पालघर जिल्हातील 16 अनाथ बालकांना अनाथप्रमाणपत्र वाटप
पालघर(प्रतिनिधी) दि. 29 :- अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष पंधरवडयाचे आयोजन 14 ते 30 नोव्हेबर 2020 दरम्यान पालघर जिल्हातील 16 अनाथ बालकांना मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी ,पालघर यांच्या हस्ते अनाथप्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय/स्वंयसेवी बालगृहात दाखल होणा-या अनाथ मुलांना संस्थेतुन बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्या कारणाने, त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महिला व बाल विकास विभाग निर्णय दि.06 जुन 2016 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाअंतर्गत मान्यता प्राप्त संस्थामध्ये दाखल असलेल्या बालकांना व समाजातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देणेबाबत सुचना दिलेले आहे त्या नुसार जिल्हातील पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरीता जिल्हा स्तरावर दि.14 ते 30 नोव्हेबर 2020 या कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात आला होता. सदरचा पंधरवडा दरम्यान पालघर जिल्हातील नारायण चंद्र ट्रस्ट नालासोपारा येथील बालगृहातील एकुण 16 अनाथ बालकांना मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी, पालघर यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी दिली.
*******
No comments:
Post a Comment