. *तलाठी अशोक अहिरे, यांच्या वारसांना 50 लाख रुपये मंजूर*
पालघर(प्रतिनिधी) दि 27 : जिल्हाधिकारी पालघर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय पालघर यांच्या
आस्थापनेवरील कार्यरत तलाठी कर्मचारी अशोक भिमराव अहिरे, यांचा कर्तव्य पार पाडतांना कोरोना विषाणू संसर्गाने दि. २७/०९/२०२० रोजी मृत्यू झाला . त्यानुसार वित्त विभागा कडील शासन निर्णय दि, १४/१०/२०२०, महसूल विभागाकडील शासन ज्ञापन दि. २३/०३/२०२१ विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचेकडील दिनांक २४/०३/२०२१ व जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांच्या कडील आदेश दि. २६/०३/२०२१ रोजीच्या आदेशान्वये अशोक भिमराय अहिरे, यांच्या नामनिर्देशित वारसांना रु. ५०,००,०००/- (अक्षरी- रुपये पन्नास
लक्ष ) एवढया रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment