Friday, February 19, 2021

दातीवरे - खार्डी - खाडीतील कांदरवन प्रजातीच्या झाडाची कत्तल

दातीवरे - खार्डी -  खाडीतील कांदरवन प्रजातीच्या झाडाची कत्तल ! 
    सफाळे ( हिरालाल लोखंडे )मौजे दातिवरे - खार्डी ता,जि पालघर, गावाच्या हद्दीतील खाडी किनारी कांदरवन मोठया प्रमाणात आहे, या राखीव असलेल्या कांदरवन सर्वे नंबर ६०५ मधे सी, आर, झेड, कायद्याचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी राजेश यशवंत घरत राहणार दातिवरे - खार्डी ता,जि पालघर. सरकारी जमिनीवरील कांदरवन नष्टकरून लोखंडी बोट व पाईप यांच्या सहाय्याने कांदरवन झाडांची कत्तल करून रेती साठविण्यासाठी कुंडी व रस्ता बनवून लोखंडी बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करून खाडी मार्गाने रेती आणून मोटर पंप व पाईप व्दारा रेती  साठा करीत असल्याची लेखी तक्रार गांवक-यांच्या कडून मा. वनशेत्रपाल सफाळे ता,जि पालघर यांना मिळाल्यानंतर तक्रारीची दखला घेत पुढील कारवाई करण्यात आली. 
दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी मा, वनशेत्रपाल सफाळे यांनी आपले कर्मचारी व पंच यांच्यासह प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी रेती साठविण्याचे काम झाले असल्याच्या खुणा व पसरलेली रेती दिसुन येत होती. सदर जागा परिसरात कोणत्याही सिमांकींत खुणा, बुरूज, किंवा बोध चिन्ह, पिलर दिसून येत नसून जुने मिठागर केंद्राचे पंपहाऊसच्या खुणा दिसुन येतात. त्यावरून जागेच्या वस्तुस्थितीची खात्री होऊ शकत नाही. 
मौजे खार्डी सर्वे नंबर ६०५ मधील घटना स्थळी जागेवर वनविभाग अधिकारी, कर्मचारी, व पंच प्रत्यक्षात गेले असता, त्या ठिकाणी कोणीही इसम आढळून आला नाही. झाडा झुडपात शोध घेतला असता, कोणत्याही अपवादात्मक वस्तु - सामान मिळुन आलेला नाही, सदर ठिकाणी साफसफाई करुन कुंडी बनविण्यात आली असून त्या जागेला लागून समोर मातीचा भराव टाकून रस्ता बनविण्यात आल्याचे दिसून येते. सदर जागेची जी पी एस रिडींग व जी पी एस  ट्रॅक व रस्त्याचे मोजमाप घेतले असताना ते N - १९ .५४३३०६ ,  E ७२ . ८६००६९ असे असून मातीचा टाकून बनवलेला रस्ता लांबी ३० मीटर, रूंदी ६ मीटर ( १८० चौरस मीटर ) रेती साठवून ठेवण्यासाठी कुंडी, साफसफाई केलेली जागा, रस्ता बनविण्यासाठी टाकलेल्या भरावाखाली गेलेले १८० चौ. मीटर शेत्रावरील कांदरवन वृक्ष दबले गेले, पंचासमक्ष पाहणी केली असता आढळून आले. जागा मालकी बाबत ठामपणे सांगता येत नसल्याने सदर प्रकरणी चौकशी साठी महसूल विभाग मा. तहसीलदार साहेब पालघर यांच्या कडे पाठविण्यात आले असून योग्य माहिती प्राप्त होताच पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाकडून मिळत आहे तर गावकरी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेऊन कारवाईची मागणी करीत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...