Monday, August 31, 2020

पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी(PM SVANidhi)

दिनांक :-31 ऑगस्ट 2020
पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी(PM SVANidhi)
योजनेचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि. 31 :- कोविड-19 चा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये(Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला असल्यामुळे पथविक्रेत्यांना खेळते भांडवल पतपुरवटा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता असून केंद्र शासन पुरस्कृत ' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi)' पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल रूपये 10,000/- कर्ज स्वरूपात बँकेकडून विनातारण कर्ज उपलब्ध केले जाणार आहे .तरी या योजनेचा  पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका निगरपरिषदा/नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
सदर योजना दि. 24 मार्च 2020 रोजी व त्यापुर्वी शहरांमध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू असून, विहित कालावधीमध्ये किंवा तत्पुर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. सदर कर्जावर RBI च्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहतील. पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये किंवा तत्पुर्वी कर्जाची परतफेड केल्यास 7% व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. तसेच सदर योजनेमध्ये डिजीटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना 1200/- रूपयेपर्यंत कॅशबॅकची सुविधाही देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पथविक्रेत्यांनी Online अर्ज www.pmsvanidhi.mohua.gov.in  या संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या CSC केंद्र, नागरी सुविधा केंद्र, सेतु सुविधा केंद्र यांच्याद्वारे अर्ज करू शकतात. सदर योजनेसाठी मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधारकार्ड, बँक पासबूक व इतर अनुषंगिक कागदपत्रे आवश्यक असतील. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिली आहे.
******************

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...