सार्वजनिक खाजगी व भागीदारी तत्वावर सधन कुकुट विकास गट स्थापन करणे (PPP)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- पालघर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक खाजगी व भागीदारी तत्वावर सधन कुकुट विकास गट स्थापन करणे (PPP) या योजने करिता वसई, डहाणू व तलासरी या तालुक्यातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजने अंतर्गत एकूण प्रकल्प खर्च रक्कम रु.10,27,500/- एवढी असून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50% अनुदान म्हणजेच रु.5,13,750/- देय असून उर्वरित 50 % रक्कम, लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून घेऊन उभा करू शकतो.
योजनेचे निकष :-
• अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असावी.
• लाभार्थ्याकडे 2500 चौ फुट स्वतः च्या मालकीची जागा तसेच 1000 चौ फुट चे 2 शेड, खाद्य,अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र यासाठी स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे.
• शेड च्या ठिकाणी दळण वळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा असणे आवश्यक आहे.
• एकूण प्रकल्प खर्च रक्कम रु. 10,27,500/- अंतर्गत लाभार्थ्यास 50 % अनुदानात खालील बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
• प्रती 1000 चौ. फुटाच्या 2 पक्शिगृहाचे बांधकाम,स्टोअर रूम,पाण्याची टाकी, विद्युतीकरण.
• खाद्य व पाण्याची भांडी, ब्रूडर, इतर उपकरणे व लसीकरण
• लघु अंडी उबवणूक यंत्र
• 1000 एकदिवशीय मिश्र नर +मादी पिले प्रती पक्षी रु. 60/-
• 20 आठवड्यावरील अंड्यावरील 500 पक्षी नर + मादी प्रती पक्षी रु. 150/-
• उबवनुकीची अंडी 400 प्रती अंडी रु. 10 /-
• 1000 एकदिवशीय पिल्लांसाठी 20 आठवडे कालावधी पर्यंत पक्षी खाद्य पुरवठा
• एग नेस्ट
• पक्षी खाद्य ग्राईनडर
लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. प्राप्त झालेले सर्व अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पालघर यांच्याकडे सादर करण्यात येतील. त्यानंतरच लाभार्थींची निवड करण्यात येईल. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त संख्येने वरील तीन तालुक्यातून अर्ज करण्यात यावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment