पर्यटनातून ग्रामीण भागाचा विकासाच्या वाटा मोकळ्या
पालघर तालुक्यातील दातीवरे,कोरे व मथाने आणि चटाळे गावांना जिल्हा पर्यटन यादीत समाविष्ट करून त्यामाध्यमातून किनार पट्टीवरील गावांचा विकास साधता येईल,ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. निलेश रमेश राऊत यांनी नुकताच पालघर जिल्हा परिषद च्या अध्यक्षा मा.श्रीमती भारती ताई कामडी यांची भेट घेऊन चर्चा केली व मागणी चे निवेदन दिले,
यावेळी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख मा.श्री.राजेशभाई शाह आणि पालघर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. श्रीनिवास वनगा उपस्थित होते,
यावेळी मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान याआधी एडवन, अंबोडे व वेडी या गावांना पर्यटन दर्जा व विकास निधी मिळवून देण्यात सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत यांनी मेहनत घेतली होती.
गावातील बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होऊन विकास साधला जाईल अशी भावना यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यानी व्यक्त केली.तर पर्यटन विकासामुळे ग्रामीण भागाचा विकासाच्या वाटा मोकळ्या होत असल्याचे जि. प.अध्यक्षा श्रीमती भारतीताई कामडी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment