटला.अशा होतकरु  शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी पाठीशी राहतील .जेथे विद्यार्थी संख्या कमी आहे तेथे ती वाढण्यासाठी शिक्षकांनी  प्रयत्न केले पाहिजेत.जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती  सभापती  निलेश सांबरे यांनी केले. 
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था हि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अवलंबून असून जिल्हा त्यामुळे शहरी भागात जसे उपक्रम राबवले जातात तसे उपक्रम ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांकडे फक्त इच्छाशक्ती ची जोड हवी आहे आर्थिक पाठबळ जिल्हा परिषद कमी पडू  देणार नाही. भविष्यात यामधूनच च एखादा रणजितसिंग डिसले तयार होईल  अशी अशा यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.