Thursday, March 25, 2021

बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गतवसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई - विरार महानगरपालिका' यांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' कार्यक्रमाचे आयोजन

बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत
वसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई विरार महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानकार्यक्रमाचे आयोजन

 

वसई(ःप्रतिनिधी) `जागतिक पुनर्वापर दिनाचे'  औचित्य साधत  दिनांक 19मार्च 2021 रोजी वसई पापडीयेथे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानकार्यक्रम बिस्लेरी इंटरनॅशनल लियांच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई-विरार महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजन करण्यात आला.

 प्लास्टिकच्या समस्येवर तज्ञ  विविध प्रकारची उपाययोजना करण्याचे प्रयत्न करीत आहेतयाचाच एक भाग म्हणून बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंजया उपक्रमांतर्गत प्लास्टिकचा पुनर्वापर करून ते पुन्हा उपयोगात आणण्यासाठी योग्य पद्धतीने प्लास्टिक जमा करण्याबाबतचे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियानगेल्या 2 वर्षांपासून `सेव्ह  द अर्थ फाऊंडेशन'  संस्थेमार्फत  वसईमध्ये राबविले जात आहेया अभियानांतर्गत 2 टनाच्या आसपास प्लास्टिक गोळा करून ते पुनर्वापरासाठी पाठविण्यात आले आहे.

प्लास्टिक पुनर्वापरासाठी घरी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकचे संकलन करताना ते वेगवेगळे व स्वच्छ धुवून कसे ठेवावे याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती बिस्लेरी कंपनीच्या श्रीमश्रेया सुधीर यांनी उपस्थित नागरिकांना दिलीतसेच `प्लास्टिक ही समस्या नसून त्याचा पुनर्वापर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोगच आहेअसे प्रतिपादन बिस्लेरी कंपनीचे सी.एस.आरप्रतिनिधी श्रीसंतोष दरणे यांनी केले.

वसई-विरार महानगरपालिकेसोबत संस्था हे प्लास्टिक संकलनाचे काम करणार असून या कार्यक्रमात प्लास्टिक संकलनाबाबत बोलताना वसई-विरार महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीविकास पाटील यांनी महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य या कामी संस्थेला मिळेल असे आश्वासन दिले आहे.

कार्यक्रमासाठी आलेल्या स्वच्छता दूत महिलांना प्लास्टिक गोळा कसे करावे व कसे वेगवेगळे ठेवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि या महिला स्वच्छता दूतांची यावेळी आरोग्य तपासणीही करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे श्रीसंतोष काकड यांनी केले होतेकार्यक्रमात  `सेव्ह द अर्थ फाऊंडेशनसंस्थेचे पदाधिकारीपर्यावरण रक्षक श्रीमेकेन्झी डाबरेवर्तक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीहेमंत डोंगरेलायन्स क्लबचे श्रीहनुमंत भोसलेसामाजिक कार्यकर्ते जयंत हटकर इमान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...