Wednesday, July 14, 2021

जागतिक युवा कौशल्य दिन निमित्त नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

*जागतिक युवा कौशल्य दिन निमित्त नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी* 
*ऑनलाईन रोजगार मेळावा*


           ठाणे दि.15 (प्रतिनिधी) :- जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) चे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, ठाणे यांचे संयुक्त विद्दमाने जिल्हयातील कुशल/अकुशल उमेदवारांसाठी दिनांक 15 जुलै 2021 ते 17 जुलै 2021 या कालावधीत https://mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वेब पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker मध्ये लॉगिन करून Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लीक करावे व रोजगार मेळाव्याच्या यादीतील जिल्हा निवडून रोजगार मेळाव्याची व रिक्तपदांची माहिती पाहून ऑप्शनवर क्लीक करावे. व या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती कविता ह जावळे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...