शासना कडून पालघर नगर परिषदेला क्रीडांगण व पाण्याच्या टाकी साठी जागा मिळाली.आरोग्य सभापती अमोल पाटील यांच्या प्रयत्नाला यश.
पालघर (प्रतिनिधी) पालघर नगरपरिषदे तील शिवसेना पक्षाचे आरोग्य सभापती सन्मानीय श्री अमोल पाटील साहेब ह्यांनी सतत केलेल्या पाठपुराव्या मुळे आणी सर्व सन्मानीय सदस्याच्या सहकार्या मुळे आज दि.३१/१२/२०२० रोजी. *शासना कडून पालघर नगरपरिषदेला क्रिडांगण व पाण्याच्या टाकी साठी जागा दिली*
सदर कामासाठी २०/०७/२०२० पासुन नगरपरिषद तर्फे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू होता.
पालघर नगरपरिषदेचेच्या हद्दीतील मौजे - अल्याळी ,येथील स . न . ६५/अ पै . व गट नंबर १९८/१/अ एकूण क्षेत्र ३० २५ .५४ हे आर पैकी क्रिडांगणाकरीता १.७०.७ हे . आर व पाण्याची टाकी (ESR) करीता .२०.० हे . आर असे एकूण १. ९० .० हे . आर जमीन देण्यात आली .तसे पत्र मा जिल्हाधिकारी डॉ श्री माणिक गुरसळ साहेब ह्यानी नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला काळे ,शिवसेना गटनेते श्री कैलास म्हात्रे साहेब,सर्व नगरसेवक व नगरसेविका ह्यांच्या उपस्थितीत दिले .
एक चांगले क्रिडांगण आल्याळी येथेपालघर नगरपरिषद तर्फे करणार आहेत.
⛳️⛳️⛳️⛳️⛳️
No comments:
Post a Comment