Friday, May 14, 2021

वडिलांचे स्वप्न साकार केले - डॉ.पौर्णिमा पाटीलकु.पौर्णिमा पाटील ही बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन!

वडिलांचे स्वप्न साकार केले - डॉ.पौर्णिमा पाटील
कु.पौर्णिमा पाटील ही बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे  सर्व स्तरातून अभिनंदन!
भिवंडी (प्रतिनिधी)दि.१४(स्व.रा.तो) भिवंडी तालुक्यातील मौजे केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली कु.पौर्णिमा  अंकुश पाटील ही जिद्दीने व अभ्यासु वृत्तीने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर आज बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
जवळ जवळ दोन वर्ष वडील हृदय विकाराच्या झटक्याने कोमा मध्ये गेले होते.त्यामुळे तिला असंख्य अडचणींवर मात करावी लागली . परीक्षा तोंडावर आलेली असताना तिला घरातील सर्व कामे करून ठाणे येथील हाईलांड रुग्णालयात आपल्या आई साठी दोन वेळचे जेवण बनऊन
देत असे वडील स्व.अंकुश पाटील हे किराणा दुकान चालवत असताना आपल्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहत होते.त्यांचे शिक्षण कमी असताना देखील एम्.एच.एफ.एस.
होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर येथे जाऊन त्यांनी तिचे एडमिशन घेतले व एकाच वेळी तिची फी एक रकमी भरली असल्याने परिस्थिती बिकट असताना देखील तिला पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली नाही.तिचे दोन वर्ष वडिलांच्या आजारामुळे वाया गेले.दोन वर्ष मृत्यूशी झुंज देत असताना अखेर  वडिलांचे निधन झाले.अशा कठीण प्रसंगी मात्र तिने आपली जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर पुन्हा नव्या उमेदीने  अभ्यासाला सुरुवात केली व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून दाखविले .आज ती  भिवंडी तालुक्यातील मौजे केवणी या छोट्याशा गावात डॉक्टर झाली याचा सर्व ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान वाटला आहे.त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तिच्या या यशा बद्दल तिने आपली आई कुंदा अंकुश पाटील,भाऊ मयूर अंकुश पाटील,भाऊ विशाल अंकुंश पाटील व सर्व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.जर त्यांनीच मला साथ दिली नसती तर मी आज डॉक्टर झाली नसती व वडीलांचे स्वप्न साकार करू शकली नसती माझे यश हीच माझ्या वडिलांना भावपुर्ण श्रध्दांजली आहे असे तिने सांगितले आहे.त्यामुळे तिचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...