*हद्दपार नोटीस पारित* पालघर(प्रतिनिधी) दि १८ : सहाय्यक जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१)(अ) अन्वये नियोजित हद्दपार इसम रुडाभाई नानजीभाई रबारी रा. खत्तलवाड, मांडा लायब्री, सरीगाम संजाण राज्य गुजरात, सध्याचा पत्ता झाई, बोरीगांव ता. तलासरी जि. पालघर यांना (४) चार महिन्याच्या मुदतीकरीता दि. १६/१२/२०२० अध्यादेशाच्या तारखेपासुन हद्दपार करण्यात आले आहे. सदर इसमाने पालघर जिल्ह्याचे क्षेत्रात उपविभागीय दंडाधिकारी डहाणू किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगी शिवाय प्रवेश करू नये किंवा परत येऊ नये, असा आदेश सहाय्यक जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल, यांनी दि. १६/१२/२०२० रोजीच्या पत्र जा. क्र. डिपी/एम. ए. जी/ नि.ह/ एस.आर-२०६ अन्वये निर्देशीत केला आहे.
आदेशाची प्रत जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक , उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु, कार्यकारी अधिकारी तलासरी, पोलीस निरीक्षक तलासरी व संबंधितास देण्यात आली आहे..
No comments:
Post a Comment