महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भिवंडी.
दिनांक १8/९/२०२०
*भिवंडी ग्रामीण क्षेत्रात कोविड टेस्ट सेंटर उभारण्यात यावे यासंदर्भात मनसेने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*
भिवंडी (गिरीश देव) जगभरासह भिवंडीहि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः भिवंडी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत चाललें आहे. ग्रामीण भागात कोरोना टेस्ट नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. यास्तव ग्रामीण भागात कोरोना टेस्ट सेंटर उभारण्यात यावे म्हणून मनसे भिवंडीने उपविभागीय अधिकारी यांना डी के म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश )यांच्या मार्गदर्शनाने निवेदन दिले. यावेळी मदन अण्णा पाटील (जिल्हा संघटक ), शैलेश बिडवी (जिल्हा अध्यक्ष, भिवंडी लोकसभा क्षेत्र ), मनोज गुळवी (शहर अध्यक्ष, भिवंडी )परेश चौधरी (तालुका अध्यक्ष, भिवंडी ), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव तसेच आदिकरून शेकडो मनसे सैनिक प्रांत कार्यलायत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment