सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात.....
पालघर (प्रतिनिधी)२७ जुलै रोजी *न त्वह' कामये राज्य' न स्वर्ग न पुनर्भवम |
कामये दुःखतप्ताना' प्राणीनामार्तीनाशनम ||*
हे ब्रीद घेऊन सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट एक माणुसकीची भिंत पुरस्कृत अनुसया राजाराम सागवेकर वाचनालय आणि कै.अनंत दाजी वझे वाचनालय यांचा रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट ची एक टीम रायगड च्या दिशेने रवाना झाली. या कामासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दिनेश गुडेकर सर, श्री जगदीश किणी सर, श्री. योगराज वझे, यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच श्री दिलीप तरे उपसरपंच माकणे, समाजसेवक कामनिष राऊत, इंद्रमल जैन, दिनेश गुरद्वान, अनंत पाटील सर, राजन घरत सर, महेंद्र पाटील सर, दत्तात्रेय भोईर, बाबुराव भोईर सर, शैलेश पाटील सर व इतर अनेक दात्यांनी या कामासाठी मदतीचा हात दिला.या सर्वांचे ट्रस्टचे अध्यक्ष गुडेकर सर यांनी आभार मानले. सुनंदा चॅरीटेबल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या टीमला त्यांच्या कामाचं कौतुक करत सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो.निरीक्षक श्री संदीप कहाळे व पीएसआय पंकज पाटील साहेब तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment