राष्ट्र सेविका समितीच्या जेष्ठ सेविका सुधा नामजोशी यांचे निधन
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) शनिवार दिनांक ८ मे २०२१ रोजी सुधा महादेव नामजोशी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी कर्दळ - सफाळे येथे निधन झाले. नामजोशी कुटूंब हे मुळचे कोकणातील. नोकरी निमित्ताने कै. महादेव नामजोशी सर शारदा हायस्कूल सफाळे ( आताचे हरेश्वर महादेव पंडित विद्यालय ) येथे संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत झालेले शिक्षक.
शिक्षक आणि तेहि संस्कृत विषयाचे असल्याने, त्यांची भाषा शैली - पेहराव, काळी टोपी, सफेद सदरा आणि धोतर. एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व. उच्च विचारसरणी, स्वच्छ चारित्र्य तसेच कुणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्ट आणि परखडपणे बोलणारे असल्याने, सफाळे परिसरातील पंचक्रोशीत त्यांचे एक विशिष्ठ व्यक्तीमत्व निर्माण झालेले. संघ परिवारातील ते एक कार्यशिल सदस्य होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत, संघ विरोधी वातावरण असताना सुध्दा त्यांनी संघ परिवाराची साथ कधिच सोडली नाही. अनेक सळसळत्या रक्ताच्या तरूण वर्गावर संघ परिवार व देश भक्तीचे संस्कार घडविले.
संघ परिवार व देश भक्तीच्या कार्यात त्यांची पत्नी सुधा नामजोशी यांची त्यांना मोलाची बहुमुल्य साथ लाभलेली. वेळी अवेळी येणारे संघ प्रचारक, त्यांच्या जेवणाची सोय करताना, वेळ काळ यांचा कधिही विचार न करता व कंटाळा न करता आपले कार्य करून संघ प्रचारकांना एक प्रकारे प्रोत्साहन देत असे. संघ परिवाराच्या कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून, आपल्या पतीच्या कार्यात नेहमी सहभागी होत असत. सफाळे परिसरातील संघ परिवारास कै. नामजोशी सर व कै. सुधा नामजोशी हे एक लाभलेले अमोल रत्न आहे. संघ परिवार त्याचे कार्य कधिही विसरूच शकत नाही. त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबात दोन मुले, एक मुलगी, सुना जावई व नातवंड असा परिवार असून त्यांची मुले यांनी संघ कामाचा वारसा सुरू ठेवला आहे. अशी माहिती धनंजय आक्रे यांच्या कडून मिळत आहे.
No comments:
Post a Comment