भिवंडी (प्रतिनिधी)वाढदिवस साजरा करायचा असेल तर कसा करावा हे उत्तम उदाहरण
अनेक जण वाढदिवसाच्या दिवशी पार्टी करतात , फिरायला जातात , भरमसाठ खर्च करतात पण एक आदर्श राहील सर्वांसमोर असा
आज दिनांक 17- 09 - 2021 रोजी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव यांनी आपल्या भिवंडी मधील मैत्रीकुल अनाथ आश्रमात स्वतः जाऊन त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू दिल्या ( 50 किलो कांदे , 50 किलो बटाटे 25 किलो लसूण , चटई , चादर , प्रोजेक्टर व स्ट्रीट लाईट ) ह्या वस्तू त्यांना अत्यंत गरजेच्या होत्या
त्या अनाथ आश्रमात अनेक विद्यार्थी शिकून चांगल्या क्षेत्रात करिअर करत आहेत त्यांना कोणाचाही आधार नाही जे कोणी जस देईल त्यात ते समाधानाने वापर करून जगतात त्यांच्या सोबत एक आनंदाचा क्षण साजरा केला
त्या आश्रमाचे जगताप सर सर्व मुलांची देखभाल आणि आश्रम चालवतात बापगाव येथे मैत्री कुल चे एक सुंदर घर तयार झाले आहे
तरी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी जशी जमेल तशी मदत करावी ही विनंती श्री गिरीश महेश देव यांनी केली आहे
No comments:
Post a Comment