Tuesday, March 16, 2021

जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे (पखवाडा ) उद्घाटन



जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे  (पखवाडा ) उद्घाटन

 पालघर (प्रतिनिधी)केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १६  मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळात राज्यात पोषण पंधरवडा साजरा करावयाचा असून महिला व बाल विकास विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात  देखील अनेक  अंगणवाड्या मध्ये पोषण  पखवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.  या पंधरा दिवसात जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी तसेच जनजागृतीसाठी अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अभियानाच्या पहिल्या  दिवशी अंगणवाडी स्वच्छता, गृह भेट व पोषण पखवाडा उद्घाटन या कार्यक्रमांचा समावेश असेल, त्यानंतर प्रभात फेरी  व पोषक आहारा बाबत जनजागृती, पालकासक्षम कुपोषित बालकांची वजन व उंची घेणे, करणे, कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी व VHSND घेणे, दुर्धर आजारी बालकांची RBSK मार्फत आरोग्य तपासणी करणे,  पंचायत राज सदस्यांचा समावेश  असलेल्या  पोषण पंचायतीचे आयोजन करून त्याद्वारे  त्याद्वारे कुपोषणाची व्याप्ती व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे, पोषण वाटिका,  अन्न वनीकरण SAM / MAM बालके ओळखणे व त्यांचे व्यवस्थापन करणे, कुपोषण निर्मुलनासाठी आयुष तत्वे आणि  पद्धतीचा वापर करणे बाबत जागरूकता करणे,  अंगणवाडी स्तरावर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्या करीता मोहीम राबवणे जिल्हा किंवा  गट  स्तरावर  स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक पाक कृती  बनवणे,  माता बैठक व ,मातांच्या चांगल्या सवयी या विषयी चित्रकला स्पर्धा व गृह भेटी व  इतर अनेक उपक्रम या अभियान काळात राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग प्रवीण भावसार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...