Thursday, October 1, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- ०२.ऑक्टोबर २०२०वार :- शुक्रवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०२.ऑक्टोबर २०२०
वार :- शुक्रवार

● पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद

● राहुल गांधी मारहाण प्रकरणानंतर देशभर योगी सरकारचा निषेध; योगी सरकार बरखास्त करा, हाथरस घटनेविरोधात देशभरात संताप

● महिलांसंबंधित गुन्ह्यात दिल्ली नंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर; NCRB च्या डेटा मधुन धक्कादायक खुलासा

● अमेरिकेत प्रवेश दिल्या जाणाऱ्या निर्वासितांची संख्या आणखी कमी करून येत्या वर्षी या निर्वासितांना आजवरच्या नीचांकी संख्येत प्रवेश देण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने दिला

● रात्रीतून अंत्यसंस्कार करणारे उत्तरप्रदेश पोलिस म्हणतात.. 'त्या' मुलीवर अत्याचार झालाच नाही

● महाराष्ट्रात लवकरच सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु होण्याची शक्यता; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख घेणार सीएम उद्धव ठाकरे यांची भेट

● केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले करणार हाथरस चा दौरा; आरोपींना फाशी देण्याची मागणी

● रोहित शर्माच्या तुफान फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात

● नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस

● सलमान खान याने बिग बॉस 14 च्या सेटवरुन पोस्ट केला शानदार फोटो, इंटरनेटवर तुफान व्हायरल

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...