*विक्रमगड येथे जनजागृती आरोग्य चित्ररथ व भात बी बियाणे वाटप*
विक्रमगड(प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता, लसीकरण जनजागृती व त्याच बरोबर तपासणी मोहिमेअंतर्गत *आरोग्य चित्ररथ* संकल्पना जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.२७ मे रोजी पंचायत समिती विक्रमगड येथून आरोग्य चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच कृषी विभाग पं.स विक्रमगड यांच्या मार्फत भात बी बियाणे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. तालुक्याची मागणी कर्जत 250- १२५ क्विंटल, कर्जत 7- १०० क्विंटल, सुवर्णा - ५० क्विंटल अशी एकूण 275 क्विंटल ची मागणी करण्यात आली असून त्यापैकी कर्जत 3- ८० क्विंटल भात बी बियाणे तालुक्याला उपलब्ध झाले असून आलेल्या बी बियाणांच्या वाटपाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.
या दोन्ही कार्यक्रमावेळी रुचिता कोरडा सभापती पं. स विक्रमगड, संदेश ढोणे, सदस्य जि प पालघर तथा सदस्य जिल्हा आरोग्य व कृषी समिती, राजेंद्र खताळ गटविकास अधिकारी पं.स. विक्रमगड, पं.स सदस्य विनोद भोइर, अंजली भोये, मनोज बोरसे, कांता सुतार, सुनीता घाटाळ, सुभाष भोये, तालुका आरोग्य अधिकारी कुलकर्णी, आरोग्य व कृषी विभाग पं.स विक्रमगड चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कृषी समिती सदस्य संदेश ढोणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागील वर्षी एका कम्पनीच्या भात बी बियाणांमध्ये बोगस व निकृष्ट दर्जाचे बी बियाणे आढळुन आले होते. बॅग वरील टॅग व पावती नसल्याने विमा कंपन्यांकडून व पुरवठा करणाऱ्या कंपनी कडून भरपाई घेता आली नाही. तरी बॅग वरील टॅग व पावती जपून ठेवायची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच बोगस व निकृष्ट बी बियाणांची तक्रार वेळीच संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment