Thursday, October 15, 2020

डफडा-बजावो आंदोलन प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार

डफडा-बजावो आंदोलन प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार
पालघर (निलेश भोईर)महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी माजी खासदार व आमदार हरिभाऊ राठोड  यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजा तर्फे १५ ऑक्टोबर २० रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण ( जिल्हा व तालुका पातळीवर) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे  *"डफडा- बजावो आंदोलन"* करण्यात आले त्याच अनुषंगाने राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हाध्यक्ष अतुल राठोड यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालया समोर डफडा वाजवत
१)बंजारा समाजाला (एस.टी.) अनुसूचित जमातीचे आरक्षण( ७% वरून १४% वाढवून त्याचे सबकॅटागराझेशन करून) देण्यात यावे. २) क्रिमीलेयर ची अट रद्द करणे ३) बढतीमधील आरक्षण ४) वसंतराव नाईक तांडा-सुधार योजना ५) राज्यातील संपूर्ण तांडयास महसुली दर्जा ६) भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला, राष्ट्रीय भाषा सुचीत दर्जा देणेबाबत
 मागण्याचे निवेदन देण्यात आले (विमुक्त-भटक्या) समाजाच्या   अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्यातील १.२५ कोटी  बंजारा / विमुक्त-भटक्या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सदर मागण्या मंजूर न झाल्यास गोर बंजारा समाज आपले आंदोलन तीव्र करणार असल्याचे रवी राठोड प्रदेश संघटक राष्ट्रीय बंजारा टायगर्स व गोर बंजारा सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदू राठोड यांनी सांगितले आहे
यावेळी  ओम साई दत्त विकलांग सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष देविदास राठोड,शिवसेना बंजारा समाज जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, गोर सेना तालुका अध्यक्ष सुनील राठोड, राष्ट्रीय बंजारा टायगर्स सचिव राम चव्हाण,प्रकाश चव्हाण, संपत चव्हाण, संजय राठोड व इतर समाजबांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment