Thursday, October 15, 2020

*हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत तीन दिवस विविध उपक्रम*

*हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत तीन दिवस विविध उपक्रम*

 पालघर (निलेश भोईर) १५ ऑक्टोबर या जागतिक हात धुवा दिनानिमित्त पालघर  जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत  सर्व अंगणवाड्यांमध्ये  गाव पाड्यांवर तसेच शहरी  भागात विविध उपक्रम राबवण्यात आले.
 
   जि.प.अध्यक्ष भारती कामडी , उपाध्यक्ष निलेश सांबरे सर्व जि.प.सभापती, उपसभापती, जि.प.सदस्य ,पं.समिती सभापती, उपसभापती, सदस्य,सरपंच इ लोकप्रतिनिधींनी   या उपक्रमात सहभाग घेऊन स्वच्छता राखून कोरोना वर मात करूया याबाबत जनजागृती केली.१३,१४ व १५ ऑक्टोबर हे तीन दिवस यानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले.

महिला व बालकल्याण सभापती अनुजा ठाकरे महिला यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली  'स्वच्छ हात धुवा' मोहीम राबवण्यात आली.
 
पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी
विषयावर "हात धुवा दिवस" निमित्ताने गाणे तयार करणे, गायणे तसेच वेगवेगळया 
गटाकरिता हात धुण्याचे महत्व सांगणे, प्रात्यक्षिके करुन दाखविणे व केलेल्या कामाचे 2 मिनिटाच्या व्हिडीओ चे
चित्रीकरण करणे,
बालकांची काळजी घेण्यासाठी हात धुण्याचे महत्व समजावून सांगणे,
हात धुण्याची योग्य वेळ, हात धुण्याच्या पद्धती,
कोविड १९ व हात धुणे यांचा संबंध इ बद्दल बालकांना समजावून सांगणे या गोष्टींचा समावेश या मोहिमेत आहे.त्यानुसार सर्व अंगणवाड्यामध्ये सदर बाबींचे
बाल मैत्रीपुर्ण पोस्टर्स  तयार करून यात  आई व बालकाचे हात धुणे,
मुलांचे मलमुत्र हाताळयानंतर हात धुणे यावर जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत किशोरवयीन मुलांमुलींसाठी ठिकठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंणवाडी मध्ये
हात धुण्यासाठी व्यवस्था असल्याबाबत खात्री करणे व ग्रामपंचायत कडून नियमित
साबण व लिक्वीड साबण उपलब्ध करून घेणे,
अंगणवाडीच्या आवारातील हैण्ड वॉशिंग स्टेशनची माहीती, साफसफाई व आवश्यकतेनुसार दुरूस्ती करणे. इ बाबी जबाबदारीने सांभाळल्या.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी कोविड
कालावधीमधे योग्य अंतर राखून व तोंडाला मास्क वापरून लाभार्थ्यांना महत्व
समजावून सांगून  सोशल मीडीयादवारे फोटो घेवून गावातील घराघरापर्यंत
Handwashing ghar ghar हॅशटॅगसह पोस्ट करून या मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यात आली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गरोदर माता, स्तनदा माता, किशोर वयीन मुली. यांना हात धुण्याबद्दल प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
अंगणवाडीमध्ये येणारी बालके, पालक यांना प्रात्यक्षिके करुन दाखिविणे, व्हिडीयो दाखवणे  चित्रे दाखविणे उपक्रम जिल्हाभरात राबवण्यात आले अशी माहिती 
प्रविण भावसार
जिल्हा कार्यक्रम अधिकारी 
महिला व बालविकास यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment