Sunday, September 19, 2021

अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले

अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी  २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले
 ... 
अमेठी - किशोर पाटील
नुकताच पारपडलेल्या पुरुष फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पै. सुरज कोकाटे (   ६१किलो  ) वजनी गटात  जुनियर वर्ल्ड रोप्य-पदक विजेता पै. रविंदर ( सेना दल ) याला ९- ८ अशा गुणफरकाने  हरवून   चित्तथराक कुस्ती लढून सुवर्ण पदक पटकावले . तसेच पुण्याचा पै. आदर्श गुंड याने राजस्थान , चंदीगड च्या पैलवानांना हरवून रोप्य पदक पटकावले . 
दिनांक १७ ते १९ दरम्यान पारपडलेल्या स्पर्धेचे विविध गटातील  पदक विजेते खालील प्रमाणे :- 
फ्री- स्टाईल :- ५७ किलो - सुवर्ण पदक 
 पै. सौरव इगवे  ( सोलापूर ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :-  अर्जुनवीर पै. काका पवार 
फ्री- स्टाईल :- ६१किलो - सुवर्ण पदक 
 पै. सुरज  कोकाटे  ( पुणे ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :-  अर्जुनवीर पै. काका पवार 
फ्री- स्टाईल :- ६५ किलो - रोप्य पदक 
 पै. सौरभ पाटील  ( कोल्हापूर ) वीर हनुमान तालीम ,राशिवडे ता.  राधानगरी , प्रशिक्षक :-  पै. सागर चौघुले 
फ्री- स्टाईल :- ७९ किलो - कास्य पदक  
 पै. समीर शेख  ( सोलापूर ) हनुमान आखाडा पुणे , प्रशिक्षक :- गणेश दांगट 
फ्री- स्टाईल :- १२५ किलो - कास्य पदक  
 पै. आदर्श गुंड  ( पुणे ) जोग व्यायाम शाळा , देवाची आळंदी पुणे प्रशिक्षक :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा . दिनेश गुंड 
ग्रीको - रोमन :- ७७ किलो -  कास्य पदक  
पै. गोकुळ यादव  ( मुंबई ) जोगेश्वरी कुस्ती आखाडा 
महिला :- ५३ किलो कास्य पदक 
स्वाती शिंदे  ( कोल्हापूर ) सदाशिव राव मंडलिक कुस्ती केंद्र , मुरगूड ता. कागल , कोल्हापूर प्रशिक्षक :-  पै. दादासो लवटे 
महिला :- ५९ किलो रोप्य  पदक 
भाग्यश्री फंड  ( अ . नगर  ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ,  प्रशिक्षक :-  पै. किरण मोरे
महिला :- ६२ किलो कास्य पदक 
सोनाली मंडलिक ( अ . नगर  )  ( अ . नगर  ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ,  प्रशिक्षक :-  पै. किरण मोरे 
पै. सौरभ व पै. सुरज कोकाटे यांची सायबेरिया येथे होणाऱ्या जागतिक अंडर २३ वयोगटातील स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे . 
सदर स्पर्धेस पंच :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड ( पुणे ) व  आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच श्री नवनाथ ढमाळ ( सातारा ) व प्रशिक्षक :- श्री संदीप पठारे ( पुणे ) अनिता गव्हाणे ( बारामती ) श्री संभाजी निकाळजे ( अ . नगर )  यांनी मोलाचे सहकार्य केले . 
वरील सर्व पदक विजेते खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, पालक मंडळींचे  महाराष्ट्र  राज्य कुस्तीगीर परिषदे तर्फे व दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...