Monday, May 31, 2021

दहिसर तर्फे मनोर मध्ये दहशत ?ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना मारहाण !

दहिसर तर्फे मनोर मध्ये दहशत ?
ग्रामविकास अधिकारी व  सरपंच यांना मारहाण !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मनोर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी श्री विजय बिल्लेवार यांनी दिनांक २८ मे २०२१ रोजी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडून प्रवेश केला असताना त्यांना त्यांच्या केबिनच्या मागिल बाजूस असलेल्या खिडकीची स्लायडींग काच फुटलेली, व टेबलावर बियरच्या बाटलीचे काच, केबिंनचे  पार्टिशन तुटून पडल्याचे आढळून आल्यानंतर श्री दशरथ जाधव ग्रामपंचायत सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनकर नाईक, सुनील नाईक याना घडलेला प्रकार निदर्शनास आणुन दिला. त्याच वेळी आशा वर्कर्स हि ग्रामपंचायत आॅफीस मधे आलेल्या. 
     सदर घटने बद्दल ग्रामविकास अधिकारी अहवाल तयार करीत असताना, अचानक पणे गावातील गौरव विश्वनाथ पाटील ग्रामपंचायत आॅफीस मधे येउन, ह्या काचा मी फोडल्या तुम्ही काय गावाचा विकास केला मला माहिती आहे. विचारले व दमदाटी  शिवीगाळ करीत निघून गेला. घडलेल्या प्रकारा बद्द्ल गावाचे  सरपंच,दशरथ जाधव, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक यांना बोलवून सांगितला असताना थोड्या वेळाने गौरव पाटील पुन्हा ग्रामपंचायत आॅफिस मधे येऊन ग्रामविकास अधिकारी बिल्लेवार यांच्या शर्टची कॉलर पकडून, टेबलावर असलेल्या लोखंडी पट्टीने मारहाण करीत असताना सरपंच यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केला असताना त्यांनाही मारहाण करण्यात येऊन, आॅफीसच्या फायली - सामानाची पाडापाड,करून पोलिस स्टेशनला माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला तर जिवे ठार मारण्याची धमकी सर्वसमक्ष देत निघून गेला.सदर घटनेची तक्रार ग्रामविकास अधिकारी यांनी मनोर पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि. नंबर १०६ / २०२१ प्रमाणे करण्यात आली असून भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे अटक करण्यात आली असून आरोपपत्र दाखल केले असताना आरोपीस दोन दिवस पोलीस कस्टडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ,भुयारी मार्गाचे भूमिपूजन, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण

*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ,भुयारी मार्गाचे भूमिपूजन, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण*

*कोरोना काळातही मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही*
- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
मुंबई,(प्रतिनिधी) दि. ३१: राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळला नाही गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. 
डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार झीशान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, आजचा कार्यक्रम हा या महानगराला दिशा आणि वेग देणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ  कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले.
विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मुंबई मेट्रोच काम आखीव-रेखीव आणि देखणं झाले आहे. मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई आधुनिकतेची कास धरणार शहर असलं तरी त्याला प्राचीनतेचा वारसा आहे. आगळवेगळ विविधतेन नटलेल्या शहरात होत असलेली विकास कामे हे सांघीक यश असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 
मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहीलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा देतानाच कोरोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
*राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही- उपमुख्यमंत्री*
पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या आदर्श राज्यकाराभाराप्रमाणे राज्य शासनाचे सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राला देशात प्रगतीशील राज्य बनविण्यामध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे. राज्याचा प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानी वेगवान ठेवण्याच काम विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशी नैसर्गिक संकटे आली मात्र त्यावर मात करीत राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही. 
राज्य शासनाची यंत्रणा किती गतीने काम करतेय याचं उदाहरण देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात ३० किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत देखील रात्रीच्या बारा तासात सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या संकटला दूर करायचं तर नियमावलीचं पालन होण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वादळात मोठी झाडं उन्मळून पडल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली त्यातून झालेल्या चर्चेनुसार हेरिटेज ट्री हा संकल्पना महाराष्ट्र राबविणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
*महसुलमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन*
मुंबईच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी संगितले. कोरोनाच्या संकटात पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने पूर्ण झाल्याबद्दल महसुल मंत्री श्री. थोरात यांनी यंत्रणांचे अभिनंदन केले. 
*मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी- नगरविकास मंत्री*
मुंबई आणि महानगर परिसराला जोडणारे हे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होत असून त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देण्याचा आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दुर्गाडी पुल आणि राजनोली उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मुंबई महानगर परिसरातील नागरिकांना त्चा फायदा होणार असल्याचे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीएने केवळ रस्ते, पुल बांधले नाही तर कोरोना संकटाच्या काळात जम्बो कोविड सेंटर्स उभारणी करून लाखो रुग्णांना दिलासा देण्याचं काम केल्याचं श्री. शिंदे यांनी सांगितले.
*पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया- आदित्य ठाकरे*
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया असून या महामार्गावरील वाहतुक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जात आहे. या महामार्गावर सुबक आखीव रेखीव डिजाईन्स, हिरवळ तयार करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर ते माहिम पर्यंत सायकलींग किंवा चालत जाण्याची सोय करण्याचे नियोजीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते नीरा आडारकर लिखीत मल्टिप्लिसीटीज या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मेट्रो मार्गिका,टर्मिनल १ आणि २ भूयारी मार्ग, दुर्गाडी पुल, राजणोली उड्डाणपुल याबाबत सादरीकरण करण्यात आले. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांनी आभार मानले.

(केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य वितरित

*(केशरी) शिधापत्रिकाधारकांना  सवलतीच्या दराने धान्य वितरित* 



पालघर(प्रतिनिधी) दि 31 : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे, २०२० ते ऑगस्ट, २०२० या महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने (गहू रु.८/- प्रतिकिलो व तांदूळ रु.१२/- प्रतिकिलो) प्रतिमाह प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरीत करण्यात आले. यापैकी शिल्लक राहिलेले धान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना  सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आहिरे यांनी कळविले आहे*
            त्याअनुषंगाने मा. सहसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक: अधापु २०२१/प्र.क्र. २९/नापु-२२, दिनांक: २५ मे, २०२१ अन्वये माहे मे, २०२० ते ऑगस्ट, २०२० या कालावधीत वाटप करून शिल्लक राहिलेल्या अन्नधान्यातून जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये तसेच रास्तभाव धान्य दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून, २०२१ करीता सवलतीच्या दराने (गहू रु. ८/- प्रतिकिलो व तांदूळ रु.१२/- प्रतिकिलो) वितरीत करण्यात येणार आहे.

Saturday, May 29, 2021

नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अविनाशजी पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न.

नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अविनाशजी पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

 नाशिक  दि.२९/०५/२०२१ रोजी उत्तर महाराष्ट्र प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेण्यात आली यावेळी नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र प्रमुख अविनाशजी पाटील, तसेच प्रमुख अतिथी उत्तर महाराष्ट्र संघटक पवनजी बोरसे, गुजरात राज्य प्रभारी महेशजी पाटील, नाशिक जिल्हा प्रमुख भुषणजी बोरसे, धुळे जिल्हा प्रमुख रामकृष्ण भाऊ बोरसे , नाशिक तालुका अध्यक्ष  दिलीप पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उत्तर महाराष्ट्र मध्ये क्षत्रिय मराठा परिवार कसा आपण घरा-घरात पोहचवू शकतो तसेच सामाजिक कार्य कसे योग्य रित्या आपण लोकांपुढे मांडू शकतो. महिलांवर होणारे आत्यचाराला कसा आपण आळा घालू शकतो.त्याप्रमाणेच क्षत्रिय मराठा परिवाराकडून काय नवीन धेय्य धोरणं आयोजित करू शकतो या प्रमुख विषयांवर चर्चा झाली आणि झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र प्रमुख आविनाशजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्राचे संघटक पवनजी बोरसे यांचा तसेच गुजरात राज्य प्रभारी महेशजी पाटील यांचा देखील आज सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सफाळे पोलिसांनी केले, नाईक कुटुंबाच्या सौजन्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सफाळे पोलिसांनी केले, नाईक कुटुंबाच्या सौजन्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कै. रेणीबाई नारायण नाईक यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या बद्दल आदर - स्मरण - कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, एक वेगळे सामाजिक कार्य करून, एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न नालासोपारा येथील नाईक कुटुंबियांनी समाजापुढे  निर्माण केला आहे.  
        कै. रेणीबाई नाईक यांच्या निधनानंतर समाजातील वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून, दिनांक २८ मे २०२१ रोजी सफाळे पूर्व विभागाकडील,जंगल पट्टीत वसलेल्या दारशेत - उंबरपाडा ता,जि पालघर येथील ५८ कुटूंबाना व सफाळे पश्चिम भागातील ४२ कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले 
       सफाळे पोलीस स्टेशन मधील कार्यरत अधिकारी श्री पंकज पाटील पो. उपनिरीक्षक, श्री राजेंद्र घुगे पोलीस शिपाई, श्री कैलास शेळके पोलीस नाईक यांच्या हस्ते सफाळे बाजार पेठेत रोजंदारीवर कामकरणारे कामगार  व केळवा रोड टोकराळे  येथील गरिब गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. 
    नाईक कुटूंबातील श्री वासुदेव नारायण नाईक, मंदा पांडुरंग म्हात्रे  भालचंद्र नारायण नाईक, मनोहर नारायण नाईक, सचिन नाईक, सायली नाईक यांनी या उपक्रमाचे आयोजन केलेले. या वेळी सफाळे येथील रविंद्र ठाकुर, अंकुश जाधव, साई पाटील आदि उपस्थित होते. कै. रेणीबाई यांच्या पश्चात त्यांचे तिन मुले, एक मुलगी, दोन सुना, जावई व पाच नातवंड असा परिवार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते  व आदर्श शिक्षक श्री जतिन कदम सर यांच्या कडून मिळत आहे.

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय नाशिक. ठरतेय गरजवंतासाठी अन्नदाता.

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय नाशिक. ठरतेय गरजवंतासाठी अन्नदाता.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाला अनुसरून मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत "तीन दिवसीय उपक्रमामध्ये गरजूंना आपल्याकडून जे जे शक्य होईल ती ती मदत महाविद्यालयाने केली आहे. प्राचार्य डॉ. तळेले यांच्या मार्गदर्शनाने प्रा. पुनम शिंदे, प्रा. प्रशांत व्यवहारे, प्रा. श्रद्धा सांगळे, प्रा.सचिन कापसे यांनी अंतिम वर्षाचे एन. एस. एस. चे विद्यार्थी प्रतीक गुजरानी, शुभम खैरे, जयेश कदम, विजय बारसाळे, पूर्वा धोंडगे या विद्यार्थांच्या मदतीने गरजु, गरीब, अनाथ लोकांना  तपोवन, पंचवटी, रामकुंड येथे अन्नदान, मास्क चे  वितरण, सैनिटायझेशन चे महत्व, स्वच्छता अभियान, जूने कपडे दान, लसिकरणाबाबत जनजागृती करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. कोरोना सारख्या संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या गरजवंताला मदत करण्यासाठी महाविद्यालयाने हा उपक्रम राबविला आहे. महाविद्यालय नेहमी अश्या सकारात्मक उपक्रमात सहभागी होते. पूरग्रस्तांना मदत,रक्तदान शिबिर,NSS अंतर्गत स्वच्छता अभियान,आधाराश्रमास मदत,श्रमदान समाजकार्य साठी नेहमी पुढे असते..प्राचार्य तळेले सरांनी सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. महाविद्यालयात विद्यार्थांच्या आयुष्यासोबत एक चांगला माणूस ही घडवला जातो . आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. महाविद्यालय  एक छोटासा प्रयत्नांमुळे काहींना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य प्रदान करते.

Friday, May 28, 2021

उपक्रमशील शिक्षक श्री.भावेश संखे, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित


*उपक्रमशील शिक्षक श्री.भावेश संखे, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित*

          पालघर (प्रतिनिधी)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार पालघर जिल्ह्यातील प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री भावेश रमेश शकुंतला संखे यांना प्रदान करण्यात आला.भगिनी समाज शाळेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात संखे सरांचा नेहमीच चांगलाच हातखंडा असतो.

         मूळगाव कुंभवली (ता.जि. पालघर) परंतु वास्तव्यासाठी पालघर येथे राहणारे सत्कारमूर्ती श्री.भावेश संखे हे सन २००८ साली पालघर जिल्ह्यातील भगिनी समाज शाळेत रुजू झाले.तेव्हापासून त्यांच्या शिक्षक सेवेला बारा वर्षे अविरतपणे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळात त्यांच्या आवडीच्या गणित या विषयाच्या अध्ययन -अध्यापनाबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यात त्यांनी सोप्या पद्धतीने पाढे तयार करणे व पाठांतर करणे , भौमितिक आक्रत्याचे सुबक रेखाटन करणे, गणितीय सूत्रांचे पाठांतर , गणितातील उदाहरणे सहज-सुलभ पद्धतीने सोडवणे ,  बँकेची माहिती -व्यवहार पद्धतीचे प्रात्यक्षिक , निवडणूक प्रक्रिया प्रात्यक्षिक, विज्ञान प्रदर्शन , विद्यार्थी सहभागाचे संपूर्ण परिपाठ सादरीकरण ,  रिंग कवायत , काव्य लेखन उपक्रम , वक्तृत्व -कथाकथन-गायन-एकपात्री अभिनय - न्रत्य-वेशभूषा  अशा स्पर्धासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे , राष्ट्रीय ध्वजारोहणासाठी परेड संचलन , शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन करणे , सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र-विभाग-तालुका व जिल्हा स्तरावर परीक्षकाचे कार्य , मतदार नोंदणी अधिकारी,जिल्हा स्तरावरील  शिक्षकांच्या प्रशिक्षणात गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक (साधनव्यक्ती ) अशा अनेक उपक्रमात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.अध्ययन-अध्यापनामध्ये नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून तो विषय रंजक पद्धतीने शिकवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
सध्याच्या कोरोना काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपक्रम राबविले. त्यात चला क्रती करूया , क्रतियुक्त मालिका , विविध वस्तूंपासून गणपती निर्मिती , आँनलाइन विज्ञान प्रदर्शन , आँनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी पंचक्रती , 'क'कवितेचा - 'म'मराठीचा,  माहिती किल्ल्यांची सुंदर हस्ताक्षराची आदी. आतापर्यंत त्यांनी शाळेत राबविलेल्या अशा सर्जनशील उपक्रमामुळे यावर्षीचा शिक्षकरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

     'पुरस्कार प्रेरणा देतात,प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!' या विचारसूत्रावर आधारित मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्था अनेक गेली अनेक वर्ष कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत असतात. श्री.भावेश संखे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्काराच्या स्वरूपात आकर्षक सन्मानचिन्ह,लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र,खास मानपत्र, मानकरी बॅच व मानाचा फेटा प्रदान करून सध्याच्या कोरोना काळात सदरील कार्यक्रम आभासी पध्दतीच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाइन  घेण्यात आला.

          या प्रसंगी त्यांनी भविष्यात अध्यापन विविध सर्जनशील पद्धतीच्या साह्याने विद्यार्थ्यांचा क्षमताधिष्ठित सर्वांगीण विकास कसा सुकर होईल याबाबत  नेहमीच प्रयत्नशील राहील. मला मिळालेल्या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी अजून सकारात्मक कलवाढीस लागली असून हा सन्मान माझा नसून माझ्या विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा,शाळेचा आहे. अशा भावना सत्कारमूर्ती उपक्रमशील शिक्षक श्री भावेश संखे यांनी व्यक्त केल्या.तसेच यासाठी त्यांना भगिनी समाज शाळेचे संस्थाचालक , मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांचे नेहमीच सहकार्य लाभत  असल्याचे सांगून त्यांचे  आभार मानले.

      पालघरच्या पंचक्रोशीतील शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध समाज माध्यमातून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*श्री.भावेश संखे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व!* - मुख्याध्यापिका,सौ.प्रीती वर्तक,प्रा.वि. मं. भगिनी समाज,पालघर.

     पालघर (प्रतिनिधी)  आमच्या शाळेतील "सर्वगुणसंपन्न आदर्श शिक्षक" म्हणजे श्री.भावेश संखे सर.अध्ययन अध्यापनात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानार्जन करीत असतात.अशा आमच्या उपक्रमशील शिक्षकाचे गणित विषयात चांगले प्रभुत्व आहे. सरांचे हस्ताक्षर खूपच छान आहेत. शाळेतील कोणताही सहशालेय उपक्रम असला की सरांचा उत्साह, पुढाकार दांडगा असतो.सरांना स्वतःला शिक्षणाची आवड असल्यामुळे सरांचे उच्च शिक्षण सुरू आहे.अशा तऱ्हेने अष्टपैलू असणाऱ्या आमच्या भावेश सरांना लोकसेवा अकादमीचा शिक्षकरत्न पुरस्कार मिळत आहे त्याबद्दल मला माझ्या, सर्व शिक्षकांना तसेच आमच्या संस्थाचालकांना,पालकांना,आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप आनंद झाला. आमच्या भावेश सरांना मानाचा मुजरा..!!
●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●

वसईतील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून, वृद्धाश्रमाला खासदार निधीतून दहा लाखांची मदत जाहीर खासदार मा. राजेंद्र गावीत

वसईतील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून, वृद्धाश्रमाला खासदार निधीतून दहा लाखांची मदत जाहीर 
   खासदार मा. राजेंद्र गावीत 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) तोक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरील गावांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने मा. राजेंद्र गावीत साहेब - खासदार यांनी दिनांक २८ मे २०२१ रोजी वसई विभागातील सत्पाळा, नवापूर, अर्नाळा किल्ला, अर्नाळा आदी भागातील नुकसानीची पाहणी आणी आढावा घेत असताना, स्थानिक सरकारी अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह पाहणी केली. 
  वसई तालुक्यातील मच्छिमार बांधवांचे झालेले नुकसान,तसेच सत्पाळा जेलडी येथील न्यु लाईफ केअर फाउंडेशन चा वृद्धाश्रम, मदर तेरेसा होम वृद्धाश्रम यांची, वादळी वाऱ्याने केलेल्या नुकसानीची पाहणी करून, वृद्धाश्रमाच्या दुरूस्ती साठी दहा लाखांचा खासदार निधीतून त्वरीत निधी उपल्ब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. वृध्दश्रमात असलेल्या २९ वृद्धांची  आपुलकीने विचारपूस केली. श्रीमती सुमन रणदिवे या शिक्षिकेची आपुलकीने भेट घेतली. कारण त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज महाराष्ट्र राज्यातील राजकीय शेत्रातील, प्रमुख पदावर विराजमान आहेत. मा. श्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, श्री राज ठाकरे साहेब श्री जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री, असे अनेक मान्यवरांना त्यानी घडविले आहेत.
नुकसानीची  पाहणी करताना श्री हरिचंद्र पाटील शिवसेना वसई विधानसभा समन्वयक, श्री पंकज देशमुख आणि सेनेचे पदाधिकारी, श्री तरुण वैती कृषी अधिकारी, मेरी टाईम बोर्डाचे पतन अभियंता, अर्नाळा फिशरमेन सर्वोदय सोसायटी लि. चे पदाधिकारी याच्या सह मा.खासदार साहेब यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून अधिकारी वर्गास योग्यता सूचनाही दिल्या, त्या मुळे नुकसानीची मदत मिळण्यासाठी विलंब होऊ नये.

विक्रमगड येथे जनजागृती आरोग्य चित्ररथ व भात बी बियाणे वाटप


*विक्रमगड येथे जनजागृती आरोग्य चित्ररथ व भात बी बियाणे वाटप*
 विक्रमगड(प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता, लसीकरण जनजागृती व त्याच बरोबर तपासणी मोहिमेअंतर्गत *आरोग्य चित्ररथ* संकल्पना जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.२७ मे रोजी पंचायत समिती विक्रमगड येथून  आरोग्य चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच कृषी विभाग पं.स विक्रमगड यांच्या मार्फत भात बी बियाणे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. तालुक्याची मागणी कर्जत 250- १२५ क्विंटल, कर्जत 7- १०० क्विंटल, सुवर्णा - ५० क्विंटल अशी एकूण 275 क्विंटल ची मागणी करण्यात आली असून त्यापैकी कर्जत 3- ८० क्विंटल भात बी बियाणे तालुक्याला उपलब्ध झाले  असून आलेल्या बी बियाणांच्या वाटपाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

या दोन्ही कार्यक्रमावेळी  रुचिता कोरडा सभापती पं. स विक्रमगड, संदेश ढोणे, सदस्य जि प पालघर तथा सदस्य जिल्हा आरोग्य व कृषी समिती,  राजेंद्र खताळ गटविकास अधिकारी पं.स. विक्रमगड, पं.स सदस्य  विनोद भोइर, अंजली  भोये, मनोज बोरसे, कांता सुतार, सुनीता घाटाळ, सुभाष भोये, तालुका आरोग्य अधिकारी  कुलकर्णी, आरोग्य व कृषी विभाग पं.स विक्रमगड चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कृषी समिती सदस्य संदेश ढोणे यांनी शेतकऱ्यांशी  संवाद साधला. मागील वर्षी एका कम्पनीच्या भात बी बियाणांमध्ये बोगस व निकृष्ट दर्जाचे बी बियाणे आढळुन आले होते. बॅग वरील टॅग व पावती नसल्याने विमा कंपन्यांकडून व पुरवठा करणाऱ्या कंपनी कडून भरपाई घेता आली नाही. तरी बॅग वरील टॅग व पावती जपून ठेवायची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच बोगस व निकृष्ट बी बियाणांची तक्रार वेळीच संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Thursday, May 27, 2021

पानवेलीनाही इतर पिकांप्रमाणे विम्याचे संरक्षण कवच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार राजेंद्र गावित

*पानवेलीनाही इतर पिकांप्रमाणे विम्याचे संरक्षण  कवच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार राजेंद्र गावित*
केळवे (प्रतिनिधी)केळवे 27 मे 2021
 16 ,17 व 18 मे रोजी झालेल्या तौत्के  चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व मच्छिमारांचे  खूप नुकसान झाले आहे .
समुद्रकिनारी असलेल्या केळवे-माहीम अशा गावांमधील शेतकऱ्यांना( वाडी वाले ) त्याचा फटका बसला आहे, केळवे इथे प्रत्यक्ष भेट देऊन पानवेल( खायचे पान ), केळी, भोपळी मिरची ,आंबे यासारख्या वाड्यांची गावित साहेबांनी पाहणी केली ,तेव्हा केळी आंबे काजू या पिकांप्रमाणे पान वेलीला विम्याचे संरक्षण कवच नाही ,शासनाच्या दुष्काळ संहिता 2015 प्रमाणे हेक्टरी  फक्त 18 हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. पान वेलीच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ,म्हणून पानवेली ह्या  पिकाला  विमा संरक्षण मिळावे म्हणून मी शासनाकडे प्रयत्न करीन असे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब तेथील शेतकऱ्यांना म्हणाले.
 पाहणी दौऱ्यात शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे ,नायब तहसीलदार केशव तरंगे ,तालुका कृषी अधिकारी तरुण वैती  कृषी सहाय्यक दिक्षा संखे, सरपंच सौ भावना किणी , उपसरपंच नितीन राऊत ,मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल ,पंचायत समिती सदस्यश्रीमती  भारती सावे, शाखाप्रमुख तुषार पाटील, विभाग प्रमुख उमेश पालेकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश तांडेल, ग्रामसेवक मोडवे हे उपस्थित होते प्रमोद चौधरी ,रघुनाथ सावे व इतर शेतकऱ्यांना खासदार श्री राजेंद्र गावित यांनी धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे म्हणाले . शासनाच्या नियमाप्रमाणे जे हेक्‍टरी 18 हजार रुपये आहेत ते वाढवून देण्यासाठीही प्रयत्न करीन.
 माहीम-केळवे भागात 200 एकराच्या आसपास पानवेल ची लागवड होते ही पाने कलकत्ता व इतर भागात जातात पूर्वी ही पाने पाकिस्तान अफगाणिस्तान काश्मीर या भागात जात होती.
 त्याप्रमाणे माहीमची प्रसिद्धी केळी ही दोनशे ते अडीचशे एकरामध्ये लावलेली आहेत त्या केळ्याच्या पिकाचेही नुकसान झालेला आहे ,आंब्याच्या झाडावरून वादळामुळे आंबे जमिनीवर ती पडून पूर्ण आंब्याचं पीक नष्ट झालेला आहे ,संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे ताबडतोबीने पूर्ण करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी दिल्या,
 माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब म्हणाले.

मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा ?

मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा ?
सफाळे ( हिरालाभल लोखंडे ) मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांनी कोविड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये, लागू करुन संचारबंदी व फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम १९७३ चे कलम १४४ अन्वये आदेश लागु केले आहेत. तरीही दिनांक २५ मे २०२१ रोजी रात्री सुमारे  ८ - ३० च्या दरम्यान जलसार पोस्ट
 टेंभिखोडावे ता,जि  पालघर येथील शैलेश रमेश पाटील यांच्या चायनीज दुकानांच्या ठिकाणी आरोपी १ ) शैलेश रमेश पाटील वय वर्षे २५ राहणार जलसार, २ ) सलमान मुमताज शेख वय वर्षे २२ राहणार सफाळे ता,जि पालघर यांनी चायनीज दुकान चालू ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी, कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता व मास्क न लावता   एकाच ठिकाणी २० ते २५ लोकांना एकत्र थांबवून, करून मा. जिल्हा अधिकारी सो पालघर यांच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले असताना आढळून आले म्हणून केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि. क्रमांक २० / २०२१ कायदा कलम व भारतीय दंड संहिता कायदा कलम १८८, २६९ प्रमाणे नोंद करण्यात आली असून मा उपनिरीक्षक श्री धनगर साहेब केळवा सागरी पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासी अंमलदार श्री एम बी राऊत. वरिष्ठ अधिकारी याच्या  मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार*


*कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार*
*कोकणातील धोकादायक दरडग्रस्त गावांचेही होणार पुनर्वसन* 
*कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

        मुंबई, (प्रतिनिधी)दि. 27: राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (व्हीसीव्दारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,  मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानीची तीव्रता कमी करण्यासाठी किनारपट्ट्यांवरील जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावीत, ही बहुउद्देशीय निवारा केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सक्षम असावीत. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधी व्यतिरीक्त इतर वेळी या निवारा केंद्रांचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी करण्यात यावा. याची कायमस्वरुपी देखभाल, दुरुस्तीचेही नियोजन करण्यात यावे. या जिल्ह्यातील सर्व वीज वाहिन्या प्राधान्यांने भूमीगत कराव्यात. चक्रीवादळाच्यावेळी निर्माण होणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांनी जमिनीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वीज कोसळून जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत. ही सर्व कामे दर्जेदार, मजबूत, गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत, यासाठी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत* १४ बालरोग तज्ञांचा समावेश

*कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत* 
*१४ बालरोग तज्ञांचा समावेश*

मुंबई, (प्रतिनिधी)दि. २७: कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ तज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. 
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत त्यांनी चर्चाही केली केली होती. 
लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य  विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने नुकताच शासन निर्णय जाहिर केला आहे.

Wednesday, May 26, 2021

कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट


 *कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी*
   
*बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट*

मुंबई(प्रतिनिधी) दि. 26 - कोरोना च्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिली. या वेळी कमानी ट्युबस कं च्या बुद्ध पौर्णिमा कॅलेंडर चे राज्य पालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

शांती शिवाय विकास  नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर  आधारित आहे.शांती अहिंसा करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.रामदासजी आठवले साहेब अाज २६ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता विश्वशांती दुत, तथागत गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली. ना.रामदासजी आठवले यांच्या वतीने बुध्दांची मूर्ती भेट देण्यात अाली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना  चिवरदान करण्यात आले.
 यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, मा.कल्पना सरोज, मा.आशिष देशपाडे, मा.घनश्याम चिरणकर, मा.प्रविण मोरे अाणि मा.महेश लंकेश्वर उपस्थित होते.

मिथिलिन ब्ल्यू ठरेल करोना किलर* डॉ. सुनील राऊत यांचे मत

मिथिलिन  ब्ल्यू ठरेल करोना किलर* डॉ. सुनील राऊत यांचे मत
 पालघर (प्रतिनिधी)दिनांक 26 मे 2021

मिथिलिन ब्ल्यू हे औषध रोज सकाळी उपाशी पोटी 2.5 ml जिभेखाली  ठेवुन नंतर पाच मिनीटानी गिळून टाकायचा आहे.
 पालघर चे प्रसिद्ध डॉक्टर, डॉक्टर सुनिल  राऊत यांनी आज पालघरमध्ये हे औषध कसे बनवायचे व  याचे प्रात्यक्षिक  , दाखवले त्यावेळी पालघरच्या नगराध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला  काळे व पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार काळे उपस्थित होते .
मिथिलिन ब्लू  औषध 142 वर्षांपूर्वी संशोधित केले असुन आजपर्यंत जगात एकही रुग्ण या औषधाची  रिॲक्शन येउन दगावलेला नाही .
कोव्हिड रुग्णाना नेब्युलायझर च्या माध्यमातून हे औषध द्यावे लागते .
हे औषध घेतले तरी मास्क ,सोशल डिस्टनिंग  ,हॅण्ड सॅनिटायझेशन अनिवार्य आहे असे नगराध्यक्ष डॉ उज्ज्वला काळे म्हणाल्या 
मिथिलिन ब्ल्यू हे औषध  ॲन्टी  फंगस म्हणून प्रसिद्ध आहे ,ते कोव्हिड व्हायरस रोखुन त्याचा समुळ नाश करते असा दावा असल्याचे समजते .
सर्वात महत्वाचे हे औषध रुग्णाची  ऑक्सिजन गरज कमी करते असे समजते .
ह्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले ,ह्या पुढेही हे वाटप विविध ठिकाणी  शिबिरे घेउन व योग्यमाहीती देउन सुरु राहील असे पालघर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष केदार काळे म्हणाले ,औषधा सोबत औषधा बद्दल संपूर्ण माहीती चा कागद ही देण्यात येतो ,त्या मुळे रुग्णाना तो वाचुन औषध कसे व कोणी घ्यायचे हे समजते .
ज्याना हे औषध मोफत हवे असेल तर डॉ सुनील राउत ह्याच्या दवाखान्यातुन न्यावे किवा डॉ उज्ज्वला काळे व केदार काळे  ह्यांच्याशी संपर्क साधावा

Tuesday, May 25, 2021

बांधकामातील टाकाऊ मातीचे अथवा सिमेंटचे ढिगारे जिल्हा क्रीडा संकुलातील मोकळ्या जमिनीवर आणून टाकावेत.जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे बांधकाम व्यवसायिकांना आवाहन

*बांधकामातील टाकाऊ मातीचे अथवा सिमेंटचे ढिगारे जिल्हा क्रीडा संकुलातील मोकळ्या जमिनीवर आणून टाकावेत*

*जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे बांधकाम व्यवसायिकांना आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. २५ : पालघर जिल्हा निर्मितीपासून क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी मौजे टेंभोडे, ता. जि. पालघर १६ एकर जमिनीवर अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकूल उभारणीसाठी प्रक्रीया सुरु झालेली आहे. पालघर नगरपरीषद क्षेत्रात सुरु असलेली शासकीय निमशासकीय अथवा खाजगी स्वरुपातील बांधकाम व्यवसायिकांना आवाहन करण्यात येते की, बांधकामातील टाकाऊ मातीचे अथवा सिमेंटचे ढिगारे जिल्हा क्रीडा संकुलातील मोकळ्या जमिनीवर आणून टाकावेत जेणेकरुन पावसाळयात सुध्दा क्रीडांगणाचा टणकपणा अबाधित राहून खेळाडूंना खेळण्यायोग्य मैदान सुस्थितीत ठेवण्यात मदत होईल. व पावसाळ्यात सुध्दा सराव करणे सोईचे होईल. असे आवाहन  जिल्हाधिकारी, पालघर डॉ.माणिक गुरसळ, नगराध्यक्ष्या, पालघर नगरपरीषद, उज्वला काळे, व जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांनी केले आहे.

नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षणासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावे.

*नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षणासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावे.*


पालघर (प्रतिनिधी)दि. २५ : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी हे केंद्र राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते.

 केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण ६ महिन्यांच्या कालावधीचे असुन सदयाचे प्रशिक्षण वर्ग दि 01/07/2021 ते दि. 31/12/2021 पर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, सातपाटी यांच्या कार्यालयातून कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळुन दि.27/05/2021 पासून घेऊन जावेत. परिपूर्ण अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.30/06/2021 राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी 22 विद्यार्थी घेण्यात येणार आहेत.

दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना रु.100/- प्रतिमहा तर दारिद्ररेषेवरील विद्यार्थ्यांना रु.450/- प्रतिमहा प्रशिक्षण फि आकारण्यात येते.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता खालील प्रमाणे असावी.

१) उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. 
२) उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.
३) उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
४) उमेदवार क्रियाशिल मच्छिमार असावा.
५) उमेदवारास किमान एक वर्ष मासमारीचा अनुभव असावा.

प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर उमेदवारास रोजगार व स्वयंरोजगाराच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध होतात.

प्रवेश अर्ज आदीबाबत माहीतीस्तव या केंद्राचे श्री. ज्ञानेश्वर पां. भोसले, यांत्रिकी निर्देशक, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी यांच्यांशी मोबाईल क्र. ८६२४९१९११३ वर संपर्क साधावा.

गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणा-या प्राधिकत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज अर्ज करावे

*गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणा-या प्राधिकत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज अर्ज करावे*


पालघर (प्रतिनिधी)दि. २५ : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांचेकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ व ८८ अन्वये कोकण विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणा-या प्राधिकत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अॅण्ड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी) धारक. चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) इन्स्टिटयुट ऑफ कास्ट अॅण्ड वर्कस अकाऊंटंट (आय.सी.डब्लु.ए) कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) सहकार खात्यातील प्रशासन/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांचेकडून मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे विहित नमुने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर व अधिनस्त सर्व तालुका कार्यालय उपनिबंधक सहाय्यक वसई पालघर / डहाणू निबंधक सहकारी अधिकारी प्रथम श्रेणी, / वाडा / विक्रमगड जव्हार तलासरी मोखाडा यांचे कार्यालयात कार्यालयात दिनांक. १९/०५/२०२१ ते दि.१८/०६/२०२१ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सूचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावीत..

१) आधार कार्ड २) पॅन कार्ड ३) रहिवाशी पुरावा ४) जन्म दाखला ५) संशैक्षणिक अर्हतेसंबधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) वकील असल्यास बार कॉन्सील सर्टिफिकेट जोडावे ६) अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे इ.

Monday, May 24, 2021

कोव्हिड-19 मुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या* *बालकांना मदतीसाठी कृती दल गठीत**हेल्पलाईनंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन*

*कोव्हिड-19 मुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या* 
*बालकांना मदतीसाठी कृती दल गठीत*
*हेल्पलाईनंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन*

पालघर(प्रतिनिधी) दि. 24 : कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन याजनेंतर्गत लाभ देण्यासाठी कृती दल (Task Force) ची स्थापना करण्यात आली आहे.     कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या 18 वर्षाखालील बालकांना मदतीसाठी हेल्पलाईनवर  संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, पालघर असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

चाईल्ड लाईन 1098 व पोलीस संपर्क क्र. 103
८३०८९९२२२२ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००) यांना तात्काळ कळवावे.
७४०००१५५१८ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)
श्री. नितीन शिंदे चाईल्ड लाईन, पालघर १०९८ मो. ९८९२०३६७३६
बाल कल्याण समिती अध्यक्ष, पालघर श्रीम. अॅड शारदा शिंदे ७०२०३२२४११
बाल कल्याण समिती सदस्य, पालघर श्रीम. वर्षा फातरपेकर ९८२३९४३०७२
बाल कल्याण समिती सदस्य, पालघर श्रीम. प्रतिमा देव ९९२००८९२०३
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पालघर मो. ९८९०८५३२८२
बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाहय, पालघर ९९२३३९७३६२

Saturday, May 22, 2021

कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या बालकांना तात्काळ मदतीसाठी गठीत

*जिल्हास्तरीय कृती दल* 

कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्या 
पालकांच्या बालकांना तात्काळ मदतीसाठी गठीत

पालघर(प्रतिनिधी) दि. 22 : कोराना संसगांमुळे दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी कृती दल (Task Force) ची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी चाईल्ड लाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. चाईल्ड लाईन 1098 ची माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती अध्यक्ष, आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त अधिक्षक (ग्रामीण), सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष, जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बालगृहे करीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात यावे, येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी यावेळी दिल्या. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होतेवेळी आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा. ही माहिती रुग्णाकडून भरून घेण्याबाबत सर्व रूग्णालयांना निर्देश दिले. कोरोनामुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रन्स 7400015518, 8308992222 अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पालघर 7020322411, 9823561952 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पालघर 9923397362, 9890853282 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. 

हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
चाईल्ड लाईन १०९८ व पोलीस संपर्क क्र १०३
८३०८९९२२२२ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००) | यांना तात्काळ कळवावे 
७४०००१५५१८ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)

आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी २५ मे २०२१ पर्यंत अर्ज करावे.

*आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी २५ मे २०२१ पर्यंत अर्ज करावे.*

पालघर (प्रतिनिधी)दि. २२ : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथे परिवहन संवर्गाकरिता (ऑटोरिक्षा वगळून) वाहन नोंदणीकरिता सध्या BM ही मालिका सुरु आहे. सदर मालिका दि. २४.०५.२०२१ पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने परिवहन संवर्गाकरिता (ऑटोरिक्षा वगळता) वाहन नोंदणीसाठी CB ही मालिका सुरू करण्यात येणार आहे.

सदर नवीन मालिकेतील आकर्षक वा पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि.२५.०५.२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितांनी अर्ज सादर करावेत. आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहित शुल्क आकारून नोंदणी चिन्ह आरक्षित करण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरूपातील धनाकर्ष या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी ४ वाजता सादर केलेले लिफाफे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समोर उघडले जातील. ज्याचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कारवाई करण्यात येईल.

*******

Friday, May 21, 2021

जिल्हा परिषदे मध्ये घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा


*जिल्हा परिषदे मध्ये घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा*

पालघर (प्रतिनिधी)आज २१  मे रोजी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिना निमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा  जिल्हा परिषद पालघर येथे घेण्यात आली.

   "आम्ही भारताचे नागरिक , आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरे विषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा  आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्व मानवबंधूंमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू."

 अशा प्रकारची शपथ घेण्यात आली.

यावेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, उप.मु.का.अ.(सा.) संघरत्ना खिल्लारे,उप.मु.का.अ.(ग्रा.पं) टी.ओ.चव्हाण, उप.मु.का.अ. (पावस्व) तुषार माळी, कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु. गंगाधर निवडुंगे, कार्यकारी अभियंता बांधकाम  खराडे, तसेच जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालघर जिल्हा वीज वितरण सक्षमीकरण आराखडा तातडीने मंजूर करू: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


*पालघर जिल्हा वीज वितरण सक्षमीकरण आराखडा तातडीने मंजूर करू: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत*

*पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची मा. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडून पाहणी*

*पालघर: २१ मे २०२१*(प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी आराखडा तयार करावा व जिल्हा नियोजन समितीमार्फत पाठवावा. पालघर जिल्हा आदिवासी बहुल व नवीन असल्याने हा आराखडा तातडीने मंजूर करून पालघर जिल्ह्याला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कामे केली जातील, असे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज जाहीर केले. 

पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडून आज पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला हजेरी लावली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  दादाजी भुसे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन)  संजय ताकसांडे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अधीक्षक अभियंता किरण नागावकर आदी या बैठकीला उपस्थित होते. 

"पालघर हा नवीन जिल्हा आहे,आदिवासीबहूल जिल्हा आहे. या जिल्ह्याचा विद्युत आराखडा तयार करण्याची विनंती मी पालकमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे. त्यांनी जिल्हा नियोजन समितीत हा आराखडा तयार करून आमच्या विभागाकडे पाठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल.पालघर सर्कलचे विभाजन करण्याच्या मागणीवर ही हा विद्युत आराखडा तयार करताना विचार केला जावा,"असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव व तौक्ते चक्रीवादळाची पूर्वकल्पना यातून या संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची तयारी करून ठेवली होती. त्यामुळेच वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊनही बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा लवकर सुरू करता आला. 
"वादळामुळे वारंवार वीजपुरवठा बाधित होणाऱ्या भागात विजवाहिन्या येत्या काळात भूमिगत करण्याची शक्यताही आम्ही पडताळून पाहत आहोत. अशा संकटाचा यशस्वी सामना करण्यासाठी टास्क फोर्स आणि कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यात येईल. डहाणू येथील उपकेंद्राला वनविभागाची मान्यता मिळण्यात असलेला अडसर पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांना सोबत घेऊन सध्या वनविभागाचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना भेटून दूर करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्तेच या उपकेंद्राचे उद्घाटन होईल याचा प्रयत्न करू," असे त्यांनी यावेळेस बोलताना जाहीर केले.

खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळेस महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.मात्र कर्मचारी संख्या वाढवायला हवी अशी सूचनाही त्यांनी केली. "कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महावितरणने ३०० कर्मचारी गमावले आहेत. तर ८ हजार कर्मचारी विषाणूमुळे बाधित झाले. अशा परिस्थितीत निवड होऊन भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ५ हजार जणांची नियुक्ती न्यायालयीन वादात अडकली आहे. यासंदर्भात न्यायालयाला माहिती देऊन नियुक्तीचा मार्ग मोकळा करण्याबाबत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांना निर्देश दिले असून ते प्रयत्न करत आहेत," अशी माहिती ऊर्जामंत्री ना. राऊत यांनी यावेळी दिली. चक्रीवादळाच्या संकट काळात सहकार्य केल्याबद्दल लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्राहकांचेही त्यांनी आभार मानले.

*पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली नुकसानग्रस्त गावाची पाहणी**नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर होईल*

*पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली नुकसानग्रस्त गावाची पाहणी*

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर होईल*

    *- पालकमंत्री दादाजी भूसे*

पालघर(प्रतिनिधी) दि. 21 :- तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात येणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांतील केळी, जाभूळ, या फळपिकांची, भाजीपाला शेतपिकांची पाहणी पालकमंत्री दादाजी भूसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार राजेंद्र गावीत, उपस्थित होते.

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तिन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान झाले असून विद्यूत खांब देखील पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

Thursday, May 20, 2021

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

*तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख*

पालघर दि.20 (प्रतिनिधी): तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वस्त्रोद्योग,मत्सव्यवसाय,बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गांवाची पाहणी मत्स व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार राजेद्र गावित, आमदार नाना पटोले व मच्छीमार व ग्रामस्थ् उपस्थित होते.

पालघर तालुक्यातील मुरबे,टेंभो, उसाळी, भुडवळ,कोरे आदी गांवाना श्री शेख यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.

या चक्रीवादळाचा फटका मच्छिमांरांना बसला असून त्याच्या रोजगारावर परिणाम होऊ नये यासाठी  नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले.

Wednesday, May 19, 2021

कपूरचं झाड अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का???

*कपूरचं झाड अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का???

      पालघर :_  पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही.* 
        *सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.*
                 सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो. 
                            आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
        *आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.* 
        *त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.*
        तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको. 

धन्यवाद. 
प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर. 
८२३७१५०५२३.

कोरोना महामारीने बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास देण्याचे आवाहन


 *कोरोना महामारीने बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास*
 *देण्याचे आवाहन*

ठाणे (प्रतिनिधी) दि.19(जिमाका) :-  ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व अवलंबिताना सूचीत करण्यात येते की, COVID-19 कोरोना महामारीने मार्च -2020 पासून आजतागायत बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास zswo_thane@maharashtra.gov.in या मेल आयडीवर खालील नमुन्यानुसार पाठवावी.
सैन्य क्रमांक, रँक, मा. सैनिकाचे नांव, बाधित / उपचारार्थ दाखल असलेल्याचे नांव, पत्ता, भ्रमणध्वनी, हॉस्पिटलचे नांव व भरती दिनांक, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिनांक, सध्या उपचार घेत असल्यास हॉस्पिटलचे नांव  व सद्यस्थिती.
याव्यतिरिक्त ज्या माजी सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने किंवा शासनाच्या तात्पुरत्या सेवेत भाग घेतला असल्यास त्यांनी आपली सर्व माहिती या कार्यालयास वरील मेल आयडीवर पाठवून द्यावी, असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे व पालघर यांनी केले आहे.

Tuesday, May 18, 2021

भिवंडी। प्रसिद्ध उद्योग पति मुकेश अंबानी के घर के पास मिली स्कॉर्पियो कार में जिलेटिन की छड़े बरामद होने के बाद पुलिस ने जिलेटिन की छड़े को इकठ्ठा करने वालों पर कार्रवाई करना शुरू

भिवंडी(भिवंडी)।। प्रसिद्ध उद्योग पति मुकेश अंबानी के घर के पास मिली स्कॉर्पियो कार में जिलेटिन की छड़े बरामद होने के बाद पुलिस ने जिलेटिन की छड़े को इकठ्ठा करने वालों पर कार्रवाई करना शुरू किया है. इसी क्रम में सोमवार 1:30 बजे के दरमियान क्राइम ब्रांच पुलिस के युनिट क्रमांक एक ने भिवंडी के कारिवली ग्राम पंचायत स्थित एक कार्यालय में छापा मारकर 12 हजार जिलेटिन की छड़ो के साथ अन्य विस्फोट सामग्री बरामद किया है.इतनी भारी मात्रा में विस्फोट सामग्री मिलने से पूरे क्षेत्र में सनसनी फैली हुई है.वही पर क्राइम ब्रांच की पुलिस ने खदान मालिक को गिरफ्तार कर लिया है.जिसे न्यायालय में 22 मई तक पुलिस रिमांड में भेज दिया है। 

 प्राप्त जानकारी के अनुसार कालवार गांव निवासी गुरूनाथ काशीनाथ म्हात्रे (53) खदान व्यवसायी है वह अपने कारिवली गांव स्थित महेश स्टोन चाली कार्यालय में अवैध रूप से सोलर इंडस्ट्रीज कंपनी के 25 किलो वजन की कुल 60 बाक्स जिसमें कुल 11,400 जिलेटिन छड़े भरी हुई थी इस विस्फोट का कुल वजन 1500 किलो था.इसके साथ ही डेक्कन पावर कंपनी के 03 बाक्स प्रत्येक बाक्स में 200 जिलेटिन विस्फोट कुल 600 जिलेटिन की छड़े जिसका वजन 75 किलो था.अवैध रुप से रखा हुआ था जिसको पुलिस ने छापा मारकर बरामद कर लिया है.पुलिस ने बताया कि म्हात्रे के कार्यालय से कुल 12 हजार जिलेटिन की छड़े बरामद की गयी है इसके साथ ही सोलर कंपनी के 2508 इलेक्ट्रिक डेटोनेटर व डेक्कन कंपनी के 500 इलेक्ट्रिक डेटोनेटर कुल 3008 इलेक्ट्रिक डेटोनेटर भी बरामद हुआ है. बरामद विस्फोट की बाजार कीमत लगभग 2 लाख 07 हजार 620 रुपए बताई जा रही है।

     बतादें कि क्राइम ब्रांच पुलिस युनिट एक को इस विस्फोट जखीरा‌ को इकठ्ठा रखने की जानकारी मिली थी जिसके कारण उक्त जगह पर छापा मारकर भारी मात्रा में विस्फोट पदार्थ बरामद किया है.स्थानिय भोईवाडा पुलिस ने क्राइम ब्रांच युनिट- 1 के हेड कांस्टेबल आनंदा हरिभाऊ भिलारे की शिकायत पर गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे के खिलाफ भादंवि के कलम 286 सहित भारत के विस्फोट ( बारी) पदार्थ अधिनियम 1908 के कलम 05 प्रमाणे मामला दर्ज कर लिया. जिसकी आगे जांच ठाणे क्राइम ब्रांच युनिट एक के सहायक पुलिस निरीक्षक प्रफुल जाधव कर रहे है.इसके साथ ही इस घटना की जानकारी ‌मिलने के बाद भिवंडी पुलिस उपायुक्त योगेश चव्हाण तथा ठाणे क्राइम ब्रांच के पुलिस उपायुक्त, भोईवाडा पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक एस.ए. इंदलकर तथा भिवंडी व ठाणे क्राइम ब्रांच के वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने घटना स्थल का दौरा किया है।

Monday, May 17, 2021

कोव्हीड हॉस्पिटलला जनरेटर द्वारे विद्युत पुरवठा होणार जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी आदेश केले पारित

*कोव्हीड हॉस्पिटलला जनरेटर द्वारे विद्युत पुरवठा होणार*
 
*जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी आदेश केले पारित*


पालघर (प्रतिनिधी)दि 17 : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोविड केअर सेंटर (CCC). इंडिकेटेड डि हेल्थ सेंटर (DCHC), डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल(DCH) चालू आहेत. विदयुत फिडर बंद असल्यामुळेकोरोना रुग्णांना अत्यावश्यक सुविधा निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहे विदयुत पुरवठा निरंतर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे फिडर बंद पडण्याची शक्यता असल्याने उपरोक्त हॉस्पिटलला जनरेटरद्वारे विदयुतपुरव ठेवणे आवश्यक असल्याने, जनरेटरसाठी पेट्रोल/डिझेलची मोठया प्रमाणात आवश्यकता लागणार असल्याने पेट्रोल/डिझेलसाठा राखीव ठेवणे आवश्यक आहे.

•  जिल्ह्यातील सर्व रिटेल पेट्रोल व डिझेल परवानाधारक यांनी दरदिवशी २००० लिटर डिझेल व ५०० लिटर पेट्रोल राखीव ठेवण्यात यावे. सदरचे डिझेल/पेट्रोल हे या कार्यालयाच्या / तहसीलदार यांचे आदेशाशिवाय वितरीत करता येणार नाही.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणान्या कोणतीही व्यक्ती/परवानाधारकावर भारतीय दंडसंहोता १८६० (४५) याच्या कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व साथ रोग नियंत्रण कायदयातील तरतुदींप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी डॉ.  माणिक गुरसळ  यांनी पारित केलेल्या आदेशात नमूद केले आहे

तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा

*तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा* 

*जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना* 
ठाणे:- (प्रतिनिधी)-तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील  आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला फोन करून त्यांनी तेथील परिस्थितीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. 
तोकते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पालकमंत्री शिंदे यांनी उल्हासनगर मनपा आयुक्तांना फोन करून या जखमींना वेळेत चांगले उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. 

मीरा-भाईंदर क्षेत्रातील उत्तनच्या समुद किनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलांवर एक जहाज  भरकटले होते. या जहाजावर ६ खलाशी अडकले आहेत. सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. 

