अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करणारे, महसुली व पोलीसांच्या रडारवर !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर यांच्या हद्दीतील वैतरणा रेल्वे ब्रिज ( पश्चिम रेल्वे ) क्रमांक ९२ व ९३ च्या परीसरात मा. जिल्हाधिकारी पालघर यांचे रेती उत्खनन व नौका वाहतुकीसाठी मनाई आदेश असताना, स्वतःच्या फायद्यासाठी कोणतीही परवानगी नसताना, चोरट्या रितीने, अवैधरीत्या रेती वाहतूक व उत्खनन होत असल्याने वैतरणा ब्रिज व वाढीव - वैतीपाडा या गावांच्या किनारी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असताना, मार्गदर्शक सूचना व आदेश प्रमाणे श्री सुनिल शिंदे तहसिलदार तथा दंडाधिकारी सो. पालघर श्री भीमसेन गायकवाड साहेब सहा, पो, निरीक्षक साहेब प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलीस ठाणे, श्री कांबळे पालघर जिल्हा खनिकर्म अधिकारी, मार्गदर्शन करीत, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकरी - कर्मचारी, पोलीस मित्र यांनी सयुंक्त पणे दिनांक २३ जून २०२१ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी स्व:ताच्या फायद्यासाठी रेती उत्खनन न वाहतूक करणार्या वर कारवाई करून गुन्हे दाखल केले. १) सुरेश काशिनाथ राऊत रा. वाढीव पो. नवघर,पो,नवघर ता,जि पालघर व त्याचे ३ ते ४ साथीदार.२) गुरू अनंत पाटील रा. वाढीव ता,जि पालघर. व त्याचे २ ते ३ साथीदार. ३) विनायक काशिनाथ पाटील रा, वाढीव ता,जि पालघर त्याचे ४ ते ५ साथीदार सदर व्यक्ती रेतीच्या भरलेल्या बोटी घेऊन जात असताना, थांबण्याचे सांगितले असता, किनार्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बोटी ठेऊन, किनार्या लगतच्या झाडी झुडपात पळुन गेले. मा. तहसिलदार साहेब पालघर यांच्या समवेत सोनावे - दारशेत पाडा भागात एक सेक्शन पंप, दोन रेती भरलेल्या फायबर बोटी, असा एकूण सदरच्या तीनही बोटी मध्ये अंदाजे एकूण २०,४८,१७४ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी यांच्या ताब्यात मिळून आला असून तो मा. तहसिलदार साहेब यांच्या समक्ष जागीच सर्वासमोर विल्हेवाट लावण्यात आली. या बद्दल केळवा सागरी पोलीस ठाणे, तसेच सफाळे पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे
सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे दिनांक २३ जुन २०२१ रोजी गुन्हा रजि,न ३१/ २०२१ , गुन्हा रजि,न ३२/२०२१, गुन्हा,रजि,नं ३३/ २०२१ ,भा, द, वि,सं,कलम ३७१ ,१८८, ३४, सह, जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ),पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २६ जुन २०२१ च्या संयुक्त कारवाई दरम्यान दहिवले ता,जि पालघर येथे वैतरणा नदीच्या किनारी रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेला १) सेक्शन पंप (जु .वा. कि. सु.) अंदाजे किंमत १२,००,०००/- रूपये २) रेती वाहतुकी करीता आलेली बोट ( जु. वा. कि. सु.) अंदाजे किंमत १,५०,०००/- रूपये ३) बोटी मधील रेतीची अंदाजे किंमत १९,७५२/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. ( सदर मुद्देमाल कारवाई करताना मा, तहसिलदार साहेब व महसुल अधिकारी यांनी वैतरणा नदीच्या पाण्यात बुडवून नष्ट केला आहे.)
या बद्दल श्री किरणा जोगदंड तलाठी, तलाठी सजा पारगांव ता,जि पालघर यांनी आरोपी मनोज घाटाळ , बोट मालक अज्ञात तसेच एक मजुर अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केली असून ,सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा, रजि,न ३८/२०२१, भा, द,वि,कलम ३७९, ३४, सह, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहिता १९६६ मधील कलम ४८, ( ७ ) ४८, ( ८ ) पर्यावरण अधिनियम १९८० चे कलम १५,१९ प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकारी पालघर, प्रभारी अधिकारी सफाळे पोलीस ठाणे, श्री संदिप कहाळे सहा, पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री ए. व्ही. खोत पुढिल तपास करीत आहे
दिनांक २३ जुन २०२१ रोजीच्या पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे वैतरणा नदीच्या किनारी केलेल्या कारवाईत आरोपी संकेत दिपक राऊत रा. वाढीव ता,जि पालघर व अज्ञात मजुर यांच्या कडील रेती वाहतुकी करीता वापरण्यात आलेली बोट ( जु.वा.कि. सु.) अंदाजे किंमत१,५०,०००/- बोटी मधील २ ब्रास रेती अंदाजे किंमत १९,७५८ /-रूपये असा एकूण १,६९,७५८ /-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. ( सदर मुद्देमाल मा. तहसिलदार साहेब व महसूल अधिकारी यांनी वैतरणा नदिच्या पाण्यात बुडवून नष्ट केला आहे )
या बद्दल श्री किरण जोगदंड तलाठी तलाठी सजा पारगांव ता,जि पालघर ,यांनी आरोपी संकेत दीपक राऊत व अज्ञात मजूर यांच्या विरोधात सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हे. रजि,न ३९/२०२१ भा,द,वि,सं,कलम ३७९,३४,सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ ( ७ ) ,४८ ( ८ ) पर्यावरण अधिनियम १९८० चे कलम १५,१९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर प्रभारी पोलीस अधिकारी सफाळे पोलीस ठाणे श्री संदीप कहाळे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री एल. एन. धोंगडे पुढील तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment