Saturday, October 31, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :-३१.१०.२०२०वार :- शनिवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :-३१.१०.२०२०
वार      :- शनिवार


● खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात : ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांची माहिती; येत्या काही दिवसांमध्ये ३० हजार टन बटाटा भूतानमधून येणार

● भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून 'ब्राह्मोस' क्रुझ क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी


● भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाचा २ टप्प्यात मलबार युद्धाभ्यास करणार; पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात तर दुसरा टप्पा अरबी समुद्रात १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणार 

● येत्या १ नोव्हेंबरपासून वैष्णोदेवीचे दर्शन दररोज १५ हजार भाविकांना घेता येणार; जम्मू- कश्मीरच्या प्रशासनाने घेतला निर्णय 

● तुर्की आणि ग्रीस ही दोन शहरे भूकंपाने हादरली; पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती; ३१ जण ठार तर १३५ जण जखमी झाल्याची नोंद


● राज्यात दिवसभरात ६,१९० कोरोनाचे रुग्ण आढळले; तर ८,२४१ बाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५,०३,०५० वर पोहोचली, रिकव्हरी रेट ८९.८५ टक्के

● मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर नेणार ७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा; मराठा आमदार-खासदारांना सामिल होण्याचे आवाहन

● रशियात ‘अल्लाहू अकबर’ घोषणा देत अल्पवयीन मुलाचा चाकू हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात ठार; पोलीस ठाण्याला आग लावण्याचा केला प्रयत्न

● आयपीएल २०२० : राजस्थानने ७ विकेटसने विजय मिळवत पंजाबचा विजयी रथ रोखला; राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा कायम

● अभिनेता अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचं नाव अखेर बदललं; आता 'लक्ष्मी' या नावाने रिलीज होणार चित्रपट

Thursday, October 29, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- ३०.१०.२०२०वार। :- शुक्रवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ३०.१०.२०२०
वार।    :- शुक्रवार

● लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

● गुड न्यूज : देशातील करोनामुक्तांचे प्रमाण वाढले; रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर पोहचला

● देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकिटांच्या किमतीवरील मर्यादेला 3 महिन्यांची मुदतवाढ


● 2014 च्या संसद हल्ल्‌याप्रकरणी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निर्दोष मुक्त केले

● भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्याविरोधात टीका करताना अपशब्द वापरल्याचा आरोप

● राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यासाठी चाचपणी; सर्वप्रथम नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती 

● 'सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं?', राधाकृष्ण विखे पाटलांचा शिवसेनेवर निशाणा भ तर तिसऱ्या क्रमांकावर Jio 

● विश्वविजेत्या क्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली, तो टोकियो ऑलिंपिक खेळू शकणार नाही

● बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'लव्ह हॉस्टेल'मध्ये सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी झळकणार!

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 11 नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 11 नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू
पालघर (निलेश भोईर)दि. 29 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दि.30/10/2020 रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.
तरी पालघर जिल्ह्यात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी पोलीस अधीक्षक पालघर व पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार यांचे कार्यक्षेत्रातील पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये दि. 29/10/2020 ते दिनांक 11/11/2020 या कालावधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,
2) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे,
6) ज्यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.

सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशानुसार अगर कर्तव्य किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही.
असे अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.
********

Monday, October 26, 2020

*एकदिवसीय खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियान*

*एकदिवसीय खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियान*

पलघर (निलेश भोईर)24 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नज्जीवन राज्य शासनाने केले आहे. खावटी अनुदान योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी भरावयाचे अर्ज प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडुन ग्रामपंचायत आणि नागरी भागासाठी गठीत केलेल्या समितीकडे देण्यात येत आहेत. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, डाकसेवक, शिक्षक आणि प्रकल्प कार्यालयाचा प्रतिनिधी आहे. अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला खावटी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि कागदपत्रांची पुर्तता लवकर व्हावी या उद्देशाने प्रकल्प कार्यालय डहाणू यांनी बुधवार दिनांक 28.10 .2020 रोजी ग्रामपंचायतीमध्ये "खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे" आयोजन केले आहे.                         सन 2020-21 या वर्षी चालू केलेल्या खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या निकषाप्रमाणे आदिवासी बांधवांनी दिनांक 28 .10.2020 आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या शासकिय कर्मचाररी यांच्याशी संपर्क करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावेत असे आवाहन डहाणू प्रकल्पाच्या

प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले आहे. • मनरेगावर 1 दिवस कार्यरत असलेला आदिवासी मजुर (01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत)

आदिम जमातीतील सर्व कुटुंबे

पारधी जमातीतील सर्व कुटुंबे

भुमिहिन शेतमजूर

• परितक्ता/ घटस्पोटीत महिला/ विधवा/ कुमारी माता अपंग व्यक्ती असलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे आदिवासी कुटुंब

वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे

तरी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या कुटुंबानी खावटी

अनुदान योजना महासंपर्क अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी केले आहे.

Sunday, October 25, 2020

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 49 हजार 950 जणांनी केली करोनावर मात*

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू  नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 49 हजार 950 जणांनी केली करोनावर मात*
          *अलिबाग(जगधिश घरत),जि.रायगड दि. :-*  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 49 हजार 950 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 114 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-912, पनवेल ग्रामीण-342, उरण-98, खालापूर-56, कर्जत-15, पेण-77, अलिबाग-95, मुरुड-9, माणगाव-25, तळा-1, रोहा-75, सुधागड-1, श्रीवर्धन-1, म्हसळा-6, महाड-18, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 734 झाली आहे.
          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-21 हजार 602, पनवेल ग्रामीण-6 हजार 333, उरण-1 हजार 847, खालापूर-2 हजार 455, कर्जत- 1 हजार 638, पेण-3 हजार 655, अलिबाग-4 हजार 616, मुरुड-405, माणगाव- 1 हजार 851, तळा-160, रोहा-2 हजार 247, सुधागड-385, श्रीवर्धन-382, म्हसळा-303, महाड- 1 हजार 668, पोलादपूर-403 अशी एकूण 49 हजार 950 आहे.          
             आज दिवसभरातही पनवेल मनपा-110, पनवेल ग्रामीण-20,  खालापूर-4, कर्जत-2,  पेण-4, अलिबाग-8, मुरुड-4, सुधागड-1,  श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-5असे  एकूण 168 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
          आतापर्यंत पनवेल मनपा-535, पनवेल ग्रामीण-130, उरण-109, खालापूर-117, कर्जत-95, पेण-99, अलिबाग-135, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-82, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 525 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
        आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-81, पनवेल ग्रामीण-18, उरण-4, खालापूर-1, कर्जत-1, पेण-2, अलिबाग-3, रोहा-2, सुधागड-1, म्हसळा-1 असे एकूण 114 ने वाढ झाली आहे.
           आजच्या दिवसात 3 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, अलिबाग-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
          आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 95 हजार 930 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 177 आहे.

Saturday, October 24, 2020

*एकदिवसीय खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियान*

*एकदिवसीय खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियान*

पलघर(निलेश भोईर) 24 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नज्जीवन राज्य शासनाने केले आहे. खावटी अनुदान योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी भरावयाचे अर्ज प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडुन ग्रामपंचायत आणि नागरी भागासाठी गठीत केलेल्या समितीकडे देण्यात येत आहेत. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, डाकसेवक, शिक्षक आणि प्रकल्प कार्यालयाचा प्रतिनिधी आहे. अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला खावटी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि कागदपत्रांची पुर्तता लवकर व्हावी या उद्देशाने प्रकल्प कार्यालय डहाणू यांनी बुधवार दिनांक 28.10 .2020 रोजी ग्रामपंचायतीमध्ये "खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे" आयोजन केले आहे.                         सन 2020-21 या वर्षी चालू केलेल्या खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या निकषाप्रमाणे आदिवासी बांधवांनी दिनांक 28 .10.2020 आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या शासकिय कर्मचाररी यांच्याशी संपर्क करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावेत असे आवाहन डहाणू प्रकल्पाच्या

प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले आहे. • मनरेगावर 1 दिवस कार्यरत असलेला आदिवासी मजुर (01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत)

आदिम जमातीतील सर्व कुटुंबे

पारधी जमातीतील सर्व कुटुंबे

भुमिहिन शेतमजूर

• परितक्ता/ घटस्पोटीत महिला/ विधवा/ कुमारी माता अपंग व्यक्ती असलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे आदिवासी कुटुंब

वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे

तरी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या कुटुंबानी खावटी

अनुदान योजना महासंपर्क अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी केले आहे.

सायवन- मेढे पुलाचे काम उद्याच सुरू होणार : खासदार राजेंद्र गावित यांची घोषणा* -

* *सायवन- मेढे पुलाचे काम उद्याच सुरू होणार : खासदार राजेंद्र गावित यांची  घोषणा* - 
-वसई (रवींद्र नाईक)दिनांक २४/१०/२०२० 
वसई पूर्व भागातील तानसा नदीवरील सायवन - मेढे नवीन पुलाचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले काम तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी  परीसरातील  जनतेची   सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसई याच्या कडे केली   होती अनेक वृत्तपत्रात   ह्या बाबत बातम्या आल्या होत्या  जनतेच्या मागणीनुसार व वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन आज पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी या पुलाच्या कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कंत्राटदार यांचेसह भेट देऊन रखडलेले काम उद्याच सुरू करण्याची सूचना केली.
तानसा नदीवरील सायवन मेढे जुन्या पुलाची अवस्था सद्या अतिशय खराब झाली असून पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत तसेच ट्रक ,किंवा इतर वाहने पुलावरून गेल्या पूल हलायला लागतो .म्हणून गेल्या दोन वर्षांपूर्वी जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले व यासाठी दोन कोटी साठ लाख निधीची तरतूद करण्यात आली.पण दोन वर्षे उलटली तरी या पुलाच्या कामात कोणतीही प्रगती होताना दिसत नव्हती .त्यामुळे सद्या जुन्या जीर्ण झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू असल्याने कधीही मोठी दुर्घटना घडू शकते.जुना पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने वडघर, कळभोन, आंबोडे, मेढे, भिनार व परिसरातील आदिवासी पाडे अशा दहा ते पंधरा हजार नागरिकांचा संपर्क तुटतो व विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, भाजीपाला विक्रेता महिला यांचे अतोनात हाल होतात. मध्यंतरी लॉकडाऊन चे कारण देत मजूर मिळत नसल्याने पुलाचे काम थांबविल्याचे सांगण्यात येत होते परंतु आता विकासकामे सुरू झाल्याने आता या पुलाचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे व परिसरातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी जनतेची होती , याची तातडीने दखल घेवून पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी या ठिकाणी भेट देत रखडलेले पुलाचे काम उद्याच सुरू सूचना कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देवून लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करावे व निधीची कमतरता असल्यास आदिवासी विकास खात्याकडून निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. तसेच उसगाव भाताने पुलाचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे लोकसभा सहसमन्वयक केदार काळे, काँग्रेसचे वसई तालुका अध्यक्ष राम पाटील , उपतालुका प्रमुख युवराज पाटील, उपअभियंता प्रशांत ठाकरे, कंत्राटदार दिलेश संखे, राधाकृष्ण पाटील, उपसरपंच चेतन पाटील, परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे*

*बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना  आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे*

        पालघर(निलेश भोईर) सन २०२०-२१  बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जि.प.अध्यक्षा भरती कामडी, कृषी सभापती सुशील चुरी, मु.का.अ.एस.के.सालीमठ तसेच अति मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.

  या योजनेमध्ये  नवीन विहिरी साठी उच्चतम अनुदान मर्यादा २,५०,००० रु, जुनी विहीर दुरुस्ती साठी ५०,०००रु, इनवेल बोरिंग साठी २०,०००रु., वीज जोडणी आकारणीसाठी १०,००० रु. ,शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी दहा हजार रुपये सूक्ष्म सिंचन संच ई ठिबक सिंचन ब तुषार सिंचन यासाठी अनुक्रमे ५०,०००रु व २५,०००रु परसबागेसाठी रु ५००, पंपसंच( डिझेल विद्युत) साठी २०,००० रु. (१० अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे पंपसंच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहील)
पीव्हीसीएचडीपीइ पाइप साठी ३०,०००( राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के किंवा उच्चतम मर्यादा ३० हजार रु. अशा स्वरूपाची ही योजना असणार आहे.

*लाभार्थी निवडीची कार्यपध्दती*
या योजनेअंतर्गत नविन विहीर , जुनी विहिर दुरूस्ती व शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एक घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देता येईल . नविन विहीर अथवा जुनी विहीर दुरूस्ती या घटकाचा यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी आकार , सुक्ष्म सिंचनसंच , पंपसंच , पीव्हीसी पाईप व परसबाग या घटकांचा लाभ अनुज्ञेय राहील. योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज घेणेत येतील . ग्रामसभेने शिफारसीत केलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज गट विकास अधिकारी , पंचायत समिती यांचेकडे सादर करून प्रत आवश्यक कागदपत्रांसह कृषि अधिकारी ( विघयो ) पं.स.यांचेकडे जमा करावी . 

*योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्थी*

 १ ) लाभार्थी हा बिरसा मुंडा कृषि क्रांती ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) योजनेकरीता अनुसुचित जमाती तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेकरीता अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

२ ) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकान्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.

३ ) शेतकऱ्याचे नाव जमिन धारणेचा ७/१२ दाखला ८ - अ चा उतारा असणे आवश्यक आहे . ( नगर पंचायत , • नगरपालीका व महानगरपालीका क्षेत्राबाहेरील शेतकरी ) 

४ ) लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .

 ५ ) लाभार्थ्यांचे बँक खाते असावे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

 ६ ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे .

 ७ ) शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रू .१,५०,००० / - पेक्षा जास्त नसावे.

८ ) ज्या शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रू . १,५०,००० / - चे मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून सन
 २०१ ९ -२० चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

 ९ ) नविन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर व नविन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० है . क्षेत्र असणे आवश्यक आहे आणि योजनेतंर्गत सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा ६.०० हेक्टर शेतजमिन राहील.
 
१० ) आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हे . पेक्षा कमी जमिन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमिन ०.४० हे.इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील . त्याचप्रमाणे दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना ६ हे . धारण क्षेत्राची अट लागु असणार नाही.
 
११ ) बिरसा मुंडा कृषि क्रांती ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) योजनेकरीता अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकन्यांनी अर्ज केल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

१२ ) तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेकरीता अनुसुचित जमाती शेतकन्यांनी अर्ज केल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल . 

उपरोक्त प्रमाणे नमूद केल्या नुसार वरील दोन्ही योजनांकरीता www.mahadbtmahait.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन २०२०-२१ आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे . इच्छुक शेतकऱ्यांनी सदर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करुन ऑनलाईन सादर केलेल्या अजांची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रतीसह कृषि अधिकारी ( विषयो ) पंचायत समिती यांचेकडे स्वहस्ते सादर करावी . तरी सदर योजनांच्या अधिक माहितीसाठी  संबंधीत कृषि अधिकारी ( विषयो ) पंचायत समिती यांचेशी संपर्क करावा .
अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी सूरज जगतात यांनी  दिली आहे.

Friday, October 23, 2020

🔴 *रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात : अमित देशमुख*

🔴 *रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात : अमित देशमुख*

➡ *(जगधिश घरत) मुंबई* : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील गुरुवारी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परिवहन कार्यालय सुट्टीच्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी रविवारी सुरू राहणार

परिवहन कार्यालय सुट्टीच्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी  रविवारी सुरू राहणार

पालघर(प्रतिनिधी) दि २३-दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते . दसऱ्याच्या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा , तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा . याकरीता राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालये । उप प्रादेशिक परिवहन कार्यालये रविवार दिनांक २५.१०.२०२० या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवणे आवश्यक असलेबाबत मा . परिवहन उप आयुक्त , परिवहन आयुक्त कार्यालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रं .१८७ / संकीर्ण ४६२० / का .८ ( ९ ) / वाहन नोंदणी / २०२० / जा.क्रं .८७७१ , दि .२३.१०.२०२० अन्वये कळविण्यात आलेले आहे . त्यानुसार दिनांक २५.१०.२०२० रोजी वाहन नोंदणीचे व त्या आनुषंगिक कर वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्यात आलेले आहे .असे उपपरिवहन अधिकारी वसई यांनी कळविले आहे

*तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार प्राप्त*

*तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार प्राप्त*
    पालघर (निलेश भोईर)सन २०१९-२० मध्ये  आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या कायाकल्प कार्यक्रमात जिल्हयातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्रे यांनी
सहभाग नोंदवला होता. 
त्यातून प्रा.आ.केंद्र तलवाडा, ता.विक्रमगड ९०.००% गुण मिळवून जिल्हयातुन प्रथम
पारितोषिक प्राप्त झाले आहे.

आरोग्य संस्थांचा दर्जा वाढविणे करिता राष्ट्रिय आरोग्य अभियांनातर्गत गुणवत्ता
आश्वासन कार्यक्रम राबविला जातो. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत, आरोग्य संस्थामार्फत
स्वच्छता व संक्रमण नियंत्रण पध्दतीचा उपयोग वाढविण्यासाठी कायाकल्प कार्यक्रम अंतर्गत
विविध आरोग्य संस्थाचे मुल्यांकन केले जाते कायाकल्प योजनेअंतर्गत विजेता संस्था राष्ट्रिय
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम करिता नामनिर्देशीत केले जातात.
राष्ट्रिय गुणवत्ता आश्वसन कार्यक्रमांतर्गत या पूर्वी जिल्ह्यातील दोन संस्था प्रा.आ.कंद्र,घोलवड व प्रा.आ.केंद, जामसर यांना राष्ट्रिय मानांकन प्राप्त झाले आहे.

कायाकल्प कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय जिल्हा स्तरीय मुल्यांकनात पतंगशहा
कुटीर रुग्णालय, जव्हार यास ७३.३०% गुण प्राप्त झाले असून उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला
आहे.
प्रा.आ.केंद्र नांदगाव- ८१.१०%, साकुर-७८.१०%, साखरशेत ७३.३०% ता.जव्हार,  व प्रा.आ.केंद्र आमगाव, ता.तलासरी ७ ०.८०% गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त
झाले आहे.

राष्ट्रिय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०२०-२१ राष्ट्रिय मुल्यांकनाकरिता वरिल सर्व
विजेता प्रा.आ.केंद्राचे नामनिर्देशन राज्यस्तरावरुन करण्यात आले आहे.
सर्व विजेता संस्थाचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचे  अभिनंदन करून पुढिल वाटचाली साठी आरोग्य समिती सभापती निलेश सांबरे , मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Thursday, October 22, 2020

*केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश*

*केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश*

 *अलिबाग(जगधिश घरत)जि.रायगड,:-*  केंद्र व राज्य शासनामार्फत सामाजिक घटकांच्या सर्वागिण विकासासाठी वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या अनेक योजना संबंधित प्रशासकीय विभागामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचे निकष, लाभार्थी निवड, अनुज्ञेय लाभ व तत्सम बाबींची माहिती सहज, सुलभ व एकत्रित स्वरुपात तयार करुन ग्रामस्तरापर्यंत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
        त्यांनी दिलेल्या निर्देशात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या योजना व अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांची निश्चिती करावी, संबंधित विभागाकडून सदर योजनाबाबतचे शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचना संकलित कराव्यात. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती व इतर विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांच्या स्तरावर स्वतंत्र " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करावी, कार्यवाही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांसाठी स्वतंत्ररित्या वर्ग 1 दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, " मार्गदर्शिका पुस्तिके " चा प्रारुप मसुदा ऑक्टोबर, 2020 अखेर तयार करुन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड यांच्या कार्यालयाकडे विचारविनिमयासाठी सादर करावा, तद्नंतर साधारणत: दि.15 नाव्हेंबर, 2020 पूर्वी या " मार्गदर्शिका पुस्तिकांची " छपाई संबंधित विभागाच्या स्तरावर पूर्ण करण्यात यावी, “ मार्गदर्शिका पुस्तिकांच्या " प्रती जिल्हास्तर, उपविभागस्तर, तालुकास्तर व ग्रामस्तर कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, तसेच ही पुस्तिका जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका व संबंधित विभागांच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

नाशिक पंचवटी रामकुंड येथील *"साई किरण धाम"* यांनी पाळलाय 4 पिढ्यांपासून अन्नदानाचा वसा. -प्रतिनिधी / निलेश भोईर

नाशिक पंचवटी रामकुंड येथील *"साई किरण धाम"* यांनी पाळलाय 4 पिढ्यांपासून अन्नदानाचा वसा.

 प्रतिनिधी / निलेश भोईर

प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी नाशिक येथे पंचवटी रामकुंड परिसर, प्राचीन कपालेश्वर महादेव मंदिर व प्राचीन गंगा-गोदावरी माता मंदिर यांना लागूनच असलेल्या "साई किरण धाम" श्री साईबाबा मंदिर येथे होत असलेल्या साई भंडारा व सामाजिक सेवा कार्याची आमच्या चॅनेल ने घेतली दखल. 

       नाशिक जिल्ह्यातील पंचवटी रामकुंड या परिसरात गोरगरीब, वयोवृद्ध, पर्यटक,  भाविक,   भिक मागून उदरनिर्वाह करणारे व आपली जीवन उपजीविका भागवण्यासाठी एक वेळ अन्न कसे मिळेल कायम  या चिंतेत असणाऱ्या गरजूंसाठी "साई किरण धाम" एक आशेचा किरण ठरत आहे. 
 येथील साई मंदिरात शिर्डी प्रमाणे साई आरतीच्या सर्व वेळांचे  नियमित पालन करण्यात येते.

 या संस्थेतर्फे मोफत अन्नदानाचा कार्यक्रम दररोज  सकाळी 7 वा. साईबाबांच्या आरती नंतर चहा,
 9 वाजता फराळ, दु.12 वा.आरतीनंतर जेवण व संध्या. 7 वाजेच्या आरतीनंतर उपस्थितांना दूध व पाव मोफत वाटप केले जाते. 
पंचवटी येथे पूरसदृश परिस्थिती मध्ये सुद्धा साई किरण धाम व त्यांचे सेवेकरी आपले कर्तव्य बजावत असतात व अन्नदान सेवा सुरूच ठेवतात. 
वर्षाचे 365 दिवस या संस्थेचे  सेवाकार्य  व नित्यक्रम असाच अखंडित सुरू असतो. 
           संपूर्ण  राज्यात कोरोना महामारी चे प्रचंड मोठे संकट ओढवले असताना या परिस्थितीत गरीब व गरजू यांना एक वेळचे अन्न मिळवणे कठीण झाले होते,  अशा वेळी साई किरण धाम सेवेकरी मंडळ यांच्या वतीने अन्नाचे पाकिट व किराणा सामान  ठिकठीकाणी जाऊन गरीब व गरजूंना वाटप करण्यात आले आणि  मंदिराच्या परिसरात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून दररोज साई भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात आले. 
        "साई किरण धाम" यांच्या या सामाजिक कार्याची दखल नाशिक महानगर पालिकेतर्फे सुद्धा घेण्यात आली व संस्थेचे संचालक श्री मनोहरदासजी उदासी, महंत श्री हितेशदासजी उदासी व  सर्व सेवाधारी कार्यकर्ते यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे सन्मानपूर्वक  गौरविण्यात आले व गौरव पत्र देण्यात आले.
https://youtu.be/_EHlxOQOC8s

*मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा*

*मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा*
   पालघर (निलेश भोईर) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, सिद्धाराम सालीमठ यांच्या
अध्यक्षतेखाली दि.२१/१०/२०२० रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा बैठक पार पडली.विक्रमगड व तलासरी तालुक्यातील कामांचा आढावा यावेळी  घेण्यात आला.

सदर आढावा बैठकीमध्ये सन २०२०.२१ च्या मंजूर आराखड्यातील प्रलंबित कामांचा शेल्फ तयार करून त्यावर किती मनुष्य दिवस
निर्मिती करता येईल किती मजुरांना किती दिवस काम देता येईल या बाबत
ग्रामपंचायत निह्मय आढावा घेतला.तसेच सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील
पुरवणी आराखडा व सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे नियोजन आराखडा
बाबत शासन वेळापत्रकांना केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून मजुरांना
स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येउन कोणताही मजुर
स्थलांतर होणार नाही, अशा गामपंचायतीना सूचना देण्यात आल्या. 

ग्रामपंचायत यंत्रणाकडील अपूर्ण कामे तात्काळ पुर्ण करण्या बाबत  मा.मुख्य
कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर यांनी सूचना दिल्या.
सदर आढावा बैठकीस  उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत विभाग),  तहसील कार्यालय विक्रमगड,  गट विकास अधिकारी, सहा. गटविकास अधिकारी, खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, October 20, 2020

महाराष्ट्र सरकारशी आधीच चर्चा झालेली असताना ऐनवेळी रेल्वेकडून नकारघंटा कशासाठी*

*महाराष्ट्र  सरकारशी आधीच चर्चा झालेली असताना ऐनवेळी रेल्वेकडून नकारघंटा कशासाठी*

पालघर (रवि राठोड)२० ऑक्टोबर:
पश्चिम रेल्वेची उपनगरी लोकल सेवा  , मध्य रेल्वे हरबर व उपनगरी रेल्वेचे रुट ह्या  भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास महाराष्ट्र  सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे.   राज्य सरकार,  व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून हा प्रवास महिलांना करता येणार होता व त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार हे माहित असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वे आधीकाऱ्यानी यांनी महिलांना दिले पाहिजे अशी मागणी शिवसेना पालघर सहसम न्वयक केदार काळे ह्यानी मेल द्वारा व पत्राद्वारे रेल्वे मंत्री व पश्चिम रेल्वे जनरल मॅनेजर  ह्यांच्या कडे केली आहे . केली आहे.
महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात आधीच बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होऊन वेळही निश्चित करण्यात आली होती. राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले. पण आता रेल्वे विभाग हा रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणे देऊन वेळकाढूपणा का करत आहे. चर्चा झाल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाची परवानगी का घेतली गेली नाही. तसेच हा निर्णय आधीच घेतला गेला असल्याने रेल्वेचे सीटीपीएम स्वतःच्या अधिकारात हा निर्णय घेऊ शकतात. 
रेल्वेमंत्री हे मुंबईचे आहेत,  त्यांनाही मुंबईतील लोकल प्रश्नासंदर्भात लक्ष द्यावे अशी विनंती केदार काळे ह्यानी आपल्या पत्रात केली आहे .

*पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील प्रदुषण नियंत्रणासाठी यंत्रणांनी समन्वयातून परिणामकारक कामगीरी करावी* - *पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश*

*पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील प्रदुषण नियंत्रणासाठी यंत्रणांनी समन्वयातून परिणामकारक कामगीरी करावी*                                                 - *पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश*
               मुंबई(निलेश भोईर), दि. 20 : बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगीरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषणपातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

            पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रीया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

            श्री. भुसे यावेळी म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी समन्वयातून ही कामगीरी करताना ते  प्रत्यक्षात दिसले पाहिजे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतांनाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरीता वृक्षारोपणानी मोहिम हाती घेण्याची सूचना देखील श्री. भुसे यांनी यावेळी केली .

पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील प्रदुषण नियंत्रणासाठी यंत्रणांनी समन्वयातून परिणामकारक कामगीरी करावी*

*पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील प्रदुषण नियंत्रणासाठी यंत्रणांनी समन्वयातून परिणामकारक कामगीरी करावी*                                                 - *पालकमंत्री दादाजी भुसे यांचे(निलेश भोईर) निर्देश*
               मुंबई, दि. 20 : बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगीरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषणपातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

            पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रीया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

            श्री. भुसे यावेळी म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी समन्वयातून ही कामगीरी करताना ते  प्रत्यक्षात दिसले पाहिजे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतांनाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरीता वृक्षारोपणानी मोहिम हाती घेण्याची सूचना देखील श्री. भुसे यांनी यावेळी केली .

वाहन योग्यता प्रमाणपत्र चाचणी कोट्या मध्ये वाढ*

*वाहन योग्यता प्रमाणपत्र चाचणी कोट्या मध्ये वाढ*

पालघर( निलेश भोईर)दि.20 :- , उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथे कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून  परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्र पओका/संगणक/करोना/२०२०/जा.क्र ४५१५ दिनांक १६/०५/२०२० च्या आदेशान्वये वाहन योग्यता प्रमाणपत्र चाचणी टॅक्सी करिता -५, प्रवासी वाहन (हलके/मध्यम/जड ) करिता -५, अॅटोरिक्षा करिता - ५, जडवाहन ( मध्यम/जड ) -४० हलके मालवाहतूक वाहन - ३० याप्रमाणे कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीनुसार कोटा पध्दती ठेवण्यात आलेली होती. 

कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती नियमती केल्यामुळे या कामासाठी पूर्वी ठेवण्यात आलेल्या जडवाहन ( मध्यम/जड ) या कोटापध्दतीमध्ये दिनांक १९/१०/२०२० पासून कार्यालयीन वेळेत खालील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे. 

अॅटोरिक्षा - २५ 

तरी याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई तर्फ उप प्रादेशिक परिवन अधिकारी श्री दशरथ वाघुले यांनी केले आहे.

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- २०.१०.२०२०वार :- मंगळवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- २०.१०.२०२०
वार   :- मंगळवार


● सुधारित नागरिकत्व कायदा देशात लवकरच लागू होणार, कोरोनामुळं झाला उशीर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची माहिती 

● रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घ्या! पंतप्रधान मोदी यांचा सल्ला; म्हैसूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

● सध्या देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ७२ हजार असली तरी, फेब्रुवारीपर्यंत फक्त ४० हजार उपचाराधीन रुग्ण असतील; केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा अंदाज  

● राज्यात दिवसभरात ५ हजार ९८४ नवे कोरोना रुग्ण; रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के; मागील २४ तासांमध्ये १२५ जणांचा मृत्यू

● कोरोना काळात नांदेड येथील गुरुद्वाराने दसरा मिरवणुकीची परवानगी मागितली असून त्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) घ्यावा : सर्वोच्च न्यायालय 

● मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस; स्पष्टीकरण मागितले 

● हवाई दलाच्या MI-३५  हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; डीआरडीओ आणि हवाई दलाची संयुक्त निर्मिती

● कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार; परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून होणार सुरू

● आयपीएल २०२० : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने विजय

● अभिनेता संजय दत्तनं कॅन्सरला हरवलं : ६१ वर्षांच्या अभिनेत्याचा कॅन्सर झाला बरा, २ महिन्यांपूर्वी होती चौथी स्टेज

*"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आशांद्वारे जिल्ह्यातील ४१६१ व्यक्ती संदर्भित*

दि.१९/१०/२०२०
जि.प.पालघर
*"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आशांद्वारे जिल्ह्यातील ४१६१ व्यक्ती संदर्भित*

  पालघर (प्रतिनिधी):-
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माझे 'कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचा पहिला टप्पा १३ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला असून पालघर जिल्ह्यातील 
 १९२०२६४ लोकसंख्येचा सर्वे करण्यात आला. यात ४७०४५९ घरांची   तपासणी करण्यात आलीं आहे. या सर्वे मध्ये सारी / आयएलआय लक्षणे (सर्दी, ताप लक्षणे) असलेल्या ३९७१ व्यक्ती आढळून आल्या. तर एसपीओ २ पातळी ९५ च्या कमी व्यक्ति ४७२ इतक्या आढळून आल्या आहेत.
२००१५ दिर्घकालीन आजार/कोमॉबीडीटी असलेल्या व्यक्तीआढळून आल्या.
सर्वेक्षणा दरम्यान आशाद्वारे संदर्भित व्यक्ति ४१६१ व्यक्तींना संदर्भित करण्यात आले. 
अशी आकडेकरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणातून निश्चित केली आहे.
दि.१६ऑक्टोबर पासून या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात आले.

    जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व  लोकप्रतिनिधींच्या  उपस्थितीत विविध ठिकाणी व तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आले.

त्यापूर्वी दि.१८ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद यांची संयुक्त पत्रकार परिषदतेच्या माध्यमातुन आवाहन करण्यात आले.
 कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर आरोग्य अधिकारी व आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कलापथकाव्दारे जनजागृतीकरण्यात आली.
वारली भाषेत Posters & Banners प्रसिध्द करण्यात आले.
वारली पेंटिंग द्वारे जनजागृती करणे,
जिल्हयातील सर्व शैक्षणिक संस्था यांच्याव्दारे e-learning क्लासच्या
माध्यमातुन विदयार्थ्यांमध्ये जनजागृती करणे,
रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती होण्यासाठी Covid Care Centre
(CCC) मध्ये पोस्टर लावणे तसेच
Bank व ATM केंद्राच्या ठिकाणी Posters & Banners लावण्यात आले.

 तर तालुकास्तरावरील देखील अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.

*वाडा* तालुक्यात"सिध्दिविनायक प्रोडक्शन" च्या सहकार्याने चित्रफित
(Short Film) प्रसारित करण्यात आली. महिला आर्थिक विकास
महामंडळ (माआविम) च्या माध्यमातुन जनजागृती व मास्कचे वाटप
करण्यात आले.

*पालघर*- मध्ये"उमेद" (महाराष्ट्र ग्रामिण जिवनोन्नती) माऊली महिला
ग्रामसंघ, भिमनगर व आरोग्य विभाग यांच्या द्वारे सन्माननिय
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जनजागृती व प्रभातफेरी काढण्यात
आल्या.

*विक्रमगड* दादडे येथे सन्माननिय अध्यक्ष जि.प. पालघर यांच्या
उपस्थितीत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व
जव्हार येथील कला पथकामार्फत पथनाटय सादर करण्यात आले.

*मोखाडा* तालुक्यात"समर्थ" कलापथकाच्या माध्यमातुन गावोगावी जावून
जनजागृती करण्यात आली.

*आशांद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेत ६३६५ व्यक्तींची त रॅपिड अँटीजन आणि RTPCR चाचणी करण्यात आली त्यात ६६९ कोव्हीड बाधित आढळून आल्या. या मोहिमेत सम्पूर्ण आरोग्य विभाग तसेच आशांचा  महत्वपूर्ण  सहभाग आहे.*

Sunday, October 18, 2020

*महिला आर्थिक विकास महामंडळाला महिला* सशक्तीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करू*विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

,*महिला आर्थिक विकास महामंडळाला महिला* सशक्तीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करू*
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ 



पालघर (प्रतिनिधी) दि. 17  : महिला आर्थिक विकास महामंडळला महिला सशक्तीकारणासाठी योजनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करू असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झीरवळ यांनी केले.                     पालघर जिल्हातील जव्हार येथे  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमच्या जव्हार येथील क्षेत्रीय समन्वयक कार्यालयाचे उद्घाटन श्री झीरवळ यांचे हस्ते झाले त्यावेळी माविमच्या कार्याचे कौतुक करताना ते बोलत होते. सदर कार्यक्रमात "तेजश्री फायनान्सिअल सव्हिंसेस या योजनेंतर्गत ५० गरजू व अतिगरीब ultra poor महिलांना  श्री झीरवळ तसेच पालघर चे खासदार राजेंद्र गावित, आमदार  सुनील भूसारा, आमदार  हिरामणजी खोसकर, जव्हार न पचे नगराध्यक्ष  चंद्रकांत उर्फ भिकुशेठ पटेल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. वेळी पालघर जिल्हात माविम ने केलेल्या कार्यअहवालाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करणायत आले. पालघर जी. प. चे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, जव्हार प्रकल्प अधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार श्री शिंदे, जी. प. सदस्य सुनिता धूम, माजी जी प. सदस्य  अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष कांचन  चुंबळे, जव्हार न. प. नगर सेविका संगीता आहिरे, स्वाती सोनावणे, हर्षदा तामोरे, जयश्री चव्हाण, रश्मीन मणियार, कमल कुवरा, वैभव अभ्यंकर, दीपक कांगणे, माजी नगरसेवक चित्रांगण घोलप, तसेच प्रकाशजी चुंबळे, तालुका संघटक व माजी नगरसेविका संगीता जाधव, मनीषा वाणी,  शलाका आयरे यांच्यासह विविध शासकीय पदाधिकारी व महिलावर्ग सोशल distansing चे नियम पाळून  उपस्थित होत्या.

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा पालघर द्वारा सुरु असलेल्या एनयुएलएम कार्यक्रम अंतर्गत माविम क्षेत्रीय/ शहर स्तर संघ कार्यालय व महिला करिता विविध प्रशिक्षण सुरु करण्यासाठी जव्हार नगर परिषदे कडून हॉल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर जागेची नवीन पत्रा टाकून दुरस्ती करून देण्याचे निर्देश अध्यक्ष नगर परिषद जव्हार यांनी दिले. तेजश्री अंतर्गत वारली चित्रित साडी निर्मिती उद्योग माहेर लोक संचालित साधन केंद्र च्या माध्यातुन सुरु करण्यात येत आहे. या करीता आयुष संस्थे द्वारा वारली चित्र प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आले.खासदार  श्री गावित यांनी महामंडळानी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन व क्षमता निर्माण करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी श्रीमती ज्योतीताई यांचे खंबीर नेतृत्वात वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन केले,

 आमदार सुनील भूसारा  यांनी माविम ने विक्रमगड व मोखाडा तालुक्यात तेजश्री कार्यक्रमाची सुरवात करावी, या कार्यालया साठी आवश्यक साहित्य व गाव पातळीवर फिरण्यासाठी वाहन व इतर आवश्यक सर्व मदत करण्यात येईल असे प्रतिादन केले. आमदार  हिरामण खोसकर यांनी महिलांना १० हजार ऐवजी २५००० रुपयाची कर्ज उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन केले.  अध्यक्ष माविम ज्योती  ठाकरे  यानी मझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन महाराष्ट्रातील गोर गरीब महिलांचे प्रश्न सोडविण्याचे जबाबदारी दिली त्यास मी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र ये देशातील एकमेव राज्य आहे जिथे अति गरीब महिलांना केवळ ७० पैसे मासिक व्याज दराने उपजीविके करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महामंडळाला इतर महामंडळा प्रमाणे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना महिलांच्या बचतीच्या माध्यमातून विकास प्रक्रिया महिला पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न माविम गेली ४५ वर्ष पासून करीत आहे. असे प्रतिपादन ज्योती ठाकरे यांनी केले.

माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अरविंद गोरे यांनी तर सूत्र संचालन योगिता चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अजित पाटील व्यवस्थापक बाडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता श्रीमती निकीता भोईर व्यवस्थापक माहेर लोक संचालित साचन केंद्र, कंचाड, श्री प्रीतेश पाटील एम आय एस सल्लागार, श्रीमती आशा कोटींना क्षेत्रीय समन्वयक जव्हार, श्रीमती उर्मिला भोईर. व इतर सर्व संबधीतानी सहकार्य केले

आरोग्य कर्मचारी आरोग्य चिंचणि यांनी केली करो नावर मात*************************

आरोग्य कर्मचारी आरोग्य चिंचणि यांनी केली करो नावर मात
*************************

बोईसर (प्रतिनिधी)प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचनी तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे आरोग्य सहाय्यक ह्या पदावर कार्यरत आहे. 17 ऑगस्ट 20 रोजी माझी  corona test positive आली. SDH डहाणू येथे त्याच दिवशी डॉ गायकवाड यांनी अ‍ॅडमिट केले त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होता, दम लागत होता Spo2 80 होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लगेच मला Tima hospital bhoisar येथे admit केले. HRCT मध्ये जवळपास 80% फुफ्फुस बाधीत आहेत असे report मध्ये सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी मला डॉ दयानंद सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, डॉ मिलिंद चव्हाण सर, डॉ सागर पाटील सर, डॉ प्रांजली पाटील मॅडम, डॉ मुळीक मॅडम यांनी  Goldenpark hospital वसई येथे admit केले. तेथील डॉ. Pistonji malcolum यांनी मोलाचे सहकार्य केले. माझ्या शरीराची जगण्यासाठी झुंज चालू होती. ICU मध्ये असताना दुसर्‍या दिवशी च्या स्कॅन मध्ये देखील फारशी improvement नव्हती माझी तब्येत अजूनच खालावली Spo2 50-60 पर्यंत कमी झाला होता, श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यानंतर  प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ देवेंद्र पाटील यांनी तात्काळ आयुर्वेदिक औषधे चालू केली.  औषधे चालू केल्यानंतर Spo2 वाढू लागला, श्वास घेण्यास होणारा त्रास हळूहळू कमी होवू लागला व स्कॅन मध्ये फुफ्फुसामधील infection कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मला ICU मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले परंतु माझ्यासोबत अ‍ॅडमिट झालेले रुग्ण ICU मध्येच मृत्यूशी झुंज देत होते व त्यातील 3 रुग्णांचा माझ्यासमोर मृत्यू देखील झाला होता. अजूनही मी पूर्णतः आजारातून बाहेर आलो नाही 90% आजार कमी झाला असला तरी 10% अजून बाकी आहे. यातून मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की काळजी घ्या, मास्क चा वापर करा, बाहेरून आल्यावर हात साबनाने  धुवा,  एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा  व शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा. कारण ही वेळ माझ्यावर आली तशी कोणावरही येवू नये. यात मला मदत करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वानेरे मॅडम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण सर, डॉ सागर पाटील सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप गाडेकर सर,  गट विकास अधिकारी श्री भरक्षे , डॉ प्रांजली पाटील, डॉ सुषमा मुळीक, वैद्यकीय अधिकारी डॉ गायकवाड यांनी माझ्या साठी कोरोनावर इंजेक्शन आणून दिले त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे तसेच ज्यांनी मला मृत्युच्या दारातून बाहेर काढले ते डॉ pistonji malcolum व डॉ देवेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी आशागड ता. डहाणू यांचा मी सदैव ऋणी राहील. तसेच अनवधानाने कोणाचे नाव घ्यायला विसरलो असेल तर त्याबद्दल क्षमस्व. मी श्री विश्वावती आयुर्वेदिक चिकित्सालय  कोल्हापूर व वैद्यराज श्री समीर जमदग्नी पुणे यांचे संशोधित "रस माधव काढा" हे औषध नियमित सेवन करत होतो व त्यासोबत ICU मध्ये असताना डॉ देवेंद्र पाटील यांनी दिलेली  औषधी घेत होतो. पण म्हणतात ना, कान हे सोनारा कडून टोचून घ्यावे त्याप्रमाणेच  औषधे ही डॉक्टरांन कडूनच घ्या. यातून मी शासनास एकच सांगू इच्छितो की आधुनिक शास्त्र व आपले शाश्वत आयुर्वेद शास्त्र यांची सांगड घालून corona रुग्णांवर उपचार करावे व माझा असा ठाम विश्वास आहे की नक्कीच राज्याचा मृत्यूदर हा कमी आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद... 
आपलाच 
श्री लक्ष्मण गायकवाड आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी ता. डहाणू जिल्हा पालघर

Saturday, October 17, 2020

,*महिला आर्थिक विकास महामंडळाला महिला* सशक्तीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करू*

,*महिला आर्थिक विकास महामंडळाला महिला* सशक्तीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करू*

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ 


पालघर  (निलेश भोईर) दि. 17  : महिला आर्थिक विकास महामंडळला महिला सशक्तीकारणासाठी योजनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करू असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष  नरहरी झीरवळ यांनी केले.                     पालघर जिल्हातील जव्हार येथे  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमच्या जव्हार येथील क्षेत्रीय समन्वयक कार्यालयाचे उद्घाटन श्री झीरवळ यांचे हस्ते झाले त्यावेळी माविमच्या कार्याचे कौतुक करताना ते बोलत होते. सदर कार्यक्रमात "तेजश्री फायनान्सिअल सव्हिंसेस या योजनेंतर्गत ५० गरजू व अतिगरीब ultra poor महिलांना  श्री झीरवळ तसेच पालघर चे खासदार राजेंद्र गावित, आमदार  सुनील भूसारा, आमदार  हिरामणजी खोसकर, जव्हार न पचे नगराध्यक्ष  चंद्रकांत उर्फ भिकुशेठ पटेल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. वेळी पालघर जिल्हात माविम ने केलेल्या कार्यअहवालाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करणायत आले. पालघर जी. प. चे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, जव्हार प्रकल्प अधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार श्री शिंदे, जी. प. सदस्य सुनिता धूम, माजी जी प. सदस्य  अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष कांचन  चुंबळे, जव्हार न. प. नगर सेविका संगीता आहिरे, स्वाती सोनावणे, हर्षदा तामोरे, जयश्री चव्हाण, रश्मीन मणियार, कमल कुवरा, वैभव अभ्यंकर, दीपक कांगणे, माजी नगरसेवक चित्रांगण घोलप, तसेच प्रकाशजी चुंबळे, तालुका संघटक व माजी नगरसेविका संगीता जाधव, मनीषा वाणी,  शलाका आयरे यांच्यासह विविध शासकीय पदाधिकारी व महिलावर्ग सोशल distansing चे नियम पाळून  उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा पालघर द्वारा सुरु असलेल्या एनयुएलएम कार्यक्रम अंतर्गत माविम क्षेत्रीय/ शहर स्तर संघ कार्यालय व महिला करिता विविध प्रशिक्षण सुरु करण्यासाठी जव्हार नगर परिषदे कडून हॉल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर जागेची नवीन पत्रा टाकून दुरस्ती करून देण्याचे निर्देश अध्यक्ष नगर परिषद जव्हार यांनी दिले. तेजश्री अंतर्गत वारली चित्रित साडी निर्मिती उद्योग माहेर लोक संचालित साधन केंद्र च्या माध्यातुन सुरु करण्यात येत आहे. या करीता आयुष संस्थे द्वारा वारली चित्र प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आले.खासदार  श्री गावित यांनी महामंडळानी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन व क्षमता निर्माण करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी श्रीमती ज्योतीताई यांचे खंबीर नेतृत्वात वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन केले,
 आमदार सुनील भूसारा  यांनी माविम ने विक्रमगड व मोखाडा तालुक्यात तेजश्री कार्यक्रमाची सुरवात करावी, या कार्यालया साठी आवश्यक साहित्य व गाव पातळीवर फिरण्यासाठी वाहन व इतर आवश्यक सर्व मदत करण्यात येईल असे प्रतिादन केले. आमदार  हिरामण खोसकर यांनी महिलांना १० हजार ऐवजी २५००० रुपयाची कर्ज उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन केले.  अध्यक्ष माविम ज्योती  ठाकरे  यानी मझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन महाराष्ट्रातील गोर गरीब महिलांचे प्रश्न सोडविण्याचे जबाबदारी दिली त्यास मी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र ये देशातील एकमेव राज्य आहे जिथे अति गरीब महिलांना केवळ ७० पैसे मासिक व्याज दराने उपजीविके करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महामंडळाला इतर महामंडळा प्रमाणे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना महिलांच्या बचतीच्या माध्यमातून विकास प्रक्रिया महिला पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न माविम गेली ४५ वर्ष पासून करीत आहे. असे प्रतिपादन ज्योती ठाकरे यांनी केले.
माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अरविंद गोरे यांनी तर सूत्र संचालन योगिता चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अजित पाटील व्यवस्थापक बाडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता श्रीमती निकीता भोईर व्यवस्थापक माहेर लोक संचालित साचन केंद्र, कंचाड, श्री प्रीतेश पाटील एम आय एस सल्लागार, श्रीमती आशा कोटींना क्षेत्रीय समन्वयक जव्हार, श्रीमती उर्मिला भोईर. व इतर सर्व संबधीतानी सहकार्य केले

Friday, October 16, 2020

*कोकणातील महसूल, बंदरे, खारजमीन आणि ग्रामविकासाशी संबंधीत विविध प्रश्न जलदगतीने सोडवावेत*

*कोकणातील महसूल, बंदरे, खारजमीन आणि ग्रामविकासाशी संबंधीत विविध प्रश्न जलदगतीने सोडवावेत*
* - राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांचे निर्देश*

मुंबई(प्रतिनिधी), दि. 16 : कोकणातील ग्रामीण भागातील विविध प्रश्न, खारभूमीचे प्रश्न, बंदरे, जेट्टी, मच्छिमारांचे प्रश्न, अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेले नुकसान अशा विविध विषयांच्या अनुषंगाने काल महसूल, ग्रामविकास, बंदरे आणि खारजमीन विकास विभागाचे राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी या चारही विभागांचा आढावा घेतला. कोकणातील सर्व जिल्ह्यातील आमदारांनी सहभागी होत आपापल्या मतदारसंघांचे प्रश्न मांडले. कोकण हा किनारपट्टीचा प्रदेश असून नुकतेच झालेले वादळ आणि अतिवृष्टीमुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन कोकणातील पायाभूत सुविधांची निर्मिती, ग्रामीण पर्यटन, खारभूमी, बंदरे, जेट्टीविषयक प्रश्न जलदगतीने सोडवावेत, असे निर्देश राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी संबंधीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
कोकणातील जेट्टी आणि बंदरांविषयक विविध प्रश्न, सागरमाला योजनेची अंमलबजावणी, सीआरझेडसंबंधीत विविध विषय या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.  

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार सर्वश्री दिपक केसरकर, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, राजन साळवी, वैभव नाईक, दौलत दरोडा, श्रीमती गीता जैन, शेखर निकम, रवींद्र पाठक, श्रीनिवास वनगा, शांताराम मोरे, योगेश कदम, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते आदी मान्यवर उपस्थित होते.     
यावेळी उपस्थित सर्व खासदार, आमदार यांनी त्या त्या भागातील विविध प्रश्न मांडले. नवीन स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा झाली. याबाबत तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. कोकणातील खारभूमीला निधी मिळण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या कामासाठी किमान ३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासाठी पुरसा निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करु, असे राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. वादळ आणि अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक ग्रामीण रस्ते नादुरुस्त झाले आहेत. हे सर्व रस्ते दुरुस्त करुन कोकणातील ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत करणे आवश्यक आहे. याबाबत एक सविस्तर आणि वेगळा प्रस्ताव तयार करुन त्याला वित्त मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर करु, असे त्यांनी सांगितले. कोकण ग्रामीण पर्यटन योजनेसही पुरेसा निधी देऊन कोकणात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले. 

कोकणातील पंचायत समित्या, तहसील कार्यालये यांच्या इमारतींच्या प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा झाली. जनतेचा दररोज संपर्क येणारी ही कार्यालये असून शासनाच्या बहुतांश योजनांची अंमलबजावणी येथूनच होते. त्यामुळे कोकणात आवश्यकतेनुसार पंचायत समित्या तसेच तहसील कार्यालयांची आवश्यक दुरुस्ती किंवा नवीन इमारती देण्याबाबत प्रस्ताव द्यावेत, त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या की, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने बीच शॅक धोरण आणले आहे. यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे. याशिवाय कृषी पर्यटन, इको टुरिजम अशा विविध योजना शासन आणत आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचेही विचाराधीन आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत आदरातिथ्य क्षेत्रासाठी असलेल्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. याशिवाय कोकणाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. ग्रामविकास, महसूल, खारजमिन आणि बंदरे विभागाच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्न त्यांनी यावेळी मांडले.   

कोकणातील रिक्त पदांचा प्रश्न, सिंधुदुर्गातील उपजिल्हा रुग्णालयांचा प्रश्न, कुळवाटीधारकांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, नद्यांमधील गाळ काढणे, विविध घरकुल योजना, वनहक्काची प्रकरणे, प्रधानमंत्री मत्यसंपदा योजना, सागर किनाऱ्यावरिल मच्छिमारांच्या घरांचे सीमांकन करणे, वाढवण बंदराचा प्रश्न अशा विविध विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. 

०००००

 

बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ

बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा
      जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ

पालघर(निलेश भोईर) दि. 16 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समिती पालघर जिल्हा यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातिल बेरोजगार उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता शासनाच्या विविध कर्ज योजना, सवलती याबाबत विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आपल्या योजनेची माहिती ऑनलाईन देणार आहेत. तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, ITI, तसेच इतर शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांनी आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समिती पालघर यांनी केले आहे. 
मिटींगसाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये मध्ये जाऊन CISCO WEBEX MEETINGS हे App डाऊन लोड करावे. या ऑनलाईन वेबिनारचा आयडी 1704995503 व पासवर्ड 12345 हा आहे. 
*************

*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित*

*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित*

*नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंचा जबरदस्त पाठपुरावा*

अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जगधिश घरत) :- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012  च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली हाेती. 
     त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं.75/1अ, क्षेत्र 17-10-14 हे.आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हे.आर. व 3-50-00 हे.आर. या सरकारी गुरचरण, ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या आहेत.  
     तसेच मौजे ऊसर  येथील सर्व्हे नं.75/1क, क्षेत्र 07-50-40 हे.आर.मधील 4-00-44 हे.आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनीही शासनजमा करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.
     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे अलिबाग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या कार्यवाहीस चांगलीच गती प्राप्त झाली आहे. यामुळे बराच काळ प्रतिक्षेत असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होईल.
     
०००००

Thursday, October 15, 2020

*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित*

*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित*

*नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंचा जबरदस्त पाठपुरावा*

अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जगधिश घरत) :- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012  च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली हाेती. 
     त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं.75/1अ, क्षेत्र 17-10-14 हे.आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हे.आर. व 3-50-00 हे.आर. या सरकारी गुरचरण, ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या आहेत.  
     तसेच मौजे ऊसर  येथील सर्व्हे नं.75/1क, क्षेत्र 07-50-40 हे.आर.मधील 4-00-44 हे.आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनीही शासनजमा करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.
     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे अलिबाग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या कार्यवाहीस चांगलीच गती प्राप्त झाली आहे. यामुळे बराच काळ प्रतिक्षेत असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होईल.
     
०००००

*हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत तीन दिवस विविध उपक्रम*

*हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत तीन दिवस विविध उपक्रम*

 पालघर (निलेश भोईर) १५ ऑक्टोबर या जागतिक हात धुवा दिनानिमित्त पालघर  जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत  सर्व अंगणवाड्यांमध्ये  गाव पाड्यांवर तसेच शहरी  भागात विविध उपक्रम राबवण्यात आले.
 
   जि.प.अध्यक्ष भारती कामडी , उपाध्यक्ष निलेश सांबरे सर्व जि.प.सभापती, उपसभापती, जि.प.सदस्य ,पं.समिती सभापती, उपसभापती, सदस्य,सरपंच इ लोकप्रतिनिधींनी   या उपक्रमात सहभाग घेऊन स्वच्छता राखून कोरोना वर मात करूया याबाबत जनजागृती केली.१३,१४ व १५ ऑक्टोबर हे तीन दिवस यानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले.

महिला व बालकल्याण सभापती अनुजा ठाकरे महिला यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली  'स्वच्छ हात धुवा' मोहीम राबवण्यात आली.
 
पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी
विषयावर "हात धुवा दिवस" निमित्ताने गाणे तयार करणे, गायणे तसेच वेगवेगळया 
गटाकरिता हात धुण्याचे महत्व सांगणे, प्रात्यक्षिके करुन दाखविणे व केलेल्या कामाचे 2 मिनिटाच्या व्हिडीओ चे
चित्रीकरण करणे,
बालकांची काळजी घेण्यासाठी हात धुण्याचे महत्व समजावून सांगणे,
हात धुण्याची योग्य वेळ, हात धुण्याच्या पद्धती,
कोविड १९ व हात धुणे यांचा संबंध इ बद्दल बालकांना समजावून सांगणे या गोष्टींचा समावेश या मोहिमेत आहे.त्यानुसार सर्व अंगणवाड्यामध्ये सदर बाबींचे
बाल मैत्रीपुर्ण पोस्टर्स  तयार करून यात  आई व बालकाचे हात धुणे,
मुलांचे मलमुत्र हाताळयानंतर हात धुणे यावर जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत किशोरवयीन मुलांमुलींसाठी ठिकठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंणवाडी मध्ये
हात धुण्यासाठी व्यवस्था असल्याबाबत खात्री करणे व ग्रामपंचायत कडून नियमित
साबण व लिक्वीड साबण उपलब्ध करून घेणे,
अंगणवाडीच्या आवारातील हैण्ड वॉशिंग स्टेशनची माहीती, साफसफाई व आवश्यकतेनुसार दुरूस्ती करणे. इ बाबी जबाबदारीने सांभाळल्या.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी कोविड
कालावधीमधे योग्य अंतर राखून व तोंडाला मास्क वापरून लाभार्थ्यांना महत्व
समजावून सांगून  सोशल मीडीयादवारे फोटो घेवून गावातील घराघरापर्यंत
Handwashing ghar ghar हॅशटॅगसह पोस्ट करून या मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यात आली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गरोदर माता, स्तनदा माता, किशोर वयीन मुली. यांना हात धुण्याबद्दल प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
अंगणवाडीमध्ये येणारी बालके, पालक यांना प्रात्यक्षिके करुन दाखिविणे, व्हिडीयो दाखवणे  चित्रे दाखविणे उपक्रम जिल्हाभरात राबवण्यात आले अशी माहिती 
प्रविण भावसार
जिल्हा कार्यक्रम अधिकारी 
महिला व बालविकास यांनी दिली आहे.

*सी आय एस एफ , तारापुर द्वारे कोविड-19 विरोधात लढण्यासाठी घेतली प्रतिज्ञा*

*सी आय एस एफ , तारापुर  द्वारे कोविड-19 विरोधात लढण्यासाठी घेतली प्रतिज्ञा*           
                              पालघर(निलेश भोईर)दि 14 :  प्रधानमंत्री यांनी जनतेला  कोविड-19 महामारिच्या विरोधात एकजुटिने  लढण्याचे आव्हान केले आहे। त्या अनुषांगने , सी आय एस एफ , तारापुर  द्वारे कोविड-19 जागरूकता साठी सी आय एस एफ चे कमांडेंट श्री एस डी आर्य तथा  बल सदस्य, संरक्षिका सदस्या, मुले यांनी सामाजिक  अंतराच्या नियमांचे पालन करून सी आय एस एफ कॉलोनी मधे लहान लहान ग्रुप  मधे वेगवेगळ्या जागेवर तथा घरी कोविड-19 संबंधित योग्य वागणुकीची प्रतीज्ञा घेतली।
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी आई एस एफ ) ही तारापुर अनुउर्जा प्रकल्पच्या सुरक्षितेकरिता कार्यरत आहे। आणि 24x 7 सुरक्षितेकरिता  तत्पर आहे।
या शपथ समारोह मधे एकूण 
2 राजपत्रित अधिकारी ,
48 अधिनस्त अधिकारी ,
161 अन्य पद ,
33 पारिवारिक सदस्य यांनी शपथ घेतली.

16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थाराखण्यासाठी मनाई आदेश लागू

16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था
राखण्यासाठी मनाई आदेश लागू

पालघर(रवि राठोड) दि. 14 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दि.17 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होणार असून दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा सण आहे. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.

तरी पालघर जिल्ह्यात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये धार्मिक मिरवणूका व कार्यक्रमांना वगळून दि. 16 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे.

1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,
2) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे,
6) ज्यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.

सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशानुसार अगर कर्तव्य किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही.
असे अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.
********

मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पालघर(निलेश भोईर) दि. 14 :- दिनांक 14/10/2020 रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल त्यामुळे दिनांक 16/10/2020 पासून पुढील 3 दिवस मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जे मच्छिमार समुद्रामध्ये आहेत त्यांनी दिनांक 15/10/2020 पर्यंत बंदरामध्ये सुरक्षित ठिकाणी यावे असा इशारा दिलेला आहे. तरी, पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे.
**********

*'दिलखुलास' कार्यक्रमात; ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’**या विषयावर सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुलाखत*

*'दिलखुलास' कार्यक्रमात; ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’*

*या विषयावर सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुलाखत*

 

       मुंबई,(प्रतिनिधी) दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  या कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरूवार दिनांक 15 ऑक्टोबर व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         या मुलाखतीत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे महत्व, वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषा विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात आलेला अभिवाचन  हा उपक्रम, प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर एक लेखक म्हणून असलेली आवड, आपल्या वाचनाची प्रेरणा, वाचनाचे बदलते स्वरूप, ऑडिओ बुक तसेच सोशल मिडिया व वाचन, गझल बरोबरच ललित लेखन, कथासंग्रह, विनोदी लेखसंग्रह, शायरी, बोधकथा, कविता व गद्य लेखन कुळकायद्यातील घरठाण हक्क, उर्दू बाबतही लिखाणाची प्रेरणा,चौफेर वाचन, शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे याविषयी सविस्तर माहिती सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.

                                                               ***********

डफडा-बजावो आंदोलन प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार

डफडा-बजावो आंदोलन प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार
पालघर (निलेश भोईर)महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी माजी खासदार व आमदार हरिभाऊ राठोड  यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजा तर्फे १५ ऑक्टोबर २० रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण ( जिल्हा व तालुका पातळीवर) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे  *"डफडा- बजावो आंदोलन"* करण्यात आले त्याच अनुषंगाने राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हाध्यक्ष अतुल राठोड यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालया समोर डफडा वाजवत
१)बंजारा समाजाला (एस.टी.) अनुसूचित जमातीचे आरक्षण( ७% वरून १४% वाढवून त्याचे सबकॅटागराझेशन करून) देण्यात यावे. २) क्रिमीलेयर ची अट रद्द करणे ३) बढतीमधील आरक्षण ४) वसंतराव नाईक तांडा-सुधार योजना ५) राज्यातील संपूर्ण तांडयास महसुली दर्जा ६) भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला, राष्ट्रीय भाषा सुचीत दर्जा देणेबाबत
 मागण्याचे निवेदन देण्यात आले (विमुक्त-भटक्या) समाजाच्या   अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्यातील १.२५ कोटी  बंजारा / विमुक्त-भटक्या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सदर मागण्या मंजूर न झाल्यास गोर बंजारा समाज आपले आंदोलन तीव्र करणार असल्याचे रवी राठोड प्रदेश संघटक राष्ट्रीय बंजारा टायगर्स व गोर बंजारा सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदू राठोड यांनी सांगितले आहे
यावेळी  ओम साई दत्त विकलांग सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष देविदास राठोड,शिवसेना बंजारा समाज जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, गोर सेना तालुका अध्यक्ष सुनील राठोड, राष्ट्रीय बंजारा टायगर्स सचिव राम चव्हाण,प्रकाश चव्हाण, संपत चव्हाण, संजय राठोड व इतर समाजबांधव उपस्थित होते

*पालघर जिल्हा काॅंग्रेस कमिटी व पालघर तालुका काॅंग्रेस कमिटी * जिल्हा पालघर *"शेतकरी कामगार विरोधी काळ्या कायद्याचा निषेध"*

