Sunday, August 22, 2021

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांनानाष्टा व मिठाई वाटप

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांनानाष्टा व मिठाई वाटप

कल्याण दि.२३(किशोर पाटील)कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व  कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी रविवार दि.२२/०८/२०२१ रोजी कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना खाऊ,नाष्टा,मिठाई वाटप केली,तसेच ते रोजच ५०० नागरिकांना   कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

मी दाता नसुन समाज्याचा सेवक आहे - डॉ. मनिलाल शिंपीआत्मनिर्भर शिवण मशिन योजने अंतर्गत गरीब गरजु महिलांना शिलाई मशिन चे मोफत वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!

एक शिक्षक मनात ठरवलं तर कोणतेही काम करू शकतो - मच्छिंद्र कदम 
४०शिलाई मशिन देणारा दाता हा आमच्या समाज्याचा आहे हे ऐकुन आमचा आनंद  द्विगुणित झाला- शांताराम सावळे
मी दाता नसुन समाज्याचा सेवक आहे - डॉ. मनिलाल शिंपी
आत्मनिर्भर शिवण मशिन योजने अंतर्गत गरीब गरजु महिलांना 
शिलाई मशिन चे  मोफत वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!

नंदुरबार दि.२३(किशोर  पाटील) अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज  मध्यवर्ती संस्था आयोजित, स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ यांच्या सौजन्याने  शनिवार दि.२१/०८/२०२१ रोजी  जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृह रेस्ट हाऊसच्या मागे नेहरूनगर नंदुरबार,येथे आत्मनिर्भर शिवण मशिन योजने अंतर्गत गरीब गरजु महिलांना
शिलाई मशिन चे मोफत वाटप , विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच कोरोणा काळात चांगले काम करणाऱ्या शिक्षक, महिला समजा सेवीकांचा  हिरकणी पुरस्कार प्रमाणपत्र   देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते  सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज  मध्यवर्ती संस्था मा.श्री.रविंद्र बाबा बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र कदम,श्री.शांताराम बापु सावळे(विश्वस्त अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज  मध्यवर्ती संस्था ) डॉ.श्री. आर एस् पी युनिट ठाणे कमांडर मनिलाल रतीलाल शिंपी, डॉ.श्री.दिनेश बळवंतराय ठक्कर,(अध्यक्ष स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण) मा.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग,आर एस पी अधिकारी श्री. बन्सीलाल महाजन,आर एस पी अधिकारी श्री. घनश्याम सोनवणे, श्री.सुनिल बापू निकुंभ(माजी अध्यक्ष)श्री.संजय खैरनार (राष्ट्रीय सचिव) श्री.विजय कुमार खैरनार, रोहित करटे, जयंत कंन्नरकर, मार्गदर्शक शिंपी समाज , सौ.जोशीला अमर पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या साक्री), सौ.आरती किशोर दुसेजा (साक्री), अहिर शिंपी समाज नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष सावळे,श्री.प्रदीप शिंपी (सचिव)श्री.सोमनाथ शिंपी(नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष)श्री.बळवंत निकुंभ(जिल्हा कोषाध्यक्ष) श्री.योगेश शिंपी(जिल्हा सहसचिव),श्री. लोटन बाविस्कर (जिल्हा कार्यालय प्रमुख)श्री.विजय देवरे (प्रसिद्धीप्रमुख)श्री.पुरुषोत्तम शिंपी उप संपादक नामविश्व, आदी मान्यवर व शिंपी समज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा अध्यक्ष नंदुरबार श्री.सुभाष सावळे,व जिल्हा कार्यकारिणी यांनी केले होते.
सर्वप्रथम ही या कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्यांनी विविध उपक्रम राबऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचे काम करत आहेत.विशेष म्हणजे डॉ.तथा आर एस पी कमांडर ठाणे युनिटश्री. मनीलाल शिंपी हे एक अभ्यासु शिक्षक आहेत.त्यांनी शिक्षक म्हणून काम करीत असताना आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्देश समोर ठेऊन ठाणे जिल्ह्या पासून सुरू केलेले काम आज नंदुरबार जिल्ह्या पर्यंत पोहचविले म्हणून त्यांची आमच्या जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी यथोचित सन्मान केला.व आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था व नंदुरबार जिल्हा अहिर शिंपी समाज यांनी त्यांच्या आई वडिलांसह स्वपत्निक सन्मान करून त्यांच्या कार्याची पावती दिली.म्हणून मी सांगतो की एक शिक्षक मनात ठरवलं तर कोणतेही काम करू शकतो असे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी श्री मच्छिंद्र कदम यांनी यावेळी सांगितले.
मी अनेक वर्षापासून समाजाचे काम करतो व हे काम करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रवींद्र बागुल यांनी समाजातील गरीब गरजु महिलांना शिलाई मशिन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ६१ मशीन त्यांनी वाटप केल्या होत्या त्यांना शंभर चा आकडा पूर्ण करायचा होता ही बातमी डॉ.श्री. मनीलाल शिंपी यांना समजली त्यांनी कोणताही विचार न करता संस्थेशी संपर्क साधला व क्षणार्धात मी ४० मशीन देतो सांगितले.मला जेव्हा हे समजले तेव्हा ४० मशीन देणारा दाता हा आमच्या समाजाचा आहे हे एकूण माझा आनंद द्विगुणित झाला असे विश्वस्थ श्री.शांताराम सावळे यांनी यावेळी सांगितले.
माझ्या आई वडीलांनी मला जे संस्कार दिले,शिकविले त्यामुळे मी इथ पर्यंत आज पोहचलो आहे. त्याच बरोबर माझी पत्नी संगीताने ही  मला सुख दुःखात सहभागी होऊन मोलाची साथ दिली म्हणून हे सामाजिक, शैक्षणिक काम मी करू शकलो.मला या ठिकाणी दाता म्हणून उपाधी दिली असली तरी मी दाता नाही एक सेवक आहे व माझ्या सोबत असलेले श्री.दिनेश भाई ठक्कर,संपादक श्री किशोर पाटील,धर्म सेवक डॉ.सोन्या पाटील,समाजसेवक श्री.रामचंद्र देसले,श्रीधर पाटील हे खरे दाते आहेत.व त्यांच्या सहकार्या मुळेच मी हे आज काम करीत आहे असे यावेळी डॉ. मनीलाल शिंपी यांनी सांगितले.यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र बागुल,माजी अध्यक्ष श्री.सुनिल निकुंभ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर प्रास्ताविक श्री.संजय खैरनार यांनी केले. या कार्यक्रमात डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर यांचाही मान्यवरांच्या शुभ हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  प्रदीप शिंपी यांनी केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था व अहिर शिंपी समाज नंदुरबार जिल्हा यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शिंपी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात ; तीन जण जखमी

भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात ; तीन जण जखमी


भिवंडी दि.२२(किशोर पाटील ) भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या मोठं मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडत आहेत. रविवारी पती व दिड वर्षाच्या मुली सोबत रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अपघात झाल्याची घटना पायगाव येथे दुपारी घडली आहे. या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
सुशीला संदेश गोऱ्हे ( वय २१ ) संदेश गोऱ्हे (२६ ) व त्यांची दिड वर्षांची एक मुलगी वैभवी असे खड्ड्यांमुळे जखमी झालेल्यांची नावे असून ते कामण येथील रहिवासी आहेत. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने जखमी सुशीला गोऱ्हे या आपल्या माहेरी पायगाव ब्राम्हणपाडा येथे पती व मुलीसह दुचाकीवरून येत होत्या त्यावेळी पायगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने तिघेही गाडीवरून खाली पडले . झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून तिघांनाही स्थानिकांच्या मदतीने अंजुरफाटा येथील खासगी रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे एक तास जखमी महिला व तिचे पती रस्त्यावरच होते. रुग्णालयात नेण्यासाठी सुप्रीम इन्फ्रा टोल कंपनीची रुग्णवाहिका देखील याठिकाणी अली नव्हती. स्थानिक रिक्षा वाल्याच्या मदतीने हितेश तांगडी यांनी महिला व तिच्या जखमी पतीला खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र जखम जास्तअसल्याने पुढील उपचारासाठी अंजुरफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
              विशेष म्हणजे मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे पुरता दुर्लक्ष असल्याने या रस्त्याची सध्या दुरावस्था होऊन अशा प्रकारचे अपघात रोज घडत आहेत. मागच्या आठवड्यात स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते तर दिन दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा टोल नाका देखील फोडला होता. रस्त्यावर खड्डे असूनही टोल कंपनी टोल वसुली मात्र नियमित करीत असल्याने स्थानिकांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची प्रतिमा ही राज्यातच नव्हेतर देशात चांगली आहे - विश्वासराव आरोटे पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्ष पदी अशोकराव उगले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची 
प्रतिमा ही राज्यातच नव्हेतर देशात चांगली आहे - विश्वासराव आरोटे 
पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्ष पदी अशोकराव उगले.

.

अहमदनगर  - (किशोर पाटील)
 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अशोकराव उगले यांची फेर निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष पदी दत्ता जाधव सर,सचिव पदी अनिल नाईकवाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर संघाचे माजी सचिव विद्याचंद्र सातपुते यांच्या कामाची दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष  पदी नुकताच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
  अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार रामलाल हासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुका कार्यकरिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
      यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे. जिल्हाप्रसिद्दी प्रमुख पदी भाऊसाहेब वाकचौरे , उपाध्यक्ष पदी हरीभाऊ फापाळे, ललित मुतडक, वसंत सोनवणे,सहसचिव पदी दत्ता जाधव (अंबड), खजिनदार पदी सुरेश देशमुख, प्रसिद्धी प्रमुख पदी सुनील शेणकर,संपर्क प्रमुख पदी जगन्नाथ आहेर,तालुका  वृत्तवाहिनी प्रमुख पदी संजय टिकेकर,पत्रकार हल्ला विरोधी प्रमुख पदी शंकर संगारे, सांस्कृतिक प्रकल्प प्रमुख पदी निलेश वाकचौरे,शैक्षणिक प्रकल्प प्रमुख पदी सचिन लगड, सोशल मिडिया प्रमुख पदी गणेश रेवगडे,मुळा विभाग प्रमुख भागवत खोल्लम  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 यावेळी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार रामलाल हासे व हरीभाऊ आवारी यांची निवड करण्यात आली.तर कायदेविषयक सल्लागार म्हणून ऍड.राम भांगरे व ऍड.भुषण आवारी यांची निवड करण्यात आली.
    यावेळी राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की, तालुक्यातील सर्व पत्रकार हे आपलेच असून कोणालाही दुखविण्याचा प्रयत्न करू नये.राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची 
प्रतिमा ही राज्यातच नव्हेतर देशात चांगली आहे. पत्रकार संघाच्या प्रयत्नाने राज्यात पत्रकार संरक्षण कायदा संमत झाला आहे.कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्या 325 पत्रकारांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याचे ठरले आहे.त्यामद्धे तो कोणत्या पत्रकार संघाचा सदस्य आहे असा संकुचित विचार केलेला नाही.पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे.तर पत्रकार संघाच्या सदस्यांचा अपघाती विमा 
उतरविण्यात आला आहे,व बाकी सदस्यांचा लवकरच अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. पत्रकार संघाच्या  विविध कार्याचा आढावा घेत श्री आरोटे यांनी तालुका कार्यकारिणीने विभागवार उपक्रमाचे आयोजन करावे,दरमहा मीटिंग घेऊन त्याच दिवशी एखाद्या शाळेला काही मदत करता येईल का याचे ही नियोजन करावे.सर्वाना ओळखपत्र देण्यात यावे.टीका करण्याकडे लक्ष न देता आपले काम करीत राहावे. कामातूनच टीकाकारांना उत्तर द्यावे.
 असे आवाहन केले
 यावेळी सर्व पदाधिकारी यांचा शाल,गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी जेष्ठ पत्रकार हेमंतआवारी,निलेश भागडे,ओंकार अस्वले,भागवत खोल्लम,निलेश सहाणे,रजिस्टर निखिल भांगरे हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब  वाकचौरे यांनी मानले.

Friday, August 20, 2021

महाड पोलादपूर माणगाव चाकरमान्यांची दरडग्रस्त बांधवांना आर्थिक मदत


महाड पोलादपूर माणगाव चाकरमान्यांची दरडग्रस्त बांधवांना आर्थिक मदत

पोलादपूर (प्रतिनिधी)२२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे महाड मधील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे या गावालगतच्या डोंगरांना तडे जाऊन भूसख्खलन झाल्याने या तीन गावातील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी झाले होते. हे वृत्त मुंबईत समजल्यानंतर महाड पोलादपूर माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तातडीने समाज भावनेने एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालेल्या दोन्ही तालुक्यात तातडीच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणेशी संपर्क साधला होता. त्यानंतर दरडग्रस्त मदतनिधी संकलन समितीची स्थापन करून या आपद्ग्रस्तांसाठी मुंबई, ठाणे येथील चाकरमान्यांच्या कडून आर्थिक मदतीचे संकलन केले होते.  प्रत्येक घरात जाऊन 
त्याचे वाटप गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१  रोजी करण्यात आले. 
तळीये येथील ३०, केवनाळे येथील १३, तर साखर सुतारवाडी येथील १३ कुटुंबे तसेच इतर ६ कुटुंबे अशा एकूण ६२ कुटुंबांना एकूण अकरा लाख दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप तसेच केवनाळे गावातील १४ वर्षीय पाय गमावलेली खेळाडू साक्षी दाभेकरला सुद्धा महाडचे विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मदत करण्यात आली. तर साखर गावातील दरडग्रस्त मुलगी चव्हाण या मुलीच्या लग्नाचे दागिने वाहून गेल्याने संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देत तिच्या लग्नाची जबाबदारी महाडचे किंजलोळी खुर्द भालेकर कोंड गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी घेतली. 
शासनाने घोषित केलेल्या गावांच्या पुनर्वसनासह, फार मोठया प्रमाणात शेतीचे व रस्त्यांचे नुकसान झालेल्या पोलादपूर तालुक्यासाठी पाचशे कोटी सरकारने द्यावेत अशी मागणी 
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते जितू सावंत, सुभाष पवार, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे, किशोर जाधव, इक्बाल चांदले, बळीराम घाग, प्रमोद गोगावले, एकनाथ सुकूम, कृष्णा कदम, निलेश अहिरे, दिलीप जाधव, तुळशीराम पोळ, रमेश शिर्के, बाजीराव मालुसरे, विनोद पार्टे, चंद्रकांत सालेकर, गेणू मालुसरे, उद्योजक संजय उतेकर, राम साळवी, राम गोळे, लक्ष्मण मोरे,  अनिल मालुसरे, अनिल दळवी
पत्रकार प्रकाश कदम, पत्रकार निलेश मोरे इत्यादी उपस्थित होते

तारापूर येथे मोहर्रम शांततापूर्ण वातावरणात साजरा

तारापूर येथे मोहर्रम शांततापूर्ण वातावरणात साजरा     
       
       बोईसर:(प्रतिनिधी) इराकची राजधानी बगदादपासून१०० की. मी. उत्तर पूर्व दिशेला कर्बला हे एक छोटेसे गांव आहे. यथे इस्लामिक चळवळीचे ऐतिहासिक युद्ध झाले ज्याने इस्लाम धर्माच्या चेहरा मोहराच बदलून टाकला.हिजरी सवंतच्या(ईस्लामिक वर्ष) पहीला महीना म्हणजे मोहर्रम . मोहर्रमच्या १० तारखेला ( १० मोहर्रम ६१ हिजरी अर्थात इ. स.६८० मध्ये ) मोहम्मद पैगंबर साहेब (स.अ.) यांचे नातू हजरत हुसैन यांना कर्बला येथे यजीद यांचा साथीदारांनी युद्ध भूमीवर सायंकाळी असर ची नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन हे सजदा मधे गेले ( माथा टेकून नमाज मध्ये झूकणे ) तेव्हा यजीदच्या सैन्यांनी हीच संधी साधून हजरत हूसैन यांच्या गळ्यावर धोक्याने वार केले यात हजरत हूसैन शहीद झाले.  तो दिवस म्हणजे यौमे आशूरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांचा वीर मरनाच्या स्मृतिमध्ये मुस्लिम बांधव मोहर्रम साजरा करतात. सत्यासाठी आपले व आपल्या कूटूंबियाचे बलिदान देणाय्रा  ईस्लाम  धर्माचे मोहम्मद पैगंबर साहेब (स.अ.)यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांचा आठवणी साठी पूर्ण देशात ठिकठिकाणी धार्मिक प्रवचन होते .इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी मोहर्रम निमित्ताने मोहर्रमच्या १० दिवस तारापुर गावातील रफाई मोहल्ला झेंडा चौक ,गवंडी मोहल्ला ,तेलीवाड़ा ,ताज्या मोहल्ला, हुसैनी टेकडी,  कादरी मोहल्ला, येथे मजलिसच्या कार्यक्रम तर पटणी  मोहल्यात हजरत इमाम हुसैन यांची आठवण म्हणून प्रवचनाच्या कार्यक्रम होतो. मोहर्रम सणां निमित्ताने तारापूर मोहल्ल्यात मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मूस्लीम जमातचे अध्यक्ष वसिम पूनावाला,ताजूद्दीन मूल्ला,नासरुद्दीन सोपारकर,मिस्बा गवंडी,अब्दूल्ला सोपारकर, राजू पटनी,नासिर कौलारिकर,मूफीद गवंडी,नौशाद सैनिल्ला, बल्लू दमणवाला,मूश्ताक पटणी,सुलेमान शेख,शहेबाज शेख, रफिक शेख , शकील गवंडी,नासिर शेख गोरेगांव,सह मान्यवर उपस्थित होते.

