Friday, October 2, 2020

दिनांक- ०२.१०.२०२०जिल्हा परिषद पालघर

दिनांक- ०२.१०.२०२०
जिल्हा परिषद पालघर

*जिल्हा परिषद कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन*

पालघर (निलेश भोईर)आज दिनांक ०२.१०.२०२० रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. श्री सिद्धाराम सालीमठ, यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ अहिंसात्मक, असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले होते. तसेच लालबहादूर शास्त्री भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत पाकिस्तान युद्ध घडले. अशा थोर पुरुषांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साप्रवि, श्री. तुषार माळी, मा.सहा. प्रशासन अधिकारी सा. श्री. सतिश मांडवेकर तसेच अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...