Sunday, September 13, 2020

ज्वेलर्सवाल्यावर कोयत्याने वार करून दागिने लुटणारे १० मिनिटांत गजाआडकासारवडवली पोलिसांची जबरदस्त कारवाई

ज्वेलर्सवाल्यावर कोयत्याने वार करून दागिने लुटणारे १० मिनिटांत गजाआड
कासारवडवली पोलिसांची जबरदस्त कारवाई

 भिवंडी (गिरीष देव)  भरदुपारी ज्वेलर्स दुकानात इसमावर कोयत्याने वार करून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटून पळालेल्या दरोडेखोरांपैकी दोघांना अवघ्या १० मिनिटात गजाआड करण्यात आले. ही जबरदस्त कारवाई कासारवडली पोलिसांनी केली. या कारवाईत दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, २ भलेमोठे कोयते, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे शिक्के असा एकूण ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कासारवडली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
  क्राईम सूत्र न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील आनंद नगर परिसरात राकेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास २ इसम दुकानात शिरले. त्यावेळी त्यांचे २ साथीदार दुकानाबाहेर उभे राहिले. दुकानात असलेल्या सुरेशकुमार जैन (५६) यांच्यावर धारदार कोत्याने वार करून दरोडेखोरांनी दागिने पळवले. दरम्यान या घटनेची माहिती प्राप्त होताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना बिनतारी संदेश धाडून सतर्क केले. माहिती प्राप्त होताच पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या १० मिनिटांत २ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. 
   ताब्यात घेण्यात आलेल्या दरोडेखोरांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे हर्षल मेश्राम(२३), दिनेश पवार (२५) सांगितली. कारवाईदरम्यान या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, २ भलेमोठे कोयते, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे शिक्के असा एकूण ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी पळालेल्या साथीदारांची माहिती दिली असून, त्यानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे करत आहेत. 
    या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, उपायुक्त एस. एस. बुरसे, वतर्क विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज क्षीरसाठ, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक रत्ने, हवालदार अंकुश पाटील, हवालदार आर. एस. चौधरी, हवालदार एस. बी. खरात, हवालदार चंद्रकांत गायकवाड, हवालदार वीरकर, पोलीस नाईक आर. एस. महापुरे, पोलीस नाईक पी. आर. तायडे, पोलीस नाईक प्रवीण घोडके, पोलीस नाईक महेंद्र लिंगाळे, पोलीस नाईक पवार, पोलीस नाईक आर. आर. रावते, आदी पथकाने केली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...