*प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडयावरील प्राप्त लेखी सूचना, हरकती बाबत 30 सप्टेंबर रोजी जनसुनावणी*
पालघर (विशेष प्रतिनिधी)दि 28 : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजी नवीन सिआरझेड (CRZ) अधिसुचना, २०१९ जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्याचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडयावरील प्राप्त लेखी सूचना /हरकतीच्या नोंदविण्यासाठी दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन (online) व तिवारी रंगमंच, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात येणार आहे. कोव्हीड-१९ ची पार्श्वभूमी विचारात घेता, दिनांक ३०/०९/२०२० रोजीच्या जनसुनावणी करिता ज्यांना लेखी हरकती/ सूचना द्यावयाच्या असतील त्यांचेकरिता वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त
संबंधित तालुक्यांचे तहसिल कार्यालयात दिनांक ३०/०९/२०२० रोजी सादर करता येतील. त्यानुसार
तहसिलदार पालघर, वसई, डहाणू व तलासरी यांना दिनांक ३०/०९/२०२० रोजी लेखी हरकती/सूचना
स्विकारणेबाबत कळविणेत आले आहे. तसेच सूचना व हरकती 1) collectorpalghar@gmail.com ,
Prothane@mpcb.gov.in. 3) srotarapur2ompcb.gov.in हया Email id वर पाठविता येतील.
No comments:
Post a Comment