Sunday, October 18, 2020

आरोग्य कर्मचारी आरोग्य चिंचणि यांनी केली करो नावर मात*************************

आरोग्य कर्मचारी आरोग्य चिंचणि यांनी केली करो नावर मात
*************************

बोईसर (प्रतिनिधी)प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचनी तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे आरोग्य सहाय्यक ह्या पदावर कार्यरत आहे. 17 ऑगस्ट 20 रोजी माझी  corona test positive आली. SDH डहाणू येथे त्याच दिवशी डॉ गायकवाड यांनी अ‍ॅडमिट केले त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होता, दम लागत होता Spo2 80 होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लगेच मला Tima hospital bhoisar येथे admit केले. HRCT मध्ये जवळपास 80% फुफ्फुस बाधीत आहेत असे report मध्ये सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी मला डॉ दयानंद सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, डॉ मिलिंद चव्हाण सर, डॉ सागर पाटील सर, डॉ प्रांजली पाटील मॅडम, डॉ मुळीक मॅडम यांनी  Goldenpark hospital वसई येथे admit केले. तेथील डॉ. Pistonji malcolum यांनी मोलाचे सहकार्य केले. माझ्या शरीराची जगण्यासाठी झुंज चालू होती. ICU मध्ये असताना दुसर्‍या दिवशी च्या स्कॅन मध्ये देखील फारशी improvement नव्हती माझी तब्येत अजूनच खालावली Spo2 50-60 पर्यंत कमी झाला होता, श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यानंतर  प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ देवेंद्र पाटील यांनी तात्काळ आयुर्वेदिक औषधे चालू केली.  औषधे चालू केल्यानंतर Spo2 वाढू लागला, श्वास घेण्यास होणारा त्रास हळूहळू कमी होवू लागला व स्कॅन मध्ये फुफ्फुसामधील infection कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मला ICU मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले परंतु माझ्यासोबत अ‍ॅडमिट झालेले रुग्ण ICU मध्येच मृत्यूशी झुंज देत होते व त्यातील 3 रुग्णांचा माझ्यासमोर मृत्यू देखील झाला होता. अजूनही मी पूर्णतः आजारातून बाहेर आलो नाही 90% आजार कमी झाला असला तरी 10% अजून बाकी आहे. यातून मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की काळजी घ्या, मास्क चा वापर करा, बाहेरून आल्यावर हात साबनाने  धुवा,  एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा  व शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा. कारण ही वेळ माझ्यावर आली तशी कोणावरही येवू नये. यात मला मदत करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वानेरे मॅडम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण सर, डॉ सागर पाटील सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप गाडेकर सर,  गट विकास अधिकारी श्री भरक्षे , डॉ प्रांजली पाटील, डॉ सुषमा मुळीक, वैद्यकीय अधिकारी डॉ गायकवाड यांनी माझ्या साठी कोरोनावर इंजेक्शन आणून दिले त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे तसेच ज्यांनी मला मृत्युच्या दारातून बाहेर काढले ते डॉ pistonji malcolum व डॉ देवेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी आशागड ता. डहाणू यांचा मी सदैव ऋणी राहील. तसेच अनवधानाने कोणाचे नाव घ्यायला विसरलो असेल तर त्याबद्दल क्षमस्व. मी श्री विश्वावती आयुर्वेदिक चिकित्सालय  कोल्हापूर व वैद्यराज श्री समीर जमदग्नी पुणे यांचे संशोधित "रस माधव काढा" हे औषध नियमित सेवन करत होतो व त्यासोबत ICU मध्ये असताना डॉ देवेंद्र पाटील यांनी दिलेली  औषधी घेत होतो. पण म्हणतात ना, कान हे सोनारा कडून टोचून घ्यावे त्याप्रमाणेच  औषधे ही डॉक्टरांन कडूनच घ्या. यातून मी शासनास एकच सांगू इच्छितो की आधुनिक शास्त्र व आपले शाश्वत आयुर्वेद शास्त्र यांची सांगड घालून corona रुग्णांवर उपचार करावे व माझा असा ठाम विश्वास आहे की नक्कीच राज्याचा मृत्यूदर हा कमी आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद... 
आपलाच 
श्री लक्ष्मण गायकवाड आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी ता. डहाणू जिल्हा पालघर

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...