Sunday, July 18, 2021

पावसामुळे सफाळे परिसर झाला जलमय !

पावसामुळे सफाळे परिसर झाला जलमय !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १७ जुलै २०२१ च्या रात्री पासुन संपूर्ण पालघर जिल्ह्यात, सतत धार पडणाऱ्या पावसाने सर्वत्र नुकसानी केली. सर्व जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सखल भागात पाणी साचले, घरा दारात पाणी शिरले. कुठे घरे, तर कुठे झाडे पडली. रस्तेही जलमय झाले. रहदारी ठप्प झाली. अशा वेळी आपत्कालीन व्यवस्थापन पण ही विस्कळीत झालेले पहावयास मिळत आहे. राजाने मारले, पावसाने झोडपले दाद कुणा कडे मागावी अशी परिस्थिती आज आहे. 
 सफाळे पुर्व - पश्चिम भागातील नंदाडे, रोडखड पाडा, देवी पाडा, माकणे, साईनगर, शांतीनगर, नुतन नगर, सफाळे गाव, सफाळे - वेढी रोड, सफाळे स्टेशन भागातील बाजार पेठेतील अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापारी, दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. नुकसानीचा अंदाज नुकसान धारकच सांगू शकतील. 
रात्री पासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नंदाडे, आय टी आय परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने, तेथील रहिवासी घराच्या छतावर लहान मुलांना घेऊन मदतीची, वाट पाहत असल्याचे कळताच, समाज सेवेचा ध्यास घेतलेले मदत कार्यात अग्रेसर असलेले सफाळे सर्प मित्र परिवार आणी त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे, सफाळे ग्रामपंचायत उपसरपंच श्री राजेश म्हात्रे, ( बंटी ) ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा, पोलीस निरीक्षक साहेब. पोलिस कर्मचारी, धोंगडे, भवर, खोत आदि यांनी नंदाडे भागातील पाण्याने वेढलेल्या भागात मदतीची वाट पाहणारे अंदाजे १०० ते १५० लोकांना सुखरूप पणे बाहेर काढून, नंदाडे येथील समाज मंदिरात आणुन सोडले. हे कार्य १८ जुलै २०२१ रोजी सकाळी ४ ते सकाळी ७ पर्यत सुरू होते.
पावसामुळे पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास जाण्यास नैसर्गिक मार्ग अनेक कारणांमुळे बंद झाल्या मुळे, सफाळे पोलीस ठाणे या मध्ये अंदाजे अर्धा फुट पाणी भरल्यामुळे, कार्यरत कर्मचारी धोंगडे, विसावे, भवर, खोत, खान, महिला पोलीस कर्मचारी गिंबल  तरे, धांगडा, पवार यांच्या किट पेटी मधे पाण्याने शिरकाव केल्यामुळे, त्यांचे साहित्य, दस्त ऐवज, महत्वाचे कागदपत्रे पाण्याने भाजुन गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
पोलीस उपनिरीक्षक श्री चेमटे साहेब, पोलीस  कर्मचारी शेळके, घुगे, संखे, म. शि,गिंबल यांनी रात्र भर मोलाचे सहकार्य करून ठिकठिकाणी पाणी साचलेले असताना सुध्दा, वाहतूक कोंडी होऊ न देता, वाहतूक सुरळीत ठेवली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...