*पालघर जिल्हा काॅंग्रेस कमिटी व
 पालघर तालुका काॅंग्रेस कमिटी * जिल्हा पालघर
 *"शेतकरी कामगार विरोधी काळ्या कायद्याचा निषेध"* 
      पालघर(रवि राठोड)               शेतकरी कामगार विरोधी कायदा पारित करणे आधी केन्द्रातील मोदी शासनानी आपल्याच देशातील कोणत्याही राज्यशासनाशी, राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही संबधीत संघटनाशी कोणत्याही प्रकारची चर्चा अगर संवाद सुद्धा साधण नाही. 
       अशा प्रकारे लोकशाही संसदीय मुल्य व परंपरा यांचा कोणत्याही प्रकारचा मुलाहीजा न ठेवता केवळ पाशवी बहुमताच्या जोरावर हा शेतकरी कामगार विरोधी कायदा पारित केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वताच्या मालकीच्या जमिनी ह्या आपल्याच राहतील  किंवा नाही ह्याची कोणालाच हमी देता येणार नाही.तसेच हंगामी कामगारांचे तर सोडाच पण कायम स्वरूपाच्या कामगारांनाही त्या काळ्या कायद्यामुळे त्यांच्या कंपनीच्या मालकांना त्यांना हवे तेव्हा कमी करण्याचा अधिकार राहणार असल्यामुळे आधिच आपल्याकडे बेरोजगारी असतांना ह्या काळ्या कायद्यामुळे बेरोजगारीचा भडका उडुन देशात अशांतता निर्माण होऊन चो-या मा-या व दरोड्याखोरी वाढीस लागेल व त्यामुळे देशातील अन्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊन त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देशांत अराजकता माजून संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिल.
          त्या करिता या शेतकरी कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात व निषेधार्थ सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन गुरुवार, दिनांक -15 ऑक्टोबर, 2020 रोजी शेतकरी व कामगार यांनी क्रांती संमेलनाचे काँग्रेस पक्षा मार्फत आयोजन केलेले आहे व सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.
        तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी, कामगारांनी व नागरिकांनी या सह्यांच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व शेतकरी, कामगार विरोधी काळया कायद्याचा निषेध नोंदवावा ही आग्रहाची विनंती.
      कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिणीस मा.श्री.राजेश शर्माजी, पालघर जिल्हा प्रभारी मा.श्री.संतोष केनी साहेब, पालघर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री.दिवाकर पाटील, मा.श्री.चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नेते, रुफी भुरे कार्याध्यक्ष, मा.श्री.सिकंदर शेख वरिष्ठ उपाध्यक्ष, मीडिया सेल अध्यक्ष मा. श्री.रोशन पाटील, महिला अध्यक्षा सौ.मनिषा सावे, तालुका अध्यक्ष श्री.राजेश अधिकारी, मनोज पाटील, अरविंद क्षत्रिय, मनोहर दांडेकर व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, October 14, 2020

दि. 14 ऑक्टोबर 2020 16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू

दि. 14 ऑक्टोबर 2020 16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू पालघर( निलेश भोईर)दि. 14 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दि.17 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होणार असून दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा सण आहे. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे. तरी पालघर जिल्ह्यात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये धार्मिक मिरवणूका व कार्यक्रमांना वगळून दि. 16 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे. 1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, 2) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, 3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, 4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, 5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, 6) ज्यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे. सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशानुसार अगर कर्तव्य किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे. ********

दि. 14 ऑक्टोबर 2020 मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दि. 14 ऑक्टोबर 2020 मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा पालघर(प्रतिनिधी) दि. 14 :- दिनांक 14/10/2020 रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल त्यामुळे दिनांक 16/10/2020 पासून पुढील 3 दिवस मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जे मच्छिमार समुद्रामध्ये आहेत त्यांनी दिनांक 15/10/2020 पर्यंत बंदरामध्ये सुरक्षित ठिकाणी यावे असा इशारा दिलेला आहे. तरी, पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे. **********

Monday, October 12, 2020

*मुंबईतील वीज खंडित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश*

*मुंबईतील वीज खंडित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश*

*या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सतर्कता बाळगा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

मुंबई,(प्रतिनिधी)दि. १२: मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.

  मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट,  टाटा,  अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. येणाऱ्या चार दिवसात मुसळधार परतीचा पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही वीजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

*वीज खंडित होण्यामागील कारणे :*
1) मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४०० केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या ४०० केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात व तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित १८०० मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.  
2) त्या चार वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही तेथे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 
३) ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम चालू होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. 
४) परंतु, सकाळी १० वाजून १ मिनिटांनी ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे 500 मेगावॅट आणि अदानीचे 250 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला.

अशा घटना सलग क्रमाने घडण्याची शक्यता संभवत नसल्या तरी देखील आज ही घटना घडल्यामुळे आपल्याला यापुढील काळात अधिक सावधानता बाळगावी लागेल तसेच यंत्रणेत आवश्यकता भासल्यास अधिक सुधारणा कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.
000

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :-१३.१०.२०२०वार। :- मंगळवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :-१३.१०.२०२०
वार।    :- मंगळवार

● शाळा बंद असल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा फटका; शाळा बराच काळ बंद असल्याने ३.९१ कोटी मुले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापासून वंचित

● पाकिस्तानपाठोपाठ चीनही एखाद्या मोहिमेचा भाग असल्याप्रमाणे सीमा वाद निर्माण करीत आहे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

● कृषी कायद्यांविरोधातील याचिकांवर न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस; सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या प्रकरणी केंद्र सरकारला ही नोटीस जारी करून चार आठवडय़ात प्रतिसाद मागवला आहे


● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून ट्विट, म्हणाले…"मी उद्या (मंगळवार) सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे"

● जीएसटी भरपाईचा तिढा कायम; वस्तू व सेवा कर नुकसानभरपाईतील तूट कर्जाद्वारे भरून काढण्याच्या पर्यायावर सोमवारी झालेल्या बैठकीतही सहमती होऊ शकली नाही

● राज्यात दिवसभरात ७ हजार ८९ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १५ हजार ६५६ जणांची कोरोनावर मात; राज्याचा रिकव्हरी रेट ८३.४९ टक्क्यांवर पोहचला

● उद्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन

● जगात प्रत्येकी १३० पैकी एक महिला आधुनिक गुलामगिरीचा बळी; संयुक्त राष्ट्राचा धक्कादायक अहवाल

● रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजांपुढे कोलकाता नाईट रायडर्सने घातलं लोटांगण; नाईट रायडर्सचा ८२ धावांनी पराभव करत मिळवला सर्वात मोठा विजय

● बॉलीवूडबाबत बेजबाबदार रिपोर्टिंग करणे वृत्त वाहिन्यांना पडले महागात; अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर आणि इतर ३० प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फ दिले पत्र.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फ दिले पत्र.

पालघर (प्रतिनिधी)पालघर मध्ये आज  जनता पार्टी महिला मोर्चा पालघर जिल्हा या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत या संदर्भात आक्रोश आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा महिला अध्यक्ष सौ ज्योती ताई भोये सरचिटणीस मा रंजना ताई संखे सौ लक्ष्मी देवी हजारी  सरचिटणीस.सौ.गिताजली सावे  अर्चना पाटील .म प्रदेश सदस्य चंदा ताई दुबे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां तसेच भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार पाटील  साहेब .संघठण सरचिटणीस मा.श्री संतोषजी जनाठे सरचिटणीस मा.सुजितजी पाटील पालघर शहर अध्यक्ष मा.श्री. अरुणजी माने बोईसर मंडळ अध्यक्ष श्री. जितेंद्र संखे  युवा मोर्चा अध्यक्ष समीरजी पाटील अनेक पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, October 11, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- १२.१०.२०२०वार। :- सोमवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- १२.१०.२०२०
वार।    :- सोमवार



● कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना; आज हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी

● टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना

● चीनच्या मदतीने पुन्हा कश्मीरात 370 लागू करू, फारुख अब्दुला यांचे वादग्रस्त विधान


● सुन्नी धर्मगुरुची हत्या; इम्रान खान म्हणतात शिया-सुन्नी हिंसाचार घडवण्याचा भारताचा डाव

● यंदापासून बारावीसाठी इंग्रजीची एकच प्रश्नपत्रिका, बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत बंद

● वीज आयोगाच्या चुकीचा ग्राहकांना भुर्दंड, भूमिगत वाहिनीसाठी दुप्पट शुल्क आकारणी

● खुशखबर! रेडमी नोट 9 प्रो मॅक्सची विक्री आज दुपारी 12 वाजेपासून होणार सुरु

● IPL 2020 राजस्थानचा रॉयल विजय, तेवतीया, परागचा झंझावात; हैदराबादचा चौथा पराभव

● महिला टी-20 चॅलेंज, तीन संघांची घोषणा; हरमन, स्मृती, मितालीकडे असणार नेतृत्व

● कंगना रनौत चा आगामी चित्रपट थलाइवी च्या सेटवरील जयललिताचा लूक सोशल मीडियावर व्हायरल

दि.११/१०/२०२०*'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत बक्षीस योजनेत सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन*

दि.११/१०/२०२०

*'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत बक्षीस योजनेत सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन*

    पालघर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील Covid-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत बक्षीस योजना आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये निबंध, म्हणी, शॉर्ट फिल्म, पोस्टर्स इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्ती यांच्यासाठी ही योजना लागू असेल. तरी या मोहिमेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन covid-19 बाबत जनजागृती करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.सालीमठ यांनी केले आहे.

     विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरीय  आणि आमदार मतदारसंघ  स्तरावर ढाल आणि रोख रक्कम  बक्षीस म्हणून देण्यात येईल. 
पहिले बक्षीस अनुक्रमे  ५,००० आणि ३,००० दुसरे बक्षीस ३,००० आणि २,००० तर  तिसरे बक्षीस २,००० आणि १,००० अशा स्वरूपाचे असेल  भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी कोव्हीड 19 अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावरील साहित्य त्यांच्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे दि.२०/१०/२०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावे.
     अशी माहिती पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.