अनोळखी मयत इसम तपास कामी.
सफाळे प्रतिनिधी - दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी कोरे पोस्ट एडवण गावाच्या समुद्र किनारी एक अनोळखी मयत पुरूष जातीचे प्रेत आढळून आले आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.
वय अंदाजे ३० ते ४० वर्ष, अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, प्रेत पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले असून दोन्ही हात - पाय माश्यांनी खाल्लेले आहे. सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा. केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे अकस्मात मृत्यू रजि. नंबर ०७ / २०२१ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, सदर इसमा बद्दल कोणासही, काही माहिती असल्यास किंवा मिळाल्यानंतर केळवा सागरी पोलीस ठाणे मोबाईल नंबर ८६६९६०४४३९ किंवा ८६६९६०४४३८ यावर संपर्क करावा.
पुढील तपास पालघर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या अधिपत्या खाली व प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पुढील तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment