Friday, February 26, 2021

जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन

जनजागृती महाअभियानाचे  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन                           पालघर (प्रतिनिधी)
दि 26 :  प्रादेशिक लोक सम्पर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित जनजागृती महा अभियानाचे   जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मल्टीमीडिया व्हैन द्वारे व्हिडीओ आणि कलापथकाच्या माध्यमातून कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी सम्पूर्ण जिल्ह्यात ही जनजागृती करण्यात येईल. या वेळी.  जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव,   जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा लसीकरण अधिकारी मिलिंद चव्हाण,  किशोर चव्हाण, आकाश खाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री गुरसळ म्हणाले की कोविडचा धोका अजून सम्पलेला नाहीये म्हणून लोकांना खबरदारी घेण्यास प्रेरित करण्यासाठी या अभियानाची खूप मदत होइल. जिल्ह्यातील कोविडच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून   जनजागृती करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...