सफाळे पोलीस ठाणे,
जि. प. / पंचायत समिती पोट निवडणुकी साठी सज्ज.
सफाळे ( हिरालाल लोखंडे) पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी पोट निवडणूकीच्या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा. पोलिस निरीक्षक यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी तांदुळवाडी, लालठाणे, खडकोली आदी भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, सामाज सेवक, यांची संयुक्त रित्या ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी ता,जि पालघर .येथे पोट निवडणूक संदर्भात मिटींग घेतलेली.
सदर मिटींगमध्ये उपस्थित ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत मधील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना, सदर निवडणुक दरम्यान " करोना " विषाणूंचा प्रादुर्भाव, संसर्ग, व संक्रमण होणार नाही. या करीता उपाययोजना करून स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात, मार्गदर्शन व सुचना केल्या. मतदान व मतदाता या संदर्भातील प्रश्न, अडीअडचणी ऐकून घेऊन, समस्यांचे निराकरण, समाधान करीत. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या " आचार संहितेचे " पालन करण्यासाठी सर्वाना सुचना देत, निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत, कायदा आणी सुव्यवस्था राखत आगामी निवडणूक शांततेत, निर्भिडपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी श्री सुजित पाटील - पोलीस पाटील तांदुळवाडी, श्री संदेश पाटील - पोलीस पाटील लालठाणे, श्री शदर सातवी - पोलीस पाटील खडकोली, श्री कैलास शेळके पो, नाईक, श्री राजेंद्र घुगे काॅन्सटेबल सफाळे पोलीस ठाणे आदि उपस्थित होते
No comments:
Post a Comment