Friday, September 18, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भिवंडी. दिनांक १8/९/२०२०

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भिवंडी. 
     दिनांक १8/९/२०२०
    
       *भिवंडी ग्रामीण क्षेत्रात कोविड टेस्ट सेंटर उभारण्यात यावे यासंदर्भात मनसेने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*
        भिवंडी (गिरीश देव)  जगभरासह भिवंडीहि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः भिवंडी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत चाललें आहे. ग्रामीण भागात कोरोना टेस्ट नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. यास्तव ग्रामीण भागात कोरोना टेस्ट सेंटर उभारण्यात यावे म्हणून मनसे भिवंडीने उपविभागीय अधिकारी यांना डी के म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश )यांच्या मार्गदर्शनाने निवेदन दिले. यावेळी मदन अण्णा पाटील (जिल्हा संघटक ), शैलेश बिडवी (जिल्हा अध्यक्ष, भिवंडी लोकसभा क्षेत्र ), मनोज गुळवी (शहर अध्यक्ष, भिवंडी )परेश चौधरी (तालुका अध्यक्ष, भिवंडी ), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव तसेच आदिकरून शेकडो मनसे सैनिक प्रांत कार्यलायत उपस्थित होते.

Thursday, September 17, 2020

दिग्गज वार्ताहर * बातम्यादिनांक:-१८.सप्टेंबर २०२०वार। :- शुक्रवार

*दिग्गज वार्ताहर * बातम्या
दिनांक:-१८.सप्टेंबर २०२०
वार।   :- शुक्रवार

▪ मोदी सरकारसाठी झटका; शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्या हरसिम्रत कौर बादल यांनी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला

▪ कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच; आर्थिक अराजकतेस नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार, शिवसेनेचा मोदी सरकारवर टीकास्त्र

▪ वृत्तवाहिन्यांच्या आधी डिजिटल मीडियावर नियंत्रण आणण्याची गरज, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


▪ कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त, अमेरिकी तज्ज्ञाचे मत

▪ आजपासून एसटीच्या लांबपल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस या पूर्वीप्रमाणेच पूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने धावणार 

▪ राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त, तर 24 हजार 619 नवे रुग्ण

▪ मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

▪ खुशखबर! भारतात 22 सप्टेंबर रोजी लाँच होणार Poco X3 स्मार्टफोन 

▪ तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिस्पर्धी इंग्लंडवर 2-1 ने विजय  

▪ अक्षय कुमार स्टारर लक्ष्मी बॉम्ब 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर धडक देणार

जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

अलिबाग, जि. रायगड, दि. 17 (जिमाका): जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडून आज सकाळी कार्यालयीन वेळेत स्वीकारला. यापूर्वी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांची बदली झाल्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 

श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहेत्रे यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, संशोधन सहाय्यक परिचर देसाई हे उपस्थित होते.

पालघर मध्ये पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे अवचीत्य साधून संपर्ण प्रभाग क्र. ६ मध्ये स्वच्छ करण्यात आला.

पालघर मध्ये पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे अवचीत्य साधून संपर्ण प्रभाग क्र. ६ मध्ये स्वच्छ करण्यात आला.
 अभियान .पालघर (प्रतिनिधी)  पालघर नगर परिषद आरोग्य सभापती आणी प्रभाग क्र.6  ची नगर सेवीका सौ. लक्ष्मी देवी हजारी यांच्या  नेत्रत्वात खाली  आज देशाचे लोकप्रिय  पंतप्रधान मा.नरेन्द्र मोदी जी यांच्या जन्मदिवसाचे अवचित्य साधून  वार्ड क्र.६  मध्ये  स्वच्छता अभियान करण्यात आला .या कार्यक्रमात पालघर भाजपा  जिल्हा अध्यक्ष मा.नंदकुमार पाटील साहेब भाजपा जिल्हा युवा मोर्चा चे अध्यक्ष समीरजी पाटील आणी भाजपा पालघर जिल्हा चे पदाधिकारीआणि भाजपा चे जेष्ठ नेते मा.मिठालाल जी जैन महाराष्ट्र युवा मोर्चा चे अंकुर राऊत गटनेता मा.भावानंद संखे पालघर शहर अध्यक्ष मा.अरुण माने जी आणि भाजपा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिग्गज वार्ताहर पत्रिका : 18-09-2020

*२० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार**जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ*

*२० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार*

*जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ*

    पालघर (प्रतिनिधी)दि 17 :  २० सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला  आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन १९९५  पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पालघर ग्रामीण व वसई महानगरपालिका क्षेत्रातही ही मोहीम दरवर्षी यशस्वीरित्या  राबविली जाते. सर्व बालकांना  विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित सर्वेक्षण, आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे ही पोलिओ निर्मूलनाच्या यशासाठी असलेली त्रिसूत्री पालघर जिल्ह्यात नियमितपणे राबविले जाते त्यानुसार या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या लसीकरण मोहिमेला देखील सर्व पालकांनी  उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले.
    पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची टास्क फोर्स बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
    पोलिओ बाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच नगराध्यक्ष नगरसेवक पोलीस पाटील जिप सदस्य ग्रापं सदस्य तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मोहिमेचे उद्घाटन करावे असे विनंतीवजा आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

       कोरोना काळात लहान बालकांना लसीकरण करते वेळी शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच लसीकरण केले जाणार आहे. बुथवर सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था लसीकरण करणाऱ्या कर्मचारी स्वयंसेवक यांनी मास्क आणि ग्लोव्हज घालणे, प्रत्येक लाभार्थ्याला लसीकरण केल्यानंतर आपल्या हात सॅनिटाईज करणे, येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येणे, सामाजिक अंतर पाळणे, घर भेटीच्या वेळेस सॅनिटायझर मास्क व ग्लोव्ज सोबत घेऊन जाणे, लहान बालकांना स्पर्श न करता केवळ मातेच्या स्पर्शानेच बालकांना लस पाजणे, व इतर अनेक नियम यावेळी पाळण्यात येऊन लसीकरण करणार  असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.
 अशांच्या माध्यमातून नियमित पणे लहान बालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते अशी माहिती यावेळी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण यांनी दिली.
    सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम राबवली बुथवर जाईल. त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस याप्रमाणे घरभेट देऊन राहून गेलेल्या बालकांना लस देण्यात येईल.
या बैठकीस अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर, WHO चे प्रतिनिधी डॉ.किशोर चव्हाण,  सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील. वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनकर गावित उपस्थित होते.

Tuesday, September 15, 2020

*भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे*

*भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार- पालकमंत्री दादाजी भुसे*

*पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली भूकंपग्रस्त भागाची पाहणी*
     
       पालघर (प्रतिनिधी) दि 15 :  जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील तलासरी धुंदलवाडी या भागात नियमित भूकंपाचे धक्के बसत असून भूकंपग्रस्त भागाला तातडीने मदत  करण्यात येईल  तसेच  भूकंपाच्या     तीव्रतेचा परिणाम कमी  करण्यासाठी  तज्ञांची मदत घेऊन त्योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरे तयार करण्यात येतील असे प्रतिपादन  कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
       भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  पालघर जिल्ह्याचा  दौरा  केला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी या गावात जाऊन पालकमंत्र्यांनी भूकंप ग्रस्त घरांची पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  भूकंपग्रस्त भागाचा पाहणी केलेला अहवाल तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करून तातडीच्या  उपाययोजना तसेच  कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील .तसेच शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल.असेहि  प्रतिपादन श्री भुसे यांनी  केले. 
       धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर येथे भेट देऊन तेथे दाखल असलेल्या  कोव्हीड च्या रुग्णांची भेट घेतली.   जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या भूकंपावर करण्यात येणाऱ्या  उपाययोजना या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.  माझे कुटुंब माझी जबाबदारी या  मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांनी आपल्या गावाकडे आपले कुटुंब म्हणून पाहिले पाहिजे,व आपली जबाबदारी समजून  त्याची काळजी घेतली पाहिजे. या योजनेत अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करून सदस्यांची तपासणी करून घ्यायची आहे.ही तपासणी कोव्हीड पुरती मर्यादित न राहता कुठलेही आजाराचे निदान यातून  करता येणार आहे. व त्यातून सुदृढ नागरिक निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.असे आवाहन ही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
  यावेळी जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांनी भूकंपामागील शास्त्रीय कारण प्रशासनाने शोधून काढले पाहिजे  असे मत व्यक्त केले.तर आ.सुनील भुसारा यांनी भूकंपग्रस्त भागात निवारा स्थळ बनवणे गरजेचे आहे .जुन्या शाळा आहेत त्यांना   धक्का लागल्यास गम्भीर परिस्थिती उदभवू शकते अशी शक्यता व्यक्त केली.
 आ.श्रीनिवास वणगा यांनी भविष्यात धक्का लागला तर काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.  असे मत व्यक्त केले. 
  यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, मु.का.अ.जि.प.पालघर महेंद्र वारभुवन,    
 प्रांत अधिकारी श्रीमती मित्तल   उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...