सफाळे पोलिसांनी केले, नाईक कुटुंबाच्या सौजन्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कै. रेणीबाई नारायण नाईक यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या बद्दल आदर - स्मरण - कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, एक वेगळे सामाजिक कार्य करून, एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न नालासोपारा येथील नाईक कुटुंबियांनी समाजापुढे निर्माण केला आहे.
कै. रेणीबाई नाईक यांच्या निधनानंतर समाजातील वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून, दिनांक २८ मे २०२१ रोजी सफाळे पूर्व विभागाकडील,जंगल पट्टीत वसलेल्या दारशेत - उंबरपाडा ता,जि पालघर येथील ५८ कुटूंबाना व सफाळे पश्चिम भागातील ४२ कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले
सफाळे पोलीस स्टेशन मधील कार्यरत अधिकारी श्री पंकज पाटील पो. उपनिरीक्षक, श्री राजेंद्र घुगे पोलीस शिपाई, श्री कैलास शेळके पोलीस नाईक यांच्या हस्ते सफाळे बाजार पेठेत रोजंदारीवर कामकरणारे कामगार व केळवा रोड टोकराळे येथील गरिब गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
नाईक कुटूंबातील श्री वासुदेव नारायण नाईक, मंदा पांडुरंग म्हात्रे भालचंद्र नारायण नाईक, मनोहर नारायण नाईक, सचिन नाईक, सायली नाईक यांनी या उपक्रमाचे आयोजन केलेले. या वेळी सफाळे येथील रविंद्र ठाकुर, अंकुश जाधव, साई पाटील आदि उपस्थित होते. कै. रेणीबाई यांच्या पश्चात त्यांचे तिन मुले, एक मुलगी, दोन सुना, जावई व पाच नातवंड असा परिवार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षक श्री जतिन कदम सर यांच्या कडून मिळत आहे.
No comments:
Post a Comment