रायगड सरकारी जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सुहास माने यांची पदावरून बडतर्फ करून हाकलपट्टी करण्याची मागणी.
जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांनी केली
रायगड (प्रतिनिधी) सरकारी जिल्हा रुणाल्यातील सर्व धुरा हातात घेतल्या पासून डॉ.सुहास माने यांनी आपल्या पदाचा मनमानी पद्धतीने वापर करून कंत्राटी कामगार यांचा देखील छळ केला आहे .तसेच त्यांनी खरच ज्याठिकाणी डॉक्टर ची गरज आहे तिथे न पाठवता दुसरीकडे पाठवणे असा मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला होता.ओम साई मंडल कर्जत यांनी देखील तक्रार दाखल केली होती. तसेच कोरोना काळामध्ये अनेक अशी कृत्यकेली आहेत.की यामुळे सर्व सामान्य जनतेचे हाल झाले आहेत.ह्यांच्या विरोधात जिल्हाधीकारी कार्यालयात ह्या डॉक्टर विरोधात अनेकतक्रारी दाखल झाल्या होत्या पण ह्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ह्या डॉक्टर ची हिम्मत जास्त वाढली .त्यांनी कोरोना मध्ये रुग्णांना ने आण करण्यासाठी सरकारी रुग्णवाहिनी असताना देखील त्यांनी कोणालाही दिली नाही .ह्या भागात ह्याच डॉक्टर विरोधात सोशल मीडियावर व रायगड जिल्ह्यात जनतेच्या चर्चेत हा विषय असायचा पण यांच्या विरोधात कोणीही पाऊल उचले नाही .ह्यासर्व गोष्टीची जाणीव रायगड जिल्हा मधील शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे जिल्हाअध्यक्ष जगदीश घरत यांच्या कानावर येताच त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करून घेतली व लगेच त्यांनी एक संघटने चे पत्र तयार करून .अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांना व निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाड यांना हे निवेदन दिले .ह्या निवेदनात डॉक्टर यांनी जनतेसोबत जी वागणूक केली आहे व त्यांनी केलेला सर्व गोंधळ ह्या निवेदनात नमूद करून त्यांची असलेल्या पदावरून हकलपट्टीकरून ह्या पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.ही लवकरात लवकर व्हावी यासाठी ते याचा पाठपुरावा करून घेतील असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
No comments:
Post a Comment