माहीम ( हिरालाल लोखंडे ) -- फिर्यादी श्री रणबहादूर पुरणबहादूर थापा वय ४८ वर्ष व्यवसाय - वॉचमन, राहणार हरणवाडी - माहीम ता,जि पालघर, यांचा मुलगा नामे गणेश रणबहादूर थापा वय वर्षे ०९ हा दिनांक ३०/ ०१ /२०२१ रोजी सकाळी सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान हरणवाडी येथील प्रमोद यादव यांचे बांधकाम साईड आवारात खेळण्यास गेला असता कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तक्रारदार यांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले आहे.
पोलिस ठाणे सातपाटी ता,जि पालघर येथे गुन्हा रजि,न ०६ / २०२१ कलम भा.द.वि.सं.कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपासी अंमलदार पो.ना. श्री आर, के, घाटाळ प्रभारी अधिकारी श्री सुधीर धायरकर - सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे
सदर फोटोत दिसत असलेला मुलगा ( गणेश थापा )कोणासही दिसून आल्यास किंवा आढळल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा
१ ) पो, उपनिरीक्षक सुजित पाटील -- ९५१८५४११०२
२ ) पो, ठाणे अंमलदार - ८६६९६०४०४१
३ ) स, पो, निरीक्षक -
८६६९६०४०४०
No comments:
Post a Comment