जिल्ह्यातील एकूण परिस्थिती तूर्तास नियंत्रणात असली तरी जिल्ह्याधिकारी श्री. राजेश नार्वेकर या परिस्थितीचा आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्याने आढावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Saturday, May 15, 2021

राष्ट्र सेविका समितीच्या जेष्ठ सेविका सुधा नामजोशी यांचे निधन

राष्ट्र सेविका समितीच्या जेष्ठ सेविका सुधा नामजोशी यांचे निधन
 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) शनिवार दिनांक ८ मे २०२१ रोजी सुधा महादेव नामजोशी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी कर्दळ - सफाळे येथे निधन झाले. नामजोशी कुटूंब हे मुळचे कोकणातील. नोकरी निमित्ताने कै. महादेव नामजोशी सर शारदा हायस्कूल सफाळे ( आताचे हरेश्वर महादेव पंडित विद्यालय ) येथे संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत झालेले शिक्षक. 
   शिक्षक आणि तेहि संस्कृत विषयाचे असल्याने, त्यांची भाषा शैली - पेहराव, काळी टोपी, सफेद सदरा आणि धोतर. एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व. उच्च विचारसरणी, स्वच्छ चारित्र्य तसेच कुणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्ट आणि परखडपणे बोलणारे असल्याने, सफाळे परिसरातील पंचक्रोशीत त्यांचे एक विशिष्ठ व्यक्तीमत्व निर्माण झालेले. संघ परिवारातील ते एक कार्यशिल सदस्य होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत, संघ विरोधी  वातावरण असताना सुध्दा त्यांनी संघ परिवाराची साथ कधिच सोडली नाही. अनेक सळसळत्या रक्ताच्या तरूण वर्गावर संघ परिवार व देश भक्तीचे संस्कार घडविले. 
   संघ परिवार व देश भक्तीच्या कार्यात त्यांची पत्नी सुधा नामजोशी यांची त्यांना मोलाची बहुमुल्य साथ लाभलेली. वेळी अवेळी येणारे संघ प्रचारक, त्यांच्या जेवणाची सोय करताना, वेळ काळ यांचा कधिही विचार न करता व कंटाळा न करता आपले कार्य करून संघ प्रचारकांना एक प्रकारे प्रोत्साहन देत असे. संघ परिवाराच्या कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून, आपल्या पतीच्या कार्यात नेहमी सहभागी होत असत. सफाळे परिसरातील संघ परिवारास कै. नामजोशी सर व कै. सुधा नामजोशी हे एक लाभलेले अमोल रत्न आहे. संघ परिवार त्याचे कार्य कधिही विसरूच शकत नाही. त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबात दोन मुले, एक मुलगी, सुना जावई व नातवंड असा परिवार असून त्यांची मुले यांनी संघ कामाचा वारसा सुरू ठेवला आहे. अशी माहिती धनंजय आक्रे यांच्या कडून मिळत आहे.

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



          

*मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट*

मुंबई दि. 14 - महाराष्ट्रात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातील राजपूत; ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषावर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करावा तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना  पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार दिला आहे. पण राज्य सरकार ने तमाम मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करून  अन्याय केला आहे.या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालून मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइं च्या शिष्टमंडळाने राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी ना रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मा. आ सुमंत राव गायकवाड; काकासाहेब खंबाळकर; गौतम सोनवणे; अशोक भालेराव;एम एस नंदा; सुनील मोरे; युवराज सावंत ; आदी मान्यवर उपस्थित होते.

              मा. आकाश घूसळे सोशल मीडिया आय.टी. सेल. ज़िल्हा अध्यक्ष नाशिक

कोरोनात्तर काळात कृषी पर्यटनाला मिळेल मोठी चालना जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांचे मत कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांचा सहभाग

*कोरोनात्तर काळात कृषी पर्यटनाला मिळेल मोठी चालना*

*जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांचे मत*

*कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांचा सहभाग*

मुंबई,(प्रतिनिधी) दि. १५ – कोरोनात्तर काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले जाऊ शकते. वाढते नागरिकरण, कोरोनासारख्या आपत्ती, वाढते मानसिक ताणतणाव या पार्श्वभूमीवर कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात मोठा वाव असून सर्व पातळ्यांवर प्रयत्न करुन येत्या काळात या पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त (१६ मे) आयोजित दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आज करण्यात आला.

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. परिषदेत पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे, फिलीपिन्सच्या पर्यटन मंत्रालयाच्या माजी प्रधान सचिव डॉ. मिना गॅबोर, इंडियन ट्रस्ट फॉर रुरल हेरिटेज ॲण्ड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष एस. के. मिश्रा, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन, नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ॲग्रीकल्चर एज्युकेशन मॅनेजमेंटचे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेखर, युएनडब्ल्यूटीओ (स्पेन) चे माजी संचालक डॉ. हर्ष वर्मा, इटलीचे डॉ. थॉमस स्ट्रीफेंडर, स्टीव्ह बॉर्गिया आदी मान्यवर सहभागी झाले होते.    

देशात कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. १६ मे हा दिवस "जागतिक कृषी पर्यटन दिन"  म्हणून आता जगभरात सर्वत्र साजरा केला जातो. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा  पर्यटन विभाग आणि बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  "जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१" ही दिनांक १५ - १६ मे रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित केली आहे. यंदाच्या परिषदेत “कृषी पर्यटन - महिला शेतकरी उद्यमशीलता विकास”  अशी थीम आहे. यंदाच्या या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेला अमेरिकेतील  ओरेगॉन, इलिनॉय, व्हरमाँट या राज्यांतून तसेच इटली, युगांडा, दक्षिण आफ्रिका, फिलिपिन्स, स्कॉटलँड, स्पेन  थायलंड  या देशांतून शेतकरी, संशोधक, पर्यटन विशेष सल्लागार निमंत्रित केले आहेत. या परिषदेद्वारे कृषी पर्यटन विषयातील माहितीचा  व ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महिला  शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात केलेल्या भव्य कामगिरीची माहिती मिळणार आहे. परिषदेत "जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२१" देण्यात येणार आहेत.  

कृषी मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी विभागाच्या ३० टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचपद्धतीने कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील घटकांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण ठरवू. जगाच्या पाठीवर कृषी पर्यटनात करण्यात येत असलेल्या विविध प्रयोगांची माहिती या कृषी पर्यटन परिषदेतून मिळेल. राज्यातील कृषी पर्यटनाच्या विकासासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्याद्वारे इथे कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरीका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यातही त्याच पद्धतीने कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे. कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भर टाकण्याची क्षमता आहे. त्या अनुषंगाने राज्यात पर्यटनाच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात काही कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. यातून त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतरांना प्रेरणा मिळाली आहे. कृषी पर्यटनाच्या विकासासाठी यापुढील काळातही व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कृषी पर्यटनाचे महत्व सांगताना पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या की, कृषी पर्यटन ही एक उभरती संकल्पना आहे, जिच्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होतो. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होणार नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला त्यामुळे चालना मिळेल. कृषी पर्यटनाला चालना देताना या क्षेत्रातील घटकांचे, विशेषत: महिलांचे कौशल्य विकास प्रशिक्षण करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे म्हणाले की, कृषी पर्यटन धोरणाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकसित व्हावे यासाठी होतकरू शेतकऱ्यांना उत्तम मार्ग दाखवला आहे. हे धोरण राबवल्यापासून संबंधीत शेतकऱ्यांना आपल्या रोजगारात २५ टक्के वाढ झाल्याचे अनुभवले. राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांवर २०१८, २०१९ आणि २०२० साली अनुक्रमे ४.७ लक्ष, ५.३ लक्ष आणि ७.९ लक्ष पर्यटक भेट देऊन गेले. या पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना ५५.७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनावर नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील कृषी पर्यटन क्षेत्रातील 30 हून अधिक मान्यवर तज्ञ सादरीकरण आणि मार्गदर्शन करणार आहेत. World agri tourism day - WAD या फेसबूक पेजवर ही सत्रे लाइव्ह पाहता येतील. 

०००००

तौकते ' चक्रीवादळ : आमदार विनोद निकोले यांनी घेतला आढावा





 तौकते ' चक्रीवादळ : आमदार विनोद निकोले यांनी घेतला आढावा
डहाणू. ( विशेष प्रतिनिधी ) – 'तौकते' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी किनाऱ्या लगत असलेल्या वस्ती मधील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन प्रशासनाचा आढावा घेतला आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, गेल्या वर्षी 'निसर्ग' चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता 'तौकते' वादळ येत आहे. अशात अरबी समुद्रात तयार झालेलं 'तौकते' चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्ष रहावे, मुसळधार पाऊस आल्यास घराबाहेर न जाता सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळाचा धोका लक्षात घेता, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने यापूर्वीच दिला आहे. यासोबतच मच्छीमारांनी बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्या नीट बांधून ठेवाव्यात. या कालावधीत पालघर जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार निकोले यांनी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच किनारपट्टीवर नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास आमच्या पक्षाचे कॉ. महेंद्र दवणे, कॉ. धनेश अक्रे यांना संपर्क करावा, आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करण्याचे पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही आमदार निकोले यांनी भेटी दरम्यान आलेल्या नागरिकांना दिली.
दरम्यान चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली असता या पार्श्वभूमीवर हवामान शास्त्र कार्यालय डहाणू येथून माहिती घेऊन आगर, नरपड, चिखला, डहाणू गाव आदी किनारपट्टीला भेट देऊन आमदार विनोद निकोले यांनी येथील कोळी बांधवांबरोबर चर्चा केली व अधिकाऱ्यांसाहित वस्तुस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राहुल सारंग, पोलीस निरीक्षक कदम, डहाणू नगरपरिषद उप मुख्याधिकारी जोशी, माकप पदाधिकारी कॉ. चंद्रकांत गोरखाना, डॉ. आदित्य अहिरे, कॉ. महेंद्र दवणे, कॉ. धनेश अक्रे आदी उपस्थित होते.

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे 
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यात दिनांक १६ ते १८ मे रोजी तुरळक ठिकाणी  गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर दिनांक १६ ते १८ मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आलेली आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती  दक्षता घ्यावी. 
             दिनांक १५ मे २०२१ रोजी अरबी समुद्रातील ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ४० ते ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दिनांक १६ मे २०२१ रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ५० ते ६० ते ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दिनांक १७ मे २०२१ रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. 
         चक्रीवादळाच्या कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी  
१. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. 
२. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.
३. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. 
४. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 
५. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. 
६. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
७. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास , गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
८. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.  
 चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षांत घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगावी- 
१) मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित  ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. 
 २) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
    ३) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. 
   ४) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२५२५)२९७४७४किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष तलासरी तालुक्यासाठी९६३७६९२१०२ , वसई तालुक्यासाठी  (०२५०) २३२२००७ , डहाणू तालुक्यासाठी ९६०७७४४२५८, पालघर तालुक्यासाठी (०२५२५)२५४९३० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
  ५) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.
  ६)कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२५२५)०२९७४७४किंवा टोल फ्री १०७७ या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.  
७)आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे. 
 ८) पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. 
 ९) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.    
 १०) मुसळधार पाऊस पडत असताना तसेच  सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ.ठिकाणी जावू नये. 
११) आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. 
१२)हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून  जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी. 
                                
           

     *( डॉ. माणिक गुरसळ)*
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर

Friday, May 14, 2021

सफाळे गावात रक्तदान शिबिर संपन्न

सफाळे रक्तदान शिबिर संपन्न 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मा. मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब, यांनी शासनाच्या वतीने राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ,केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान संकलन शिबिरास स्थानिक, लोकप्रभाव संस्था सफाळे, मेडिकल असोसिएशन सफाळे, सोशल वर्कर्स सफाळे, सफाळे रेल्वे स्टेशन कमिटी, ग्रामपंचायत सफाळे - उंबरपाडा या सारख्या कार्यक्षम व सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्यांनी भरघोस सहकार्य केल्याने शुक्रवार दिनांक १४ मे रोजी देवभुमी हाॅल सफाळे पुर्व रेल्वे स्टेशन जवळपास रक्तदान शिबिर संपन्न झाले. 
रक्तदात्यानी दिलेल्या उत्फुर्त प्रतिसादामूळे, महाराष्ट्र ब्लड बँक पालघर यांच्या सहयोगाने व डॉक्टर वैशाली चव्हाण यांच्या उपस्थितीत २१३ रक्तदात्यानी  
केलेल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. 
 सफाळे पोलीस ठाणे यांचे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा. पोलीस निरीक्षक यांनी रक्तदान करण्यासाठी साठी आलेले व रक्तदान केलेल्या सर्वांचे अभिनंदन करीत रक्तदान करणार्या, रक्तदात्यांचे रक्तदान पत्र देत त्यांचा मान्यवर सह सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य त्यांचे मनापासून अभिनंदन करून आभार मानले.नमस्कार
  आपण अत्यंत कमी कालावधी मध्ये तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये सुद्धा सफाळा पोलीस स्टेशन द्वारे रक्तदान करणे बाबत केलेल्या आवाहानास  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या प्रतिसाद देत आपण स्वतः किंवा आपल्या मित्र मंडळी मार्फत रक्तदान करण्यास भाग पाडून  *213 रक्तदाते मिळून 213 blood units बॅग जमा केल्या*  खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भविष्यात देखील आपण असेच प्रेरणादायी काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, व आपले सर्वांचे अभिनंदन करतो.

वडिलांचे स्वप्न साकार केले - डॉ.पौर्णिमा पाटीलकु.पौर्णिमा पाटील ही बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन!

वडिलांचे स्वप्न साकार केले - डॉ.पौर्णिमा पाटील
कु.पौर्णिमा पाटील ही बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे  सर्व स्तरातून अभिनंदन!
भिवंडी (प्रतिनिधी)दि.१४(स्व.रा.तो) भिवंडी तालुक्यातील मौजे केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली कु.पौर्णिमा  अंकुश पाटील ही जिद्दीने व अभ्यासु वृत्तीने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर आज बी.एच.एम.एस.(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
जवळ जवळ दोन वर्ष वडील हृदय विकाराच्या झटक्याने कोमा मध्ये गेले होते.त्यामुळे तिला असंख्य अडचणींवर मात करावी लागली . परीक्षा तोंडावर आलेली असताना तिला घरातील सर्व कामे करून ठाणे येथील हाईलांड रुग्णालयात आपल्या आई साठी दोन वेळचे जेवण बनऊन
देत असे वडील स्व.अंकुश पाटील हे किराणा दुकान चालवत असताना आपल्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहत होते.त्यांचे शिक्षण कमी असताना देखील एम्.एच.एफ.एस.
होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर येथे जाऊन त्यांनी तिचे एडमिशन घेतले व एकाच वेळी तिची फी एक रकमी भरली असल्याने परिस्थिती बिकट असताना देखील तिला पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली नाही.तिचे दोन वर्ष वडिलांच्या आजारामुळे वाया गेले.दोन वर्ष मृत्यूशी झुंज देत असताना अखेर  वडिलांचे निधन झाले.अशा कठीण प्रसंगी मात्र तिने आपली जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर पुन्हा नव्या उमेदीने  अभ्यासाला सुरुवात केली व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून दाखविले .आज ती  भिवंडी तालुक्यातील मौजे केवणी या छोट्याशा गावात डॉक्टर झाली याचा सर्व ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान वाटला आहे.त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तिच्या या यशा बद्दल तिने आपली आई कुंदा अंकुश पाटील,भाऊ मयूर अंकुश पाटील,भाऊ विशाल अंकुंश पाटील व सर्व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.जर त्यांनीच मला साथ दिली नसती तर मी आज डॉक्टर झाली नसती व वडीलांचे स्वप्न साकार करू शकली नसती माझे यश हीच माझ्या वडिलांना भावपुर्ण श्रध्दांजली आहे असे तिने सांगितले आहे.त्यामुळे तिचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....

जव्हार शहरातील बँकासमोर अँटीजन तपासणी केंद्र सुरू

*जव्हार शहरातील बँकासमोर  अँटीजन तपासणी केंद्र सुरू

पालघर (प्रतिनिधी)दि. १४ : पालघर जिल्हयातील जव्हार सारख्या दुर्गम भागात सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असला तरी खावटी योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य सुरु असल्याने बँकामध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. ही ठिकाणे भविष्यात कोरोना प्रसाराची ठिकाणे होउ नयेत यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली  अपर जिल्हाधिकारी . दिलीप गुट्टे यांच्या उपस्थितीत जव्हार शहरातील बँकासमोर आरोग्य विभागामार्फत अँटीजन तपासणी केंद्र सुरू करण्यात आली.

जव्हार शहारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या प्रवेशव्दारावर ही अँटीजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आली असुन, तपासणी शिवाय बँक ग्राहकांना बँकेत प्रवेश देऊ नये अशा सुचना उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिलेल्या आहेत.

अशा स्वरुपाची कोरोंना तपासणी केंद्र उभारल्यामुळे जव्हार सारख्या ग्रामीण भाग कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी चांगली मदत होईल अशी माहिती तहसिलदार  संतोष शिंदे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

Wednesday, May 12, 2021

कोविड योद्धा पत्रकार,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी व अपंग तसेच ६० वर्षा वरील व्यक्तींना लसिकरणात प्रथम प्राधान्य द्यावे. बहुजन विकास आघाडीचे.जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली मागणी

कोविड योद्धा पत्रकार,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी व अपंग तसेच ६० वर्षा वरील व्यक्तींना लसिकरणात प्रथम प्राधान्य द्यावे. 
बहुजन विकास आघाडीचे.जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली मागणी
पालघर (प्रतिनिधी).आपल्या पालघर जिल्ह्यातील पत्रकारांनी कोविड च्या काळात प्रत्येक घडामोडी सर्वांना घर बसल्या पाहायला व वाचायला मिळतील असं काम ते दररोज आपल्या स्वतः. च्या जीवाची पर्वा न करता ते दररोज प्रत्येक ठिकाणी जाऊन सत्यबातमी आपल्या पर्यंत पोहचवत आले आहेत.तसेच .परिवहन मंडळाची देखील सर्वांना कामा साठी जावे लागायचे तर सर्व वाहन बंद असताना परिवहन  महाराष्ट्र राज्य  महामंडळ यांनी सेवा पुरविणाऱ्या साठी अतोनात परिश्रम घेतले आहेत.तसेच ६० वर्षा वरील व अपंग ह्यांना जर लसीकरणा साठी गर्दीत उभे राहावे लागते ही बाब बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष  विश्वनाथ विष्णू घरत  ह्यांनी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ह्या सर्वांना लसीकरणाची ची सोय   रांगेत उभे न करता पाहिले प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.