Monday, September 27, 2021

लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* *यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ

*लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* 
*यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ
भिवंडी दी.२७(किशोर पाटील)पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाच्या स्व.सौ.पुष्पलता जाधव सभागृहात *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड*  यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्षा व विद्यालयाच्या माजी प्राचार्या *श्रीमती अरुणा प्रकाश जाधव मॅडम* उपस्थित होत्या. यावेळी लायन्स क्लब ठाणे प्राईड यांचे वतीने  *प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स देवरतन डागा व्हाईस प्रेसिडेंट लायन्स क्लब ठाणे प्राईड – लायन्स स्वाती माधुरवार लायन्स क्लब सचिव – लायन्स अविनाश जाधव लायन्स सल्लागार – लायन्स तेजंद्रजी सिंग  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर - लायन्स लोनकरन टावरी*
*1st व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर –लायन्स मुकेश तनेजा*
*2nd व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर – लायन्स ए.के. शर्मा डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ( ग्लोबल सर्विस टीम) – लायन्स मनीष लाडगे रिजन को-ऑरडीनेटर* *(रिजन-6 ) -लायन्स सीमा लाडगे*  हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.ओ. माळी सर* यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यालय व संस्था संचालित शाळा व महाविद्यालयातून सुमारे ३० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात ५०℅ विद्यार्थ्यांनीची संख्या आहे. *लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड किशोरवयीन मुलींसाठी राबवित असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून* यामुळे आमच्या विद्यालयात वेगवेगळ्या समाज स्तरातून येऊन शिक्षण घेत असलेल्या किशोरवयीन मुलींना या सुविधांचा लाभ होईल.विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या सोयी सुविधांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यामुळे आज भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यालयाची तीन मजली टोलेजंग इमारत उभी असून ४ था मजला बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.समाजातील आपल्या सारख्या दानशूर संस्थाची आम्हाला याकामी सहकार्याची अपेक्षा असून आपल्या कडून आम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या प्रस्ताविकाचा समारोप केला. 
   लायन्स क्लब ऑफ  ठाणे संस्थेच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्था उपाध्यक्षा श्रीमती अरुणा जाधव मॅडम यांचे सोबत संपूर्ण शाळेची पाहणी केली व विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबववीत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब ह्या संस्थेच्या वतीने समाजासाठी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
समारंभ अध्यक्षा *श्रीमती अरुणा जाधव मॅडम* यांनी लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड यांनी विद्यालयातील  किशोर वयीन मुलींसाठी  3 सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यापुढेही संस्थेला मदतीचे सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्याना केले.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कासकर मॅडम यांनी केले व उपस्थित पाहुण्यांचे आभार सौ.नीलिमा जाधव मॅडम* यांनी मानले.

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी!
प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड
अकोले :-किशोर पाटील
महाविद्यालयीन जिवनात घरोघरी वृत्तपत्र वाटप करणारा मुलगा अपारक जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर थेट केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या आर्थिक विभाग संचालक पदावर पोहचतो, हे स्वप्न कि एखाद्या चित्रपटाची कहानी वाटत असली तरी ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ (बीबी) येथील रहिवासी असलेले प्रा. नरेश बोडखे यांनी ही किमया साकारली आहे.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट मधील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड झाली.
कुंबेफळ (बिबी) या गावापासून डॉ. नरेश बोडखे यांचा प्रवास सुरू झाला. आई - वडील शेतकरी, पावसावर आधारीत बेभरवशाची शेती असल्याने घरची परिस्थिती बेताची त्यामुळे प्रगतीसाठी शिक्षण हेच एकमेव साधन ही बाब त्यांनी हेरली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात झाले. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून महाविद्यालयीन जीवनात हॉटेल मध्ये काम करून आणि घरोघरी वृत्तपत्र वितरणाचे काम करुन डॉ. नरेश बोडखे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यात जालन्यातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदवीनंतर पुणे विद्यापिठातून अर्थशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते सेट-नेट  उत्तीर्ण झाले आणि वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुंबई मधील चेतना महाविद्यायात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांची भारतातील अर्थशास्त्राचे पाहिले व नामांकित विद्यापीठ असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याचे 20 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट बनवले. केळकर समितीमध्ये आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प निर्मिती मध्येही त्यांनी काही काळ सहभाग नोंदवला आहे. इथेच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. याबरोबरच अनेक प्रकल्पांवर संशोधन करतानाच विद्यार्थी घडविण्याचं बहुमुल्य कार्य देखील सुरू ठेवले. दरम्यान त्यांची आता केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र आता देश पातळीवर काम करणार आहे. हॉटेलमध्ये काम करणारा, घरोघरी वृत्तपत्र वाटणारा मुलगा एवढ्या उच्च पातळीवर केवळ जिद्द आणि शिक्षणामुळेच पोहचू शकतो त्यामुळे ग्रामीण युवकांची शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन ते नेहमी करतात आणि त्यासाठी युवकांना नेहमी प्रोत्साहीत देखील करत राहतात, त्यांच्या या नियुक्तीने मातृतीर्थ तालुक्याची मान उंचावली आहे........

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदलाठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षदयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा!

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
दयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा! 
शाहपुर दि,२७(किशोर पाटील) सोमवार दि‌नांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंद ला पाठिंबा देत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन केले.हे कायदे शेतकरी हिताचे नसून मूठभर धन दांडगे,उद्योगपती यांच्या फायद्याचे असुन यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे.त्यामुळे या कायद्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाले आहेत.शेतक-यांनी उभारलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे  शहापुर येथे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा,शहापुर काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, बहुजन विकास आघाडी योगेश हजारे तसेच प्रहार संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday, September 25, 2021

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.

इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.


      पालघर (प्रतिनिधी)    पालघर जिल्ह्यातील डाॅ. स्मिता सुधिर माळवदे यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
            सामाजिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर काम करत असताना आपल्या आजूबाजूला उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्याचे कार्य निर्वाण फाऊंडेशन आयोजित नाशिक येथे " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" च्या पहिल्या सीजनचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
               या कार्यक्रमात आपल्या पालघर जिल्ह्यातील सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथील शिक्षिका डॉ. स्मिता सुधिर माळवदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.
             या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. निलेश आंबेडकर हे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पा अवस्थी, आफ्रिकन स्काॅलर मा. संनासी बायडोन, नाशिक जिल्हा क्षयरोग तज्ञ डॉ. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे, संस्थेच्या ट्रस्टी विमलताई बोढारे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
               या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना " इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१" या पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्लॅक लेडी ट्राॅफी, सन्मानपत्र, गोल्डन मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्वाण फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

दिनांक : 25.09.2021

 _*वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !*_ 
नवी मुंबई- किशोर पाटिल
 *‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घ्या -* हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावनी

   ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारी जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक   या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटना या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी आम्ही निदर्शने केली आहेत. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडची ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रूम समोर निदर्शने केली, त्या वेळी ते बोलत होते.

  या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदू धर्मप्रेमींंनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ही जाहिरात मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.
 
  ‘मान्यवर’ने प्रसारीत केलेल्या जाहिरातीतून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुळात अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नाही, याउलट आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते.   फॅशन्स लि. कंपनीनेे अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत करून दाखवावी. ‘मान्यवर’ ब्रँडची जाहिरात मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही डॉ. धुरी यावेळी म्हणाले,

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद
भिवंडी दि.२५ (कशोर पाटिल)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रदेश स्तरावरून सक्षम बुथ बांधणीच्या सूचना देऊन आल्याने काँग्रेसचे मतदार संपर्क अंतर्गत बुथ बांधणी अभियान सुरू केले असून भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने बुथ बांधणी अभियान सुरू केले असून मुंबई-नाशिक महामार्गावरील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या कार्यालयात नुकतीच बुथ बांधणी अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध तालुक्यात बुथ बांधणी अभियान सुरू आहे त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुका या संदर्भात देखील चर्चासत्र सुरू आहेत.भिवंडी ग्रामीण बुथ बांधणी अभियाना दरम्यान काँग्रेस ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष शरद ठाकरे,ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड,भिवंडी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईर, ठाणे ग्रामीण सचिव सुधाकर ईताडकर, ज्येष्ठ नेते बि.डी पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेळके,सोशल मिडीया अध्यक्ष ज्ञानेश्वर हुकमाळी, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष संजय गायकवाड,ठाणे जिल्हा ग्रामीण मूबीसर पटेल,अध्यक्ष ओबीसी विभाग भिवंडी संतोष ठाकरे,ज्येष्ठ नेते नरेश माळी,ज्येष्ठ नेते शोराब गुजर,अध्यक्ष ओबीसी अशोक पालकर, अशोक मुरूडकर मायनॉरिटी तालुका अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर

*स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर*
ग्रामीण प्रतिनिधी..

दुसखेडा येथे स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन संचलित गीतांजली आरोग्यम हॉस्पिटल येथे महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.डॉ.विक्रांत सोनार (एम.बी.एस. एम.डी )स्त्री रोग तज्ञ आणि वाकचौरे वन  नरसिंग चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने तापी परिसरातील 90 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात मुख्य:त महिलांच्या पाळी संदर्भात समस्या, पांढरे पाणी जाणे,पोटात दुखणे, कमी रक्तस्राव जास्त रक्तस्त्राव किंवा वारंवार रक्तस्त्राव, पाळीच्या सर्व समस्या, अंडाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या गाठी वर औषध उपचार, वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन व औषधोपचार, वंधत्व निवारण व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसुतीपूर्व व पश्चात औषधोपचार, अति जोखमीचे डिलेवरी व सिझेरियन ऑपरेशन, वयात होणाऱ्या मुलींच्या समस्या / समुपदेशन व औषध उपचार व समुपदेशन तपासणी करून  मार्गदर्शन केले. त्या वेळेस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी  *दिलीपजी सूर्यवंशी साहेब* यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी संस्थेचे कार्य बद्दल माहिती दिली. सूर्यकांत सूर्यवंशी, संदीप कोळी, अरुण सूर्यवंशी, पिंटू राजपूत उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी *विशाल दांडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव ग्राहक संरक्षण फाउंडेशन* यांनी मोलाचे सहकार्य केले.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...