Friday, January 22, 2021

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पालघर येथे साखळी उपोषण..

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पालघर येथे साखळी उपोषण..

(प्रतिनिधी)
दिल्ली येथे मोदी सरकार द्वारे आणलेल्या शेतकरी विरोधी बिलच्या विरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत गोरसेना राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दोन दिवसाच्या साखळी उपोषणचे आयोजन विजय जाधव विभागीय संयोजक, गोरसेना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. यावेळी रवी राठोड प्रदेश संघटक बंजारा टायगर्स, विजय जाधव, सुभाष राठोड, विठ्ठल चौहान, श्रावण राठोड, श्रीनाथ राठोड, शारदा बाई राठोड, सुरेश राठोड व रेणुका बाई राठोड इत्यादी पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
  दिल्ली येथे मागील 50 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलनामध्ये अद्यापपर्यंत 80 शेतकरी आंदोलनकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान शेतकऱ्यांबरोबर सरकारची अनेक चर्चा होऊनही अद्यापपर्यंत मोदी सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही, याउलट आंदोलनाला दाबण्यासाठी वेग-वेगळे उपाय योजना करताना मोदी सरकार दिसून आली. भारतीय उच्च न्यायालयाने सुध्दा शेतकरी विरोधी कायद्यावर स्थायीबंदी आणल्याऐवजी तात्पुरती स्वरूपात अस्थायी बंदी लावली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या या काळ्या कायद्याला रद्द करण्यासाठी अद्यापही कुठले पाऊले उचलण्यात आलेले नाही, म्हणून गोरसेना राष्ट्रीय संघटना व इतर संघटनेकडून देशभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर दोन दिवसीय साखळी उपोषणचे आयोजन दि.21 व 22 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले आहे. जर मोदी सरकारने हा काळा कायदा परत घेतला नाही तर बंजारा समाजाची देशभरातील सर्व संघटना एकत्र येऊन  रस्त्यावर आणखी तीव्र आंदोलन करतील, असं इशारा रवी राठोड, महाराष्ट्र प्रदेश संघटक बंजारा टायगर्स यांच्या कडून देण्यात आला.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...