Thursday, September 23, 2021

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!

किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!
भिवंडी दि.२३(सुरजपाल यादव) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वकोकण विभागीय सरचिटणीस तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी शहरातील सदस्य आचार्य श्री. सुरजपाल यादव,श्री.श्रीनिवास सिरिमल्ली,श्री.मेहंदी हसन,श्री.वेंकटेश रापेल्ली,श्री.सी.पी.तिवारी,श्रीमती. परवीन खान यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन छोटेखानी प्रमाणात वाढदिवस साजरा करून त्यांचा सन्मान केला.व त्यांच्या बद्दल असलेले प्रेम प्रत्येकाने आपल्या शब्दात व्यक्त केले.त्यानंतर  शाल  व पुष्पगुच्छ देऊन  त्यांचा सन्मान केला.त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी आभार मानले. व असेच प्रेम भविष्यातही आपण कायम ठेवावे या सदिच्छा व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...