पालघर शहरात करोना विरुध्द जनजागृती करीत, नगराध्यक्षा व्दारा मास्क वाटप

पालघर शहरात करोना विरुध्द जनजागृती करीत, नगराध्यक्षा व्दारा मास्क वाटप 

पालघर ( हिरालाल लोखंडे ) दोन वर्षा पासून सुरू असलेल्या करोना रूपी महामारीच्या, पहिल्या लाटे नंतर लोक सावध होत असताना, करोना विरूध्द लढण्यासाठी करोनाच्या नियमांचे स्वतः पालन करून इतरांनाही पालन करण्यासाठी, समजवू सांगत असतानाच, करोनाच्या दुसर्‍या लाटेची सुरवात झाली. स्थानिक प्रशासन पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर, नर्स,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सेवाभावी पणे सेवा देणारे खाजगी डॉक्टर यांच्या अथांग प्रयत्नातून, करोना महामारी आता थोडीशी कमी झालेली आहे. 
     आपणास अजुनही काही दिवस तरी, करोना तिसरी लाट येऊ नये म्हणून व तिला थोपवून ठेवण्यासाठी, आपल्या सर्वांनाच खबरदारी घेतली पाहीजे व ती घेणे फारच गरजेचे आहे. विशेषतः १८ वर्ष पेक्षा कमी वयाच्या तरूण वर्गाला व लहान मुलांना करोना प्रतिबंधक लस दिलेली नाही.  त्यांना / त्यांची सर्वात जास्त खबरदारी घेणे जरूरीचे आहे. 
     याकरिता डॉक्टर सौ. उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्षा. श्री केदार काळे - पालघर सांस्कृतिक मित्रमंडळचे अध्यक्ष. यांनी दिनांक २० आॅगस्ट २०२१ रोजी पालघर शहरात अंदाजे १००००/ अक्षरी दहा हजार पेक्षाही जास्त मास्क वाटप करण्याचा संकल्प आहे. तरीही जनतेने पुढीलप्रमाणे   काळजी घ्यावी असे आवाहन डाॅक्टर सौ. उज्ज्वला काळे यांनी केले आहे. 
१) सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. २) गर्दी टाळावी. ३) सोशल डिस्टेशन ( अंतर ) पाळावे. ४) सतत साबणाने हात धुणे किंवा स्यानिटायझर चा वापर करावा. ५) घरी गेल्यानंतर वाफ घ्यावी. ६) १८  वर्षावरील लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ७) आपली रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी ताजे व सकस जीवनसत्त्व युक्त अन्न खावे. ८) करोना सदृश लक्षणे आढळल्यास  त्वरित करोना चाचणी करून घ्यावी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र डाॅक्टर / डाॅक्टर यांना भेटावे. वरिल सुचना करोना प्रतिबंधक लस घेतलेली असली तरीही पाळाव्या. 
     करोना व लाॅकडाऊन यामुळे आपला रोजगार बुडाला आहे, परत लाॅकडाऊन व रोजगार बुडू नये म्हणून काळजी घ्यावी असे श्री केदार काळे यांचे जनतेला सांगणे आहे.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...