Monday, February 1, 2021

अनाम प्रेम - पालघर आयोजित - रिक्षाचालक - एक सारथी - साथ, एक अभिनव उपक्रम

अनाम प्रेम - पालघर आयोजित - रिक्षाचालक - एक सारथी - साथ, एक अभिनव उपक्रम 
 पालघर ( हिरालाल लोखंडे ) ३० जानेवारी २०२१ महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने " अनाम प्रेम " च्या वतीने पालघर येथे सलग २५ वर्ष रिक्षाचालवून सर्व धर्माच्या लोकांना गरीब - श्रीमंत भेदभाव न करता सेवा देणाऱ्या ( कोणताही रिक्षा चालक भेदभाव करत नाही नोंद घ्यावी ) दहा रिक्षाचालकांचा अनाम प्रेम परिवारातर्फे " विशारद रिक्षा चालक " हि पदवी देऊन उपस्थित मातांच्या पवित्र हस्ते सन्मानित करण्यात आले 
  आयुष्यात सलग २५ वर्ष शिक्षण घेऊन अनेक पदविका प्राप्त होतात. नोकरीत बढती - पदोन्नती, पगारवाढ मिळते. रिक्षाचालकास काय मिळते, नवे रस्ते, नवीन तयार होणार्‍या वसाहती, हौसिंग सोसायटी, वाहतुकीचे नवे नियम, रिक्षा सबंधित तांत्रिक बाबी ज्ञान, जे कोणत्याही शाळेत किंवा कॉलेज मधे मिळत नाही पण, समाजाच्या विशाल अनुभव रूपी विद्यापिठाकडून रिक्षाचालक यांना मिळणारे ज्ञान यांनी तुलना कोणीही करू शकत नाही. म्हणून  रिक्षाचालक यांना "विशारद रिक्षा चालक " पदवी अनाम प्रेम च्या वतीने देत आहोत. 
  या प्रसंगी रिक्षाचालका साठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले, वैद्यकीय शिबिरात डाॅ. कुर्डुकर - नेत्र चिकित्सक,डाॅ.जलाराम भुजबळ.  डाॅ. अनिकेत पाटकर. डाॅ. विनायक रामटेक. डाॅ. जगदीश साळवे यांनी शिबिरात येऊन रिक्षाचालकांची तपासणी करून मोलाचे सहकार्य केले. 
   कार्यक्रमासाठी श्री निनाल भाई शहा - रोटरी क्लब प्रेसिडेंट, अॅ. जयेश आव्हाड - सेक्रेटरी, श्री पंकज राऊत - संपादक / पत्रकार अॅ. अनुश्री आव्हाड -  इनव्हीलर क्लब सदस्य, रिक्षाचालक मालक  संघटनेचे पदाधिकारी रिक्षा चालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अनाम प्रेमी कु. आकांक्षा महाजन यांनी केले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...