घंटागाडी ठेकेदाराचा नाशिक महानगरपालिकेकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा उघड : आयुक्तांचे दंडात्मक कार्यवाहीचे आदेश.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे
नाशिक रोड विभागातील मे. तनिष्क सर्विसेस या कंपनीकडे घंटागाडीचे व्यवस्थापन कंत्राटी तत्वावर आहे. घराघरांमधून बाहेर पडणारा घनकचरा घंटागाडी द्वारे संकलित केला जातो, कचरा संकलनास जाण्याआधी घंटागाडीचे वजन केले जाते व पाथर्डी येथील कचरा डेपोवरील खत प्रकल्पावर गाडी रिकामी करण्याआधी कचऱ्यासह घंटागाडीचे पुन्हा वजन केले जाते व ठेकेदारास 500 ते 600 रुपये प्रति टन प्रमाणे अदा केले जातात. वजनानुसार पैसे अदा केले जात असल्याने ठेकेदारने घंटागाडीचे वजन वाढवण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली, गाडीचे वजन वाढविण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली माती व दगड टाकले जात होते हा प्रकार मागील खूप दिवसापासून सुरू होता परंतु घंटागाडीचे वजन अधिक भरल्याने वजन वाढवण्याचा हा प्रकार महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पाहणीत उघड झाला व महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
No comments:
Post a Comment