दहिसर तर्फे मनोर मध्ये दहशत ?
ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना मारहाण !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मनोर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी श्री विजय बिल्लेवार यांनी दिनांक २८ मे २०२१ रोजी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडून प्रवेश केला असताना त्यांना त्यांच्या केबिनच्या मागिल बाजूस असलेल्या खिडकीची स्लायडींग काच फुटलेली, व टेबलावर बियरच्या बाटलीचे काच, केबिंनचे पार्टिशन तुटून पडल्याचे आढळून आल्यानंतर श्री दशरथ जाधव ग्रामपंचायत सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनकर नाईक, सुनील नाईक याना घडलेला प्रकार निदर्शनास आणुन दिला. त्याच वेळी आशा वर्कर्स हि ग्रामपंचायत आॅफीस मधे आलेल्या.
सदर घटने बद्दल ग्रामविकास अधिकारी अहवाल तयार करीत असताना, अचानक पणे गावातील गौरव विश्वनाथ पाटील ग्रामपंचायत आॅफीस मधे येउन, ह्या काचा मी फोडल्या तुम्ही काय गावाचा विकास केला मला माहिती आहे. विचारले व दमदाटी शिवीगाळ करीत निघून गेला. घडलेल्या प्रकारा बद्द्ल गावाचे सरपंच,दशरथ जाधव, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक यांना बोलवून सांगितला असताना थोड्या वेळाने गौरव पाटील पुन्हा ग्रामपंचायत आॅफिस मधे येऊन ग्रामविकास अधिकारी बिल्लेवार यांच्या शर्टची कॉलर पकडून, टेबलावर असलेल्या लोखंडी पट्टीने मारहाण करीत असताना सरपंच यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केला असताना त्यांनाही मारहाण करण्यात येऊन, आॅफीसच्या फायली - सामानाची पाडापाड,करून पोलिस स्टेशनला माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला तर जिवे ठार मारण्याची धमकी सर्वसमक्ष देत निघून गेला.सदर घटनेची तक्रार ग्रामविकास अधिकारी यांनी मनोर पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि. नंबर १०६ / २०२१ प्रमाणे करण्यात आली असून भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे अटक करण्यात आली असून आरोपपत्र दाखल केले असताना आरोपीस दोन दिवस पोलीस कस्टडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.
No comments:
Post a Comment