*नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य बिरासा मुंडा यांचे स्मारकात्म्क पुतळे उभारावेत - खासदार राजेंद्रजी गावित साहेब*
पालघर (हिरालाल लोखंडे) १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा घोषित करण्यात आला. सर्व जिल्हा मुख्य कार्यालये एकाच संकुलात उभी रहावीत ह्या करिता पालघर कोळगाव डेअरी येथील शासकीय जमीन देण्यात आली. तेव्हा पासून जिल्हा कार्यालयाचे काम प्रगती पथावर सुरू झाले.
प्रचंड मोठ्या परिसरात पसरलेल्या ह्या जिल्हा कार्यालयाला तसेच नागरिकांच्या सुलभ सोयी करिता एक लॅंडमार्क म्हणून खालील सूचित भव्य स्मारकात्म्क पुतळे(Statue) उभारण्यात यावेत अशी मागणी माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब ह्यानी जिल्हाधिकारी पालघर ह्याच्या कडे केली ,त्या वेळेस पालघर नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला काळे व शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे उपस्थित होते .
१) छत्रपती शिवाजी महाराज:- महाराष्ट्राचे आरध्य दौवत, प्रशासनात शिस्तबद्धता, न्यायदानात निस्पृहता अशी ख्याति असलेल्या रयतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या थोर महाराजांचे भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा.
२) डॉ. बाबसाहेब आंबेडकर:- सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याचे तसेच स्वातंत्र, समता आणि बंधुताची शिकवण देणारे भारतीय संविधनाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा.
३) क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा:- आदिवासीचे हक्क, स्त्रीयांचे स्वातंत्र्य यांच्या साठी लढा देणारे आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिसूर्य वीर बिरासा मुंडा यांचा भव्य स्मारकात्म्क पुतळा (Statue) उभारण्यात यावा.
जिल्हाधिकारी मा श्री माणिक गुडसर साहेब ह्यानी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला व मा खासदारान सोबत चर्चा केली .
No comments:
Post a Comment