Wednesday, May 12, 2021

खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा**राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा*- *कृषीमंत्री दादाजी भुसे*

*खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा*

*राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा*
- *कृषीमंत्री दादाजी भुसे*

मुंबई,(प्रतिनिधी) दि. १२: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांनी वरीष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंद दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे.  
कंपन्यांनी खत पुवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने अलर्ट राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रीक टन खतं मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रीक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरीया ५ लाख ३० हजार मेट्रीक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रीक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रीक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.

लहान मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी पालघर जिल्ह्यात स्पेशल कोविड सेंटर उभारण्याची शिवसेनेची मागणी !*आमदार रविंद्र फाटक यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

*लहान मुलांसाठी व गरोदर महिलांसाठी पालघर जिल्ह्यात स्पेशल कोविड सेंटर उभारण्याची शिवसेनेची मागणी  !*
आमदार रविंद्र फाटक यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन
*पालघर दि. (प्रतिनिधी)* संपूर्ण देशासह पालघर जिल्ह्यातही कोरोना संसार्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना येणाऱ्या काही महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविल्याने लहान मुलांकरिता व गरोदर महिलांकरिता नवीन स्पेशल कोविड सेंटर उभारण्याची मागणी 
आज शिवसेनेच्या माध्यमातून आमदार रविंद्र फाटक यांनी पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ व पालघर जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी श्री सालीमठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली. तसेच आ.फाटक यांनी त्यांचा ५० लाखांचा विशेष आमदार निधी हा पालघर जिल्ह्यातील कोरोना आपत्ती उपाय योजनेकरिता देण्याचे आश्वासन देखील यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले. कोरोनाच्या संसार्गाम्ध्ये पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर अतिशय ताण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे हाल होत असून येणाऱ्या काळात लहान मुलांच्या व गरोदर स्त्रियांची काळजी घेण्याकरिता व उपचारावर जास्त लक्ष केंद्रित करून लहान मुलांसाठी एन.आय.सी.यु. व व्हेनटीलेटर्स, आय.सी.यु. तसेच गायनॅक व पेडियाट्रिक कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करण्याकरिता कार्यवाही सुरु करण्याची मागणी आमदार फाटक यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 
तसेच पालघर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सालीमठ यांना ग्रामीण व आदिवासी भागात लसीकरण संदर्भात जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी केले.
या भेटीदरम्यान  शिवसेना शिष्टमंडळामध्ये पालघर चे आमदार.श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी , जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, महिला जिल्हा संघटक ज्योती मेहेर, तालुकाप्रमुख विकास मोरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, बोईसर विधासभा प्रमुख नीलम संखे,कल्पेश संखे यांच्यासहित जिल्हाशल्य चिकित्सक डॉ राजेंद्र केळकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी तसेच जिल्ह्यातील इतर वैद्यकीय व प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

Tuesday, May 11, 2021

उत्तम आरोग्य ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ह्या करिता खासदार-राजेंद्र गावित ह्यांनी घेतली मा.मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांची भेट

*उत्तम आरोग्य ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ह्या करिता खासदार-राजेंद्र गावित ह्यांनी घेतली मा.मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांची भेट*
पालघर- (प्रतिनिधी)जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी *खासदार गावित* ह्यांनी आज *मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे सो.* यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पालघर मधील आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात तसेच पालघर करिता मुंबई उपनगरा प्रमाणे समान दर्जा, समान वेतन व सुविधा देऊन भिषक, Physicians, भुलतज्ञ    Anesthesiology अशा रिक्त असलेली आत्यावश्क  पदे त्वरित भरावी ह्या करिता मा.मुख्यमंत्री ह्यांना निवेदन देऊन, मा. आरोग्य मंत्री ह्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. 
       त्याच बरोबर पालघर जिल्हा नवीन प्रशासकीय इमारत येथे  ऑक्सिजन, ICU, व व्हेंटिलेटर युक्त सुसज्ज असे कोविड केयर हॉस्पिटल सुरू करावे ह्या संदर्भात *मा. आरोग्य मंत्री  ह्यांनी जिल्हाधिकारी पालघर* ह्यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला.
      पालघर हा आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात नेटवर्क, स्मार्ट फोन , व *कोरोना लसीकरण नोंदणी* करिता असलेले अज्ञान या करिता *१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांकरिता "स्पॉट रजिस्टेशन व त्याच वेळी लसीकरण"*  
"Spot Registration & Spot Vaccination"   सुरू करणे बाबत निवेदन देण्यात आले. 
    त्याच बरोबर *वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात प्रशासन व लसीकरण केंद्र ह्या मध्ये सुसूत्रता व सुलभता* आणण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व आयुक्त वसई-विरार ह्यांना सूचना देण्यात आल्या.

स्थानिकस्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी**जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा

*स्थानिकस्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी*
*जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा
*
                                                                                                                                                                                     *कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश* 
 *पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी कराव  *सोयाबीन बियाण्यांचे दर शेतकऱ्यांना परवडतील असे ठेवा*

मुंबई, (प्रतिनिधी)दि. ११: राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेवुन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
आज मंत्रालयात कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन, कापूस व मका  पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषि आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल. 
गेल्या वर्षी मोठया प्रमाणात सोयाबीन बियाणे तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. गतवर्षीच्या अनुभवातुन बोध घेवुन पेरणीपुर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके जास्तीत जास्त प्रमाणावर आयोजित करावीत. अशा प्रात्यक्षिकां दरम्यान कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषि सेवा केंद्राचे प्रतिनिधी शेतकरी वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्यास उपलब्ध झाल्यास मोठा सकारात्मक बदल निश्चितच होवुन येणा-या वर्षात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होवु शकेल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.
*सोयाबीन पिकासाठी १० ते २० टक्के अतिरीक्त बियाणे पुरवठा करावा*
सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखडयाप्रमाणे करीत असतांना राज्याकरिता विशेष बाब म्हणुन सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा असे आवाहन श्री. भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबिज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्योत आलेली नाही. याबाबत खाजगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेवुन त्यांच्या कडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.
*कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या तक्रारींबाबत संशोधनासाठी पुढाकार घ्यावा*
राज्यातील कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उदभवणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवड यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली यावर देखील सविस्तर संशोधन होऊन राज्यातील शेतकऱ्यांना शिफारसी द्याव्यात अशा सुचना त्यांनी दिल्या.
महाबीजने शासकीय प्रक्षेत्रे व कृषि विद्यापीठाकडील प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापुर्ण बियाणे शेतकऱ्यांसाठी उत्पादीत करावे अशी सूचनाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली.
यावर्षी पावसाळा वेळेवर आणि नियमीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करावे. बियाण्यांच्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, असे श्री. भुसे यांनी सांगितले.
*यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज*
यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे याकामी बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकार  घ्यावा असे आवाहन करतानाच अन्य राज्यांतून बेकायदा बियाण्यांची विक्री राज्यात विक्री होऊ नये यासाठी कृषि विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.

Monday, May 10, 2021

पालघर जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन नोंदणी करण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी

*पालघर जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन नोंदणी करण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी*
पालघर(प्रतिनिधी)
     पालघर मतदार संघा सह पालघर जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले वयोगट १८ ते ४४ या वयोगटातील युवा वर्गाला शासनाकडून देण्यात येणाऱ्या कोविड-१९ या गंभिर आजारावरील लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून लसिकरण केले जाते. 
लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करतांना खुप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील  मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी, वाडा, डहाणू, पालघर यां ग्रामिण आदिवासी भागात आदिवासी गरीब जनतेकडे स्मार्ट फोन उपलबध नसतात. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी नेटवर्क नसल्याने मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे स्थानिक युवा वर्गाला लसिकरणा पासुन वंचित राहावे लागत आहे. बाहेरील तालुका किंवा जिल्ह्यातील व जवळपासच्या शहरीभागातील युवा, नागरीक लस घेण्यासाठी पालघर, विक्रमगड, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार येथे येत असल्याने स्थानिकांना लसिकरणापासुन वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे  स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसुन येत आहे. बऱ्याच वेळा लसिकरण केंद्रांवर वाद निर्माण होत आहेत.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील ग्रामिण आदिवासी भागत लसिकरण ऑफलाईन करण्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार व्हावा, तसेच लसिकरणासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे व १८ ते ४४ वयोगटातील लसिकरण केंद्र पालघर जिल्ह्यात वाढविण्यात यावीत अशी  विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

पालघर जिल्ह्यात कोविड लासिकरणकेंद्र वाढविण्याबाबत रीपब्लीकन पार्टी ऑफ. इंडिया (A) चे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले पत्र.

पालघर जिल्ह्यात कोविड लासिकरणकेंद्र वाढविण्याबाबत रीपब्लीकन पार्टी ऑफ. इंडिया (A) चे  जिल्हा  अध्यक्ष सुरेश जाधव यांनी  पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले पत्र.
पालघर(प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यात कोविड लासिकरणकेंद्र वाढविण्याबाबत रीपब्लीकन पार्टी ऑफ. इंडिया (A) चे  जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिले पत्र.पालघर जिल्ह्यात लसीकरण केंद्र जिथे उभारलेत तिथे खूप गर्दी होत असते आत्ता तर १८ते ४४ वर्षाच्या व्यक्तींना देखील लस देण्याचा निर्णय झाला आहे.त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.तसेच ऑनलाईन नोदणी करण्यास खूप जणांना जमत नाहीत. त्यामुळे शासनाने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्र नवीन सुरू करावी अशी मागणी केली.पालघर येथील नवीन मुख्यालयात २०००/ हजार खाट चे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी साठी.पालघर जिल्ह्यात कोविड लासिकरणकेंद्र वाढविण्याबाबत  रीपब्लीकन पार्टी ऑफ. इंडिया (A) चे  जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी  पालघर  जिल्ह्याचे चे जिल्हाधिकारी यांना दिले पत्र.

पूनम पार्क कोविड सेंटर येथे गरम पाण्याची मशीन दिल्या बद्दल प्रवीण मोरे ह्यांचे आभार. डॉक्टर तर्फे मानले

पूनम पार्क कोविड सेंटर येथे गरम पाण्याची मशीन दिल्या बद्दल प्रवीण मोरे ह्यांचे आभार. डॉक्टर तर्फे
 पालघर (प्रतिनिधी) पूनम पार्क येथे २०सप्टेंबर रोजी कोविड सेंटर सुरू करण्यात आले .ह्या ठिकाणी गरम पाणी पिण्यासाठी उपलब्ध नव्हते ही बाबा माझ्या ओळखीचे तिथेच असणारे पेशंट निनाद चौधरी ह्यांनी मला सांगितले .ही माहिती मिळाल्यानंतर तेथील नगरसेवक प्रवीण मोरे उर्फ पांडू ह्यांच्याशी संपर्क साधून कोविड सेंटर मध्ये गरम पाण्याची सोय उपलब्ध नाही आहे.
 कोविड मध्ये पेशंट ने गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.असे असताना देखील ह्या गोष्टीचे गांभीर्य नव्हते ही बाब प्रवीण मोरे ना समजली व त्यांनी स्व खर्चाने  वोलटास कंपनीची मशीन जी गरम,थंड,साधे व छोटा फ्रिज असणारी मशीन ह्या ठिकाणी देण्यात आली आहे.ह्या मशीन मुळे येथील रुग्णांना आत्ता गरम पाण्यासाठी अडचण येणार नाही.ही मशीन आज तिथे बसवण्यात आली त्यावेळी तेथील डॉ.महेश बटगुजर, डॉ.सुशील ढोले,समीर संखे,सुमित आदमाने,अरुण संखे, मंगल खेमाडे, व इतर ह्यांच्या उपस्थित ही मशीन लावण्यात आली.सर्व डॉक्टर मंडळीने नगरसेवक प्रवीण मोरे ह्यांचे आभार मानले.असेच सर्वांनी पुढे येऊन मद्दत केली पाहिजे .

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...