माणुसकीची कास धरू पूरग्रस्त बांधवांना जमेल तितकी मदत करू -मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष -समीर सुभाष मोरे
पालघर (प्रतिनिधी)कोकण परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्वस्त झाली आहेत. वीज नाही, पाणी नाही, खायला अन्नही नाही आणि वरुन पडणारा पाऊस कोकण वासियांच्या धैर्याचा, जिद्दीचा आणि संयमशीलतेचा कसोटी पाहत आहे की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शक्य ती मदत करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले होते.
त्यामुळे जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत, त्यांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पालघर जिल्हा उपाध्यक्ष समीर मोरे आणि मनसे कार्यकर्ते खेड, चिपळूण पूरग्रस्त भागात दाखल झाले.
यानंतर पक्षाचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त बांधवांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, बिस्कीट, ब्लॅंकेट्स, फिनेल, पिण्याचे पाणी बॉटल, कोलगेट, बॅटरी, मेणबत्ती, मॅचिस, लहान मुलांचे कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू अशा जीवनावश्यक वस्तूंचे पालघर विधानसभेतर्फे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात तीन दिवस मदत कार्य करून, समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम आणि जिवंत उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आम्ही पुन्हा दोन दिवसांनी पूरग्रस्त भागात जाणार आहोत. कारण महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना शक्य तितकी मदत करा आणि मदतीसाठी आपल्याकडून कुठलीही कुचराई होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन समीर मोरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment