Saturday, February 6, 2021

संघाचे जेष्ठ स्वयंसेवक " दादा "अनंतात विलीन.

संघाचे जेष्ठ स्वयंसेवक " दादा " विलीन.   सफाळे ( हिरालाल लोखंडे  ) दिनांक २ फेब्रुवारी  २०२१ रोजी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक श्री दिनकर गणेश पंडित उर्फ  दादा यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे जन्म गाव रत्नागिरी तालुक्यात असले तरी पालघर जिल्ह्यात नोकरी निमित्त बदली होऊन आल्यानंतर एसटी महामंडळाच्या  पालघर कार्यालयातच सेवानिवृत्त होऊन आपले पुढील आयुष्य पालघर तालुक्यातील सफाळे येथे  कार्यरत केले. 
   दादा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवार सफाळे -- एक आदर्श व्यक्तिमत्व होते, संघ हेच जिवन व हाच त्यांचा परीवार होता. पालघर जिल्ह्यातील अनेक हेमंत शिबिरातून मेसची ( जेवणाची ) जबाबदारी स्वतः घेत कारण, मेहनत करण्यासाठी क्षमता - जिद्द तरूणांना लाजवेल अश्या प्रकारे त्यांचा कडे होती. महिला बालकल्याण अधिकारी त्यांना नमन करीत, कारण त्यांचे आचार - विचार - वागणूक वंदनीय अशीच होती. वसई  मधे त्याना " समाज सेवक " पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल. तर सफाळ्यात " जानकी राम न्यास व्दारा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलेले. 
    दादानी सुमारे चोवीस - पंचवीस वर्ष  पुर्ण वेळ संघपरीवारासाठी दिलेला, वनवासी कल्याण आश्रम रत्नागिरीत यथे दोन ते तिन वर्ष कार्य, वनवासी कल्याण आश्रम नाशिक येथे दोन ते तिन वर्ष पुर्ण वेळ देऊन कार्य केले. सफाळे येथे  विश्व हिन्दू परिषद व जानकी राम न्यास आश्रमात सतत एकोणीस वर्ष अविरहित व्यवस्थापक म्हणून कार्य केले. अल्पशा आजाराने सर्वाना सोडून अनंतात विलीन झाले.त्यांच्या पश्चात दोन नांती असून शेवटच्या श्वासापर्यंत दादा संघमय जिवन जगले. दादाना भावपूर्ण श्रध्दांजली.

खैर तस्करांची स्कॉर्पिओ जप्त ! २ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्दे माल जमा.

खैर तस्करांची स्कॉर्पिओ जप्त ! 
२ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्दे माल जमा. 
वाडा -- हिरालाल लोखंडे -- दिनांक ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी भल्या पहाटेसुर्योदया पुर्वी सुमारे ३ ते  ३-३० दरम्यान, बाणगाव तालुका वाडा जिल्हा पालघर येथील वनाधिकारी व कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असताना, गारगोटा गावाच्या हद्दीत एक स्कॉर्पिओ गाडी संशयित रित्या जाताना आढळून आली असता, वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी गाडीला चहुबाजूने घेरले व थांबवले असता, अंधाराचा फायदा घेत गाडी चालक व गाडीत असलेल्या इतर व्यक्ती फरार झाले, गाडीची झाडा- झडती घेतली असता एम.एच.०२ ए पी. ८६८० या स्कॉर्पिओ गाडीमध्ये खैर प्रजातीचे ओंडके विस नग, अंदाजे १.०२२ घनमीटर आकाराची खैराचे लाकूड मिळून आले आहे. या मुद्दे मालाची किंमत अंदाजे २५०००/-₹, अक्षरी पंचवीस हजार रूपये व गाडीची किंमत २,५००००/- ₹, अक्षरी दोन लाख पन्नास हजार रूपये असा एकूण २,७५,००००/- ₹, अक्षरी दोन लाख पंच्याहत्तर हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 
वरील कारवाई श्री एच, व्हि, साफळे वनक्षेत्रपाल वाडा ( पश्चिम ) यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री एस. बी. ठाकरे यांच्या पथकाने श्री जाधव - वनपाल, वनरक्षक केंद्रे, मोहीती,करगुंडे,निकम,नदाब,सपकाळ,सोनवणे, वाहनचालक - आकारे यांच्या सौजन्याने हि कारवाई करण्यात आली आहे.

Friday, February 5, 2021

निषेध निषेध निषेध ?इंधन दरवाढीचा निषेध .

निषेध   निषेध  निषेध ?
इंधन दरवाढीचा निषेध ( हिरालाल लोखंडे  ) केंद्र सरकारच्या धोरणामुळे, वाढलेल्या इंधन दरवाढीचा सर्व सामान्य जनतेचा, दर महिन्याचा घर खर्च बजेटमध्ये ठेवणे जिकरीचे होत आहे, इंधन दरवाढीचा प्रभाव मुळे सतत भाववाढ होत आहे, घरगुती  गॅस सिलिंडर च्या किंमतीत भाववाढ दरमहा होत आहे. कोव्हिडा १९ च्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, तरीही  " आई खावू घालीना बाप भिक मागू देईना " अश्या स्थिती अनेक कुटूंबांची झालेली आहे. तरी इंधन दरवाढीचा आलेख वरवर चढत आहे 
         इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेने तर्फे शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पालघर हुत्तात्मा स्तंभा जवळ शिवसैनिकांनी एकत्र होऊन केंद्र सरकारचा निषेधार्थ घोषणा देऊन, निवासी उपजिल्हाधिकारी श्री नवले साहेब यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी निवेदन दिले.     यावेळी मा. श्री राजेशभाई शहा -- मा श्री वसंतभाई चव्हाण पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख, मा श्री श्रीनिवासजी वनगा साहेब आमदार,पालघर विधानसभा, सौ भारती ताई कामडी - पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा, पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती ताई मेहर, आदी, तसेच सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी , पदाधिकारी,  महिला आघाडी ,युवासैनिक उपस्थित होते

पालघर हुत्तात्मा स्तंभा जवळ एकत्रित होवून केंद्र सरकार चा निषेध करीत निवासी उप जिल्हाधिकारी नवले साहेबांना ईंधन दरवाढ कमी करण्या साठी दिले पत्र

पालघर मधील इंधन दरवाढीचा संधर्भात निषेधार्थ पत्र शिवसेनेने उपजिल्हाधकारी  नवले साहेब यांना दिले
🔴➖( प्रतिनिधी)पालघर वाढलेल्या  ईंधन  दरवाढी  चा  निषेधार्थ  शिवसेने तर्फे आज  पालघर  हुत्तात्मा स्तंभा  जवळ   एकत्रित  होवून  केंद्र  सरकार  चा  निषेध  करीत निवासी  उप जिल्हाधिकारी  नवले  साहेबांना   ईंधन  दरवाढ  कमी  करण्या बाबतीचे  निवेदन  देण्यात  आले . 
यावेळी पालघर  शिवसेना  जिल्हा प्रमुख राजेश  भाई  शाह ,  वसंत  भाई  चव्हाण ,  जिल्हा परिषद  अध्यक्षा  सौ  भारती  ताई  
कामडी   आमदार  मा  श्री  
श्री निवास  जी  वनगा  साहेब ,  जिल्हा  महिला  संघटक  ज्योति  ताई  मेहेर   व  इतर  सर्व  सन्माननीय  लोकप्रतिनिधि ,. पदाधिकारी ,  महिला  आघाडी ,  युवासेनिक  उपस्थित  होते .

पालघर मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरुद्ध वीजबिल माफी साठी आंदोलन.....

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 

पालघर भाजपचे ठाकरे सरकार विरुद्ध वीजबिल माफी साठी आंदोलन..... 

पालघर,(प्रतिनिधी) शुक्रवार,5 फेब्रुवारी 2021, ठाकरे सरकार ने वीजबिल माफीवर घुमजाव केल्यानंतर आज भाजपा पालघर जिल्हा  च्या वतीने जिल्ह्यात महावितरण च्या  कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.ह्या प्रसंगी पालघर येथील महावितरण च्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्हा पदाधिकारी ,मंडळ पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.ह्या प्रसंगी आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी ना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Thursday, February 4, 2021

श्रमिक सेनेच्या १५० कामगारांनी , स्विकारले शिवसेनेचे नेतृत्व.

श्रमिक सेनेच्या १५० कामगारांनी , स्विकारले शिवसेनेचे नेतृत्व. 
वाडा ( हिरालाल लोखंडे ) -- दिनांक  ४ फेब्रुवारी २०२१ रोजी गाला प्रेसिजन इंजिनीअर प्रायव्हेट लिमिटेड, मुसारने -- वाडा या कंपनीतील १५० कॉन्टॅक्ट कामगारांनी श्रमिक सेनेचा राजीनामा देऊन शिवसेना प्रणित कामगार सेनेचे नेतृत्व स्विकारले. 
      शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी यांनी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२२ या वर्षासाठी ११,६०० /-₹ (अक्षरी अकरा हजार सहाशे रूपये ) कामगारांना वेतनवाढीचा करार मंजूर करून काॅन्ट्रॅक्ट बेसेवर कामकरणारे ३ कामगार यांना कंपनीत कायम स्वरूपी कामगार करण्यात आले.
     कंत्राटी कामगार सेना युनिटच्या फलकांचे अनावरण  श्री राजेशभाई शहा शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमात श्री धनंजय पष्टे पालघर विधानसभा संपर्क प्रमुख, श्री तुकाराम बेहरे एच आर कंपनी मॅनेजर, श्री जनार्दन भेरे शिवसेना वरीष्ठ कार्यकर्ते, श्री संतोष पाटील  कोंढला उपविभाग प्रमुख, श्री मिलींद चौधरी भारतीय कामगार सेना सचिव, श्री शरद शेळके चारमिनार युनिट अध्यक्ष, संतोष पाटील उपाध्यक्ष, या मान्यवरांच्या  उपस्थित कार्यक्रम साजरा झाला, या कार्यक्रमासाठी महेंद्र भोईर गाला कंपनी युनिट अध्यक्ष, सागर दिनकर भारतीय कामगार सेना रा. का. सदस्य, रविंद्र दुर्वे  गाला युनिट उपाध्यक्ष, महेश पाटील, 
दिनेश वालांजा, ज्ञानेश्वर पाटील, रमेश पाटील युनिट सदस्य याचा या कार्यात मोलाचा सहयोग आहे

दै " डहाणू मित्र " पत्रकारांची, मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

दै " डहाणू मित्र " पत्रकारांची, मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट 
   डहाणू -(प्रतिनिधी)- दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी जनार्दन आर्केड मसोली डहाणू पश्चिम  येथे नव्या ठिकाणी सुरु करण्यात आलेले दै " डहाणू  मित्र " या वृतपत्र कार्यालयाला ह्यांच वृत्तपत्राचे पालघर जिह्यांतील प्रतेक तालुक्यातील नेमलेल्या वार्ताहरांनी दैनिकाचे संपादक व कार्यालयीन कर्मचारी यांची यांची भेट घेऊन पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्यां. तसेच मा, संपादक श्री रफीक घाची यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करून पुढील कार्यासाठी  हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
  संपादक यांनी सर्वपत्रकारांचे आभार मानून, पुढील वाटचालीची पत्रकारांशी चर्चा करून कार्यासाठी नवीन दिशा देण्यात यावी सांगितले, या कार्यक्रमात श्री भरत गवारी ,जितेंद्र मोरघा -- जव्हार, रविंद्र घरत, मनोज बुंधे, महादेव सुतार, रहिम कुरेशी, कौसर रहीम कुरेशी,  ताजाराम कुमावत, सादिक शेख, व्हिडिओ आॅडीटर जितेंद्र चौधरी कार्यकारी संपादक, तुफेल घाची सहसंपादक आदि हजर होते

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...