Saturday, March 13, 2021

पर्यटनातून ग्रामीण भागाचा विकासाच्या वाटा मोकळ्यापालघर(प्रतिनिधी)

पर्यटनातून ग्रामीण भागाचा विकासाच्या वाटा मोकळ्या
पालघर(प्रतिनिधी)
पालघर तालुक्यातील दातीवरे,कोरे व मथाने आणि चटाळे गावांना जिल्हा पर्यटन यादीत समाविष्ट करून त्यामाध्यमातून किनार पट्टीवरील गावांचा विकास साधता येईल,ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. निलेश रमेश राऊत यांनी नुकताच पालघर जिल्हा परिषद च्या अध्यक्षा  मा.श्रीमती भारती ताई कामडी यांची भेट घेऊन चर्चा केली व मागणी चे निवेदन दिले,
यावेळी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख मा.श्री.राजेशभाई शाह आणि पालघर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. श्रीनिवास वनगा उपस्थित होते,
यावेळी मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान याआधी एडवन, अंबोडे व वेडी या गावांना पर्यटन दर्जा व विकास निधी मिळवून देण्यात सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत यांनी मेहनत घेतली होती.
गावातील बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होऊन विकास साधला जाईल अशी भावना यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यानी व्यक्त केली.तर पर्यटन विकासामुळे ग्रामीण भागाचा विकासाच्या वाटा मोकळ्या होत असल्याचे जि. प.अध्यक्षा श्रीमती भारतीताई कामडी यांनी सांगितले.

Friday, March 12, 2021

दातिवरे हायस्कूल मध्ये महिला दिन

दातिवरे हायस्कूल मध्ये महिला दिन
सफाळे: दातिवरे शिक्षण संचलित संस्थेच्या दातिवरे येथील दातिवरे इंग्लिश हायस्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री रविंद्र ठाकूर सर होते. प्रमुख अतिथी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका डॉ स्मिता सुधीर माळवदे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यीनींना मार्गदर्शन करताना   गुड टच ब्याड टच  हे आपल्याला होणारे र्स्पश याबाबत जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन केले. व विद्यार्थ्यीनींना त्यांच्या कडुन वह्या व सँनेटरी पँड  भेट देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.सी.राठोड यांनी प्रास्ताविकात जागतिक महिला दिन २०२१ ची थीम " *महिला नेतृत्व* *कोरोना - १९"* माहिती कथन केली. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रविंद्र ठाकूर यांनी " स्त्री  आणि पुरुषां  मध्ये समानता आणणे या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले.  सदर प्रसंगी शाळेतील शिक्षिका मनिषा कुलकर्णी व प्रितम राऊत यांचाही गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षक सुजय वसावे, संजय भोपी उपस्थित होते. खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिल ठाकूर सरांनी केले तर प्रितम राऊत यांनी  सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

भारतीय बौध्द महासभा, बाईसर शाखेची नवीन कार्यकारिणी

भारतीय बौध्द महासभा, 
बाईसर शाखेची नवीन कार्यकारिणी  ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ मार्च २०२१ रोजी मौजे उमरोळी बौध्द आळी ता,जि पालघर येथे आयु, श्रीपाद शेलार भारतीय बौध्द महासभा पालघर तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर शहर व ग्रामीण भाग यांची सांगड घालण्यासाठी १४ गावांना एकत्र घेऊन, नवीन तरूणांना १०० टक्के संधी देऊन, धम्मकार्य जोडण्याची महत्वाकांक्षी योजनेसाठी बनविण्यात आली आहे. 
अॅड, आयु, अजिंक्य म्हस्के या कार्यकारिणीचे अध्यक्ष आहे. ते दलित पँथरचे माजी युवा अध्यक्ष, गीतकार, विद्रोही कवी, ग्रामपंचायत पांचाळी सदस्य आहेत.आयु, किरण मोरे कोषाध्यक्ष. आयु ,धिरज लोखंडे महासचिव, आयु , चेतन जाधव संरक्षण उपाध्यक्ष, आयु, रूपेश लोखंडे सचिव, आयु राहुल नाईक प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, आयु करण राऊत प्रचार पर्यटन सचिव, आयु कुशल जाधव अॅडीटर, आयु  कौशल जाधव कार्यालयीन सचिव, संघटक पदी सिध्दार्थ कुर्ले   संकेत दिवे सिध्दार्थ वाघमारे नियुक्ती, आयु रंजना मोरे, आयु जयमाला मोरे महिला संघटक पदी, नियुक्ती करण्यातआललेली आहे .
कार्यक्रमांची सुरूवात दिवंगत भगवान जाधव यांच्या पवित्र स्मृतीला श्रध्दांजली देऊन करण्यात आली. या प्रसंगी दिपक  लोखंडे पालघर तालुका  महासचिव ,रूपेश राऊत कोषाध्यक्ष, प्रदीप जाधव संस्कार उपाध्यक्ष, दत्ताराम गायकवाड संस्कार सचिव, सुमनताई लोखंडे केंद्रीय शिक्षीका, शामराव खरात पालघर संघटक, सुनिल शेलार एकनाथ काळे अशोक शेलार सफाळे विभाग तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पुढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा, वरील माहिती रूपेश रमेश राऊत दातिवरे यांच्या कडुन प्राप्त झाली आहे

Thursday, March 11, 2021

ग्रामपंचायत कुडण ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी!ग्राहक संरक्षण फाउंडेशन चे .जिल्हा अध्यक्ष .मिलींद चूरी

ग्रामपंचायत कुडण ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून  तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची  केली मागणी!
ग्राहक संरक्षण फाउंडेशन चे .जिल्हा अध्यक्ष .मिलींद चूरी  (प्रतिनिधी)दि.३०/०८/२०१८ च्या माहिती अधिकार अर्जाची माहिती २ वर्षांनंतर दि.२६/०८/२०२० रोजी प्राप्त माहितीच्या आधारे गट विकास अधिकारी पालघर पंचायत समिती यांना दि.०२/०९/२०२०रोजी पत्र देऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे दप्तरामध्ये प्रचंड अनागोंदी कारभार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते त्यामुळे आपण सदर ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीसाठी अधिकारी नियुक्त करून अहवाल सादर होईपर्यंत या ग्रामसेविकेचे निलंबन व चौकशी करून दोषींवर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी असे विनंती करून सुद्धा कोणतेही चौकशी केली नसल्याचे माहिती अधिकार अर्ज ला दिलेल्या उत्तरातून समजते.
कुडण ग्रामपंचायत २०१७-१८ या वित्तीय वर्षाची सामान्य रोकड वही च्या माहिती अधिकार मध्ये प्राप्त झालेल्या छायांकित प्रतीच्या आधारे दिनांक २१/०६/२०१७ रोजी कुडण ग्रामपंचायत ग्रामसेविका पदाचा पदभार सौ. धनश्री धर्मेंद्र संख्ये यांनी स्वीकारला. परन्तु १८/०४/२०१७ ते ०३/०६/२०१७ या कालावधी सदर दप्तर पदभार स्वीकारण्याआधीच सदर ग्रामसेविका यांनी त्यांच्या सही शिक्कानीशी  पूर्ण केल्याचे धक्कादायक बाब निदर्शनांत आली आहे. व पुन्हा त्यांनी हा आपला गुन्हा  मिटवण्यासाठी सदर सही खोडाखोड करून पुन्हा त्या काळात पदावर असलेल्या ग्रामसेवक यांची सही घेऊन या ग्रामसेवकांनी शासकीय दस्तऐवजामध्ये फेरबदल  केला आहे. हा सर्व झालेल्या प्रकार बाबत ग्रामसेवक यांनी फेरबदल केलेल्या वहीच्या छायांकित प्रती त्या अर्जासोबत जोडल्या आहेत. सदर बाबत या कागद पत्रावर सही असणाऱ्या ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर याच्या कडे केली आहे.

Wednesday, March 10, 2021

पैठणीचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी वेगळ्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल करावी - जि.प.अध्यक्ष भारती कामडी



  पैठणीचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी वेगळ्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल करावी - जि.प.अध्यक्ष भारती कामडी
  पालघर(प्रतिनिधी) जिल्ह्यातील महिलांना लोणचं,पापड, मसाले यांच्या मर्यादेत न ठेवता पैठणी, वारली पेंटिंग शिकवून वेगळ्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आज जि.प.अध्यक्षा भारती कामडी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज  उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत महासमृद्धी महिला  सक्षमिकरण अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी त्या  बोलत होत्या. या अभियानाच्या उद्घाटना वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अशा प्रकारची आशा व्यक्त केली होती.त्यास अनुसरून आपल्या जव्हार मोखाडा सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहती किंवा इतर उत्पन्नाची साधने नसल्याने महिलांना रोजगार मिळत नाही.त्यामुळे उमेद ने असे वेगळे उपक्रम राबविल्यास महिलांना रोजगार ही मिळेल आणि जिल्ह्याची वेगळ्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल झाल्याची सिद्ध होईल.असेही मत भारती कामडी यांनी व्यक्त केले.
   जिल्हा परिषद संकुल सभागृह येथे ही कार्यशाळा आयोजित केली होती. वित्त व बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, समाजकल्याण सभापती विष्णू कडवं यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.
या अभियानात दशसूत्री कार्यक्रम राबवायचा असून पालघर जिल्ह्याला राज्यस्तरीय बक्षीस प्राप्त करायचे असेल तर सर्व यंत्रणा व सर्व पदाधिकारी यांचा सहयोग  असणे आवश्यक आहे.तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेचे जीवन सुसह्य करायचे असेल तर बँक करेस्पोंडेन्स तथा बँक सखी ची नितांत गरज आहे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले. 
  या अभियानातील दशसूत्रीचे स्वरूप काय असेल याची सविस्तर स्वरूप तसेच कोव्हीड बाबतचे सर्व नियम पाळून हे अभियान राबवले जाईल अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माणिक दिवे यांनी दिली.
स्वयं सहायता गट, ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करणे,  महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करणे, महिलांचे उपजिविकेचे स्त्रोत वाढवण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मिती साठी निधी व कर्ज वितरित करणे, महिलांची उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंग वर काम करणे महिलांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रदर्शन शॉप सहकारी व कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादने विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, स्वयंसहायता गटां मार्फत शासनाचे विविध विभाग, कार्यालये, संस्था, पंचायत राज संस्था यांना सेवा व साहित्य पुरवठा करणे, बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यक्रम अभियानाचा लाभ महिलांना मिळवून देणे, ग्रामीण महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छता कार्यक्रमातील उपक्रमांची माहिती महिलांना देऊन उपक्रम राबविणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाच्या उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे ही या अभियानाची दशसूत्री आहे. या वेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, सर्व विभाग प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा  अभियान व्यवस्थापक तसेच उमेद चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लस पूर्णपणे सुरक्षित सर्वांनी लसीकरण करून घ्यावेजिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांचे आवाहन

लस पूर्णपणे सुरक्षित सर्वांनी लसीकरण करून घ्यावे

जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांचे आवाहन

     पालघर(प्रतिनिधी) दि.10 : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी लस आपल्याला उपलब्ध झाली असून सर्व धर्मगुरूंनी जनतेमध्ये जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन करावे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या  धर्मगुरूंच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते.        यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी  उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन  तसेच सर्व धर्माचे धर्मगुरु उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी  डॉ. गुरसळ म्हणाले, मृत्यूदर रोखण्यासाठी लसीकरण करुन  घेण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे हि महत्वाची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे हे कार्य सर्व धर्मगुरु पार पाडतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.

Tuesday, March 9, 2021

महाकृषी उर्जा अभियान

महाकृषी उर्जा अभियान( हिरालाल लोखंडे ) दिनांक ०९ /०३ /०२०२१ रोजी ग्रामपंचायत केळवे ता,जि पालघर. यांच्या ग्रामपंचायत सभागृहात ( केळवे बाजारात ) श्री, अग्रवाल साहेब, महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता, सौ नागावकर मॅडम अधिक्षक अभियंता, पालघर श्री मचिये साहेब कार्यकारी अभियंता पालघर, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मुकुंद देशमुख उपकार्यकारी अभियंता सफाळे विभाग व सहकारी अभियंता यांनी महाकृषी  उर्जा अभियान अंतर्गत शेतीपंपाना नवीन विज जोडणी धोरण व शेतीपंप ग्राहकांना शेतीपंप विजबिलाच्या थकबाकी मधे ५० % टक्के सुट ( ५० %टक्के विजबिलाची थकबाकी माफ ) योजने बाबतीत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. 
   केळवे ग्रामपंचायत विगातील एकूण १९७ शेतीपंप ग्राहकांनकडून ५० % टक्के विज थकीत देयक सवलती अंतर्गत ३ लाख ८५ हजार रूपये वसुली मधे  मोठे योगदान असल्या कारणांमुळे श्री, मुकुंद देशमुख उपकार्यकारी अभियंता सफाळे यांचा महावितरणच्या तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकमात सौ भावना किणी, सरपंच ग्राम पंचायत केळवा, श्री नितिन राऊत उपसरपंच केळवा, श्री सदाभाऊ राऊत, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते थकबाकी मुक्त शेतकरी बंधु आणी भगिनी यांना सन्मान पत्र देऊन सन्मानीत  करण्यात आले. 
  आज पर्यंत सफाळे उपविभाग अंतर्गत एकूण १३१४ शेतीपंप ग्राहकानी शेतीपंप वीज देयक थकबाकी ५० % टक्के सवलत योजनेचा फायदा घेऊन २९लाख रूपये महावितरणच्या खात्यात जमा केलेले आहेत